1. सरकारी योजना

'या' योजनेत दरमहिना फक्त 210 रुपये जमा करा आणि मिळवा 5,000 रुपये पेन्शन

सर्वसामान्य लोकांसाठी बचत ही भविष्यासाठी सुखकर गुंतवणूक ठरत असते. त्यामुळे सर्वसामान्य लोकांची बचत व्हावी यासाठी केंद्र सरकार नवनवीन योजना राबवत असतं. त्यापैकी केंद्र सरकारची 'अटल पेन्शन योजना' सर्वसामान्य लोकांसाठी फायदेशीर ठरत आहे.

Atal Pension Scheme

Atal Pension Scheme

सर्वसामान्य लोकांसाठी बचत ही भविष्यासाठी सुखकर गुंतवणूक ठरत असते. त्यामुळे सर्वसामान्य लोकांची बचत व्हावी यासाठी केंद्र सरकार (Central Govt) नवनवीन योजना राबवत असतं. त्यापैकी केंद्र सरकारची 'अटल पेन्शन योजना' सर्वसामान्य लोकांसाठी फायदेशीर ठरत आहे.

केंद्र सरकारने सुरु केलेली अटल पेन्शन योजनेत आतापर्यंत जवळपास ३.५० कोटींहून अधिक खाती उघडण्यात आली आहेत. अटल पेन्शन योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी 9 मे 2015 रोजी सुरू केली होती. PFRDA च्या आकडेवारीनुसार 25 ऑगस्ट 2021 पर्यंत अटल पेन्शन योजनेच्या (APY) ग्राहकांची संख्या 3.30 कोटींनी वाढली आहे. चालू वर्षात या पेन्शन योजनेअंतर्गत तब्बल 28 लाखांहून अधिक खाती उघडण्यात आली आहेत.

बाईक खरेदी करताय? तर नितीन गडकरींची ही मोठी घोषणा पहाच; होईल मोठा फायदा...

नियम व अटी 

जर तुम्ही या योजनेअंतर्गत खाते उघडले तर तुम्हाला दरमहा 210 रुपये जमा करावे लागतील. यानुसार एका वर्षात 2520 रुपये मिळतील. तुम्हाला हे 210 रुपये वयाच्या 60 व्या वर्षापर्यंत करावे लागतील. यानंतर, दरमहा 5 हजार रुपये तुमच्या खात्यात येत राहतील, जे वार्षिक 60 हजार रुपये असतील.

जास्तीत जास्त लाभ मिळवण्यासाठी, तुम्हाला या योजनेत लवकरात लवकर सामील व्हावे लागेल. जर तुम्ही वयाच्या 18 व्या वर्षी या योजनेत सामील झालात, तर तुम्हाला या योजनेत दररोज फक्त 7 रुपये जमा करून दरमहा 5,000 रुपये पेन्शन मिळू शकते. यासाठी तुम्हाला दरमहा 210 रुपये जमा करावे लागतील.

त्याचबरोबर, दरमहा 1000 रुपयांच्या मासिक पेन्शनसाठी, दरमहा फक्त 42 रुपये जमा करावे लागतील. 2,000 रुपये पेन्शनसाठी 84 रुपये, 3,000 रुपयांसाठी 126 रुपये आणि 4,000 रुपये मासिक पेन्शनसाठी 168 रुपये दरमहा जमा करावे लागतील.

शेतकऱ्यांना तातडीने 50 हजार रुपये द्या ; स्वाभिमानी शेतकरी संघटनेची एकनाथ शिंदेंकडे मागणी

गुंतवणूक कशी करावी

1) अटल पेन्शन योजनेत गुंतवणूक करण्यासाठी https://enps.nsdl.com/eNPS/NationalPensionSystem.html वेबसाइटला भेट द्या.
2) तुमचा आधार कार्ड तपशील येथे सबमिट करा.
3) तुम्ही हे करताच तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावर ओटीपी येईल, तुम्ही प्रविष्ट करताच सत्यापन केले जाईल.
4) आता बँकेची माहिती द्या, ज्यामध्ये खाते क्रमांक आणि पत्ता टाईप करा, हे करताच तुमचे खाते सक्रिय होईल.
5) यानंतर, तुम्ही नॉमिनी आणि प्रीमियम पेमेंटबद्दल सर्व माहिती भरा.
6) आता पडताळणीसाठी फॉर्मवर ई-सही करा. यासह, अटल पेन्शन योजनेसाठी तुमची नोंदणी पूर्ण होईल.

शेतकरी आता थेट विमानाने पाठवणार शेतमाल; 'ही' योजना ठरणार शेतकऱ्यांसाठी फायदेशीर

English Summary: Deposit 210 per month scheme get Rs 5000 pension Published on: 19 July 2022, 02:46 IST

Like this article?

Hey! I am पाराजी आबासाहेब शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters