केंद्र सरकार आणि राज्य सरकार शेतकऱ्यांसाठी (farmers) नवनवीन योजना राबवत असते. ज्यामधून शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा मिळतो. आता सरकारने (government) नुकसान भरपाईबाबत अधिसूचना जारी केल्या आहेत.
1 जुलै 2022 च्या शासन निर्णयानुसार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे झालेले 50 टक्केपेक्षा जास्त घट असेल तर येणाऱ्या नुकसान भरपाईच्या 25 टक्के मर्यादेपर्यंत शेतकऱ्यांना आगाऊ रक्कम देण्याची तरतूद जारी केली आहे.
नैसर्गिक आपत्ती, पूरपरिस्थिती ज्यामूळे पीक (crops) पेरणी 25 टक्केपेक्षा जास्त बाधित झाली असल्यास,अशा शेतकऱ्यांना रक्कम मिळणार आहे. ही रक्कम प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत मिळणार आहे.
खरीप हंगामामध्ये झालेल्या पिकांच्या नुकसानीसाठी 25 टक्के वाढीव भरपाई मिळणार, अशाही सूचना दिल्या आहेत. नागपूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. याठिकाणातील बरेच शेतकरी पात्र आहेत.
पुढील 7 दिवस सावधानता बाळगण्याची गरज; जाणून घ्या तुमचे साप्ताहिक राशीभविष्य
25 टक्के आगाऊ रक्कम मिळणार
अधिसूचित पिक विमा क्षेत्रातील सोयाबीन, तूर व कापूस (cotton) या पिकासाठी, पीक विमा योजनेच्या तरतूदीच्या अधिन राहून संभाव्य नुकसान भरपाई रकमेच्या 25 टक्के आगाऊ रक्कम विमाधारक शेतकऱ्यांना देण्यासाठी आयसीआयसीआय लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी , मानिकचंद आयकॉन 3 रामाळा, बंडगार्डन, पुणे यांना आदेश देण्यात आले आहेत.
LIC ची जीवन लाभ योजना सर्वोत्तम; 253 रुपयांच्या गुंतवणुकीवर 54 लाख रुपयांचा मिळतो लाभ
या आदेशानुसार विमा कंपनीने अधिसूचना जाहीर झाल्यापासून 1 महिन्याच्या आत पात्र ठरलेल्या सोयाबीन, तूर व कापूस या पिकांसाठी जिल्हयातील पीक विमा (crop vima) धारक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई रक्कमेच्या 25 टक्के आगाऊ रक्कम त्यांच्या खात्यात जमा करा, असे नमूद केले आहे.
महत्वाच्या बातम्या
पावसामुळे पालेभाज्यांची आवक घटली; भाज्यांच्या दरात 40 टक्क्यांनी वाढ
शरीरासोबत मनाचंही आरोग्य उत्तम ठेवायचं आहे? तर लक्षात ठेवा फक्त ४ सूत्रं
ज्वारी-बाजरी आणि इतर तृणधान्यांसाठी देशात 3 केंद्रे स्थापन; शेतकऱ्यांना होणार फायदा
Share your comments