'एपीएफओ' सदस्यांच्या फायद्यासाठी अनेक प्रकारच्या योजना आणत असते परंतु बरेचदा असे होते की, शासनाच्या वेगवेगळ्या विभागानुसार वेगवेगळ्या योजना असतात. परंतु काही योजनांची माहिती होते परंतु काही योजनांची माहिती नाही होत.
अशी एक योजना म्हणजे 'इडीएलआय' योजना होय.ही योजना ईपीएफओ मार्फत आपल्या सदस्यांसाठी चालवली जाते. या योजनेचा उद्देश आहे की,
एपीएफओ सदस्याच्या कुटुंबीयांना काही अडचणी आल्यात तर त्यांना आर्थिक सुरक्षा द्यायचे काम या योजनेच्या मार्फत केले जाते. त्यामुळे या महत्त्वाच्या योजनेची माहिती आपण या लेखात घेऊ.
नक्की वाचा:Rule Change! सुकन्या समृद्धी योजनेत मिळणार 'या' मुलींना देखील लाभ,वाचा नियमातील बदल
काय आहे नेमकी 'इडीएलआय' योजना
ही योजना सरकारने 1976 साली सुरू केली होती. योजना सुरू करण्यामागे सरकारचा उद्देश होता की कर्मचाऱ्याच्या मृत्युनंतर त्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत करणे हा होय.
या योजनेअंतर्गत विम्याची रक्कम मागील बारा महिन्याच्या पगारावर अवलंबून असते म्हणजेच 12 महिन्याच्या पगाराच्या 35 पट असते. उदाहरणच घ्यायचे झाले तर ते एखाद्या कर्मचार्याला जर दहा हजार रुपये पगार असेल तर त्याच्या कुटुंबाला तीन लाख पन्नास हजार रुपये दिले जातील.
या योजनेची वैशिष्ट्ये
1- एक कर्मचारी ठेव लिक्ड योजना असून हे सदस्यांना विमा सुविधा मोफत पुरवते. जर एखाद्या कर्मचाऱ्यांचा अपघाती मृत्यू झाल्यावर त्याच्या कुटुंबीयांना ही रक्कम दिली जाते.
नक्की वाचा:शेतकऱ्यांनो आता इनवेल बोअरिंगसाठी मिळणार २० हजार रुपये, असा घ्या लाभ..
2- ईपीएफओच्या सक्रीय सदस्याच्या नॉमिनीस सेवेच्या कालावधीत सदस्यांच्या मृत्युनंतर सात लाख रुपयांपर्यंत एकरकमी पेमेंट मिळते.
3-ईपीएफओ सदस्य इडली योजनेत आपोआप जोडले जातात. तथापि ईपीएफओ सदस्याच्या नातेवाईकांना या योजनेचा लाभ मिळू शकतो.
जोपर्यंत संबंधित सदस्य इपीएफओमध्ये सक्रिय सदस्य आहेत तोपर्यंत हा फायदा मिळतो.
4- या योजनेच्या सेवांचा लाभ घेण्यासाठी सेवा कालावधी किमान मर्यादा नाही. या योजनेअंतर्गत विम्याची रक्कम सात लाख रुपयांच्या मर्यादेसह मागील बारा महिन्याच्या सरासरी मूळ वेतनाच्या 35 पट आहे.तसंच या योजनेमध्ये बोनसची देखील तरतूद आहे.
Share your comments