शेतकरी (farmers) आपल्या शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करून चांगले उत्पादन घेत असतात. सध्या आपण पाहिले तर पारंपरिक शेतीमधील शेतकऱ्यांचा नफा सातत्याने कमी होत आहे. अशावेळी शेतकरी चांगले उत्पादन घेऊ शकतील अशा व्यवसायाबाबद सविस्तर माहिती घेऊया.
शेतकऱ्यांना व्यवसायातून अधिक उत्पादन काढायचे असेल तर या सर्वांमध्ये मधुमक्षिका पालन (Beekeeping) हा व्यवसाय सर्वोत्तम मानला जात आहे. परंतु सध्या मधमाशी चावण्याचा आणि त्यातूनच संकट निर्माण होण्याचा धोका अधिक असल्याने सगळेच शेतकरी किंवा तरुण हा व्यवसाय करण्यास टाळतात.
मात्र आता याचा विचार करून शासनाकडून विविध योजना सातत्याने राबविल्या जात आहेत. कमी खर्च आणि जास्त नफा यामुळे शेतकरीही मधमाशीपालनात रस दाखवत आहेत. या व्यवसायाचा खर्च आणि नफा याविषयी सविस्तर माहिती घेऊया.
35 ते 40 हजार खर्चात लाखांचा नफा
10 खोक्यांपासून मधमाशी पालन सुरू करण्यासाठी 35 ते 40 हजार रुपये खर्च येतो. मधमाशांची संख्याही दरवर्षी वाढते. मधमाश्या जितक्या जास्त वाढतील तितका जास्त मध तयार होईल आणि नफा देखील लाखो पटींनी वाढतो.
यासाठी शेतकऱ्यांना मधमाश्या ठेवण्यासाठी सेंद्रिय मेणाची (organic wax) व्यवस्था करावी लागते. या पेटीत 50 ते 60 हजार मधमाश्या एकत्र ठेवल्या आहेत. या मधमाशांकडून सुमारे एक क्विंटल मध तयार होतो.
इतके मिळते अनुदान
नॅशनल बी बोर्ड (National Bee Board) ने मधमाशी पालनादरम्यान शेतकऱ्यांना शक्य ती सर्व मदत देण्यासाठी नाबार्डशी करार केला आहे. या दोघांनी मिळून भारतात मधमाशी पालन व्यवसायासाठी वित्तपुरवठा योजना सुरू केली आहे. याशिवाय केंद्र सरकार मधुमक्षिका पालनावर 80 ते 85 टक्के अनुदान देते. सध्या बाजारात मधाची किंमत 400 ते 700 रुपये प्रति किलो आहे.
जर तुम्ही प्रति बॉक्स 1000 किलो मध तयार केले तर तुम्हाला दरमहा 5 लाखांपर्यंत निव्वळ नफा मिळू शकेल. हा व्यवसाय शेतकऱ्यांनी केला तर त्यांना चांगला फायदा मिळू शकतो.
Share your comments