केंद्रातील मोदी सरकार सध्या अनेक गोष्टींना पर्याय शोधत आहे. यामध्ये पेट्रोल आणि डिझेलचा (Petrol and diesel) वापर कमी करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत जेणेकरून तेलाच्या आयातीसाठी परदेशावर अवलंबून राहू नये, हा यामागचा उद्देश आहे. तसेच तुम्ही तुमच्या घराच्या छतावर सोलर पॅनल (Rooftop Solar Scheme) लावले तर तुम्हाला 30 टक्के सबसिडी (Subsidy) दिली जाईल. तसेच घरात वापरल्या जाणाऱ्या विजेला पर्याय म्हणून त्याचा वापर करता येतो.
यामध्ये सौर पॅनेल बसवणाऱ्यांना केंद्र सरकारकडून छतावरील सोलर प्लांटवर 30 टक्के सबसिडी दिली जात आहे, त्यामुळे तुमचा एक लाखाचा खर्च सुमारे 70 हजार रुपयांपर्यंत कमी होणार आहे. केंद्र सरकार (Central government) सातत्याने उर्जेच्या पारंपरिक स्रोतांऐवजी पर्यायी स्रोतांवर अवलंबित्व वाढवण्यावर भर देत आहे. केंद्र सरकारच्या अनुदानाव्यतिरिक्त काही राज्ये यासाठी वेगळे अनुदानही देतात.
यासाठी तुम्हाला राज्य सरकारच्या अक्षय ऊर्जा प्राधिकरणाकडे जावे लागेल, जे सौर पॅनेल जारी करत आहेत. याठिकाणी खाजगी डीलर्समार्फत सौर पॅनेल पुरविण्यात येतात. पॅनल लावण्यासाठी सबसिडी हवी असल्यास त्याचा फॉर्मही या कार्यालयांतून मिळेल. हे सोलर पॅनल घरी बसवल्यानंतर पुढील 25 वर्षे मोफत वीज चालवता येईल. या सौर पॅनेलचे आयुष्य सुमारे 25 वर्षे असते. म्हणजे एवढ्या प्रदीर्घ काळासाठी बिघाड होण्याची किंवा अपयशाची शक्यता नसते. यामुळे हे फायदेशीर आहे.
फडणवीस की फर्नांडिस? बंडखोरांचा अनोखा प्रताप, उपमुख्यमंत्र्यांच्या नावातच केला मोठा घोळ
पॅनल्स बसवल्यानंतर तुम्हाला सौरऊर्जेद्वारे वीज मिळेल. दरम्यान, या पॅनल्सची क्षमता 1 kW ते 5 kW पर्यंत असते. ते बसवल्यानंतर विजेचे बिल शून्य होईल, तसेच हरित ऊर्जेचा वापर करून प्रदूषण कमी करण्यात मदत होईल. तसेच या सोलर पॅनेलमध्ये देखभालीचा खर्च नगण्य आहे. तुम्ही दर 10 वर्षांनी एकदा बॅटरी बदलणे आवश्यक आहे. त्याची बॅटरीची किंमत 20 हजार रुपये आहे. तसेच हे सोलर पॅनल एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहज हलवता येतात.
गोपीचंद पडळकरांना मंत्री करा!! कार्यकर्त्याने फडणवीसांना रक्ताने लिहिले पत्र
यामध्ये तुम्ही फॅन आणि फ्रीजपासून टीव्ही सर्व काही या सोलर पॅनलच्या विजेवर चालवता येते. तर घरात एसी चालवायचा असेल तर 2 किलोवॅट क्षमतेचे पॅनल लागेल. पर्यावरण संरक्षण आणि हरित ऊर्जेवर भर देण्याच्या उद्देशाने सरकारने ही योजना सुरू केली आहे. यामुळे ही योजना सर्वसामान्य लोकांसाठी फायदेशीर आहे.
महत्वाच्या बातम्या;
उद्धव ठाकरे यांना भेटण्यासाठी आलेल्या शिवसैनिकाचे मातोश्रीबाहेर निधन
नवीन सरकार आल्यामुळे शेतकऱ्यांचे 50 हजार रखडणार? नव्या सरकारसमोर मोठे आव्हान
मोठी बातमी! भाजपच्या केंद्रीय मंत्र्यांचा अचानक राजीनामा, चर्चांना उधाण
Share your comments