मुंबई : देशातील सर्वात मोठी बँक अर्थात सरकारी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI) आपल्या खातेदारकांना आकर्षित करण्यासाठी नेहमीच नवनवीन ऑफर आणत असते. लोक देखील बँकेच्या ऑफरचा फायदा उचलत असतात. लोकांचा चांगला प्रतिसाद बघून आता स्टेट बँक ऑफ इंडियाने एक भन्नाट ऑफर आणली आहे.
SBI ही देशातील सर्वात मोठी बँक मानली जाते. यामुळेच बहुतेक लोक एसबीआयच्या ऑफरशी संलग्न असतात. यामुळे SBI च्या योजनेचा कोट्यावधी लोकांना फायदा मिळतं असतो. मित्रांनो जर तुमचे SBI मध्ये खाते असेल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप उपयोगी ठरणार आहे.
SBI बँक सध्या आपल्या खातेधारकांसाठी एक खास ऑफर घेऊन आली आहे. यामुळे जर तुमचे देखील SBI मध्ये खाते असेल तर तुम्हीही याचा सहज लाभ घेऊ शकता. मित्रांनो आम्ही सांगू इच्छितो की SBI आपल्या खातेदारकांना चक्क सोन्याचे नाणे देत आहे.
महत्वाची बातमी
Successful Farmer : दहावी पास महिला शेतकऱ्याने एका एकरात शिमला मिरची लागवड करून कमविले 14 लाख
मोठी बातमी! पीएम किसान योजनेचे 2 हजार 'या' शेतकऱ्यांना मिळणार नाही
SBI बँकेची ऑफर नेमकी आहे तरी काय
सर्वात मोठी बँक म्हणुन ओळखली जाणारी SBI ने अक्षय्य तृतीयेच्या दिवशी एक खास ऑफर आपल्या ग्राहकांसाठी सुरु केली आहे. ज्या अंतर्गत स्वस्त सोने खरेदी करण्याची संधी ग्राहकांना दिली जातं आहे. एसबीआयने आपल्या अधिकृत ट्विटर हँडल वरून ट्विट करून याबाबत माहिती दिली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने सांगितले आहे की, या अक्षय्य तृतीयेला ग्राहकांना दागिन्यांवर उत्तम ऑफर मिळत आहेत, ज्याचा खातेदार लाभ घेऊ शकतात.
या ऑफर च्या माध्यमातून SBI खातेधारकांना YONO अँपद्वारे शुल्कवर 100% सूट मिळू शकते. डायमंड ज्वेलरी बनवण्यासाठी शुल्कावर ग्राहकांना 100 सूट मिळू शकते. याशिवाय, सोन्याच्या दागिन्यांवर ग्राहकांना 25% सूट मिळु शकणार आहे. याशिवाय जर ग्राहकांनी प्लॅटिनमचे दागिने खरेदी केले तर त्यांना त्याच्या मेकिंग चार्जेसवर 30 टक्के सूट मिळेल. चांदीच्या दागिन्यांवर देखील मेकिंग शुल्कावर 20% सूट दिली जाणार आहे.
याशिवाय 1,50,000 किंवा त्याहून अधिकच्या खरेदीवर बँक ग्राहकांना 1 ग्रॅम सोन्याचे नाणे मोफत देणार आहे. याशिवाय SBI क्रेडिट कार्डद्वारे केलेल्या खरेदीवर 5 टक्के अतिरिक्त सूट दिली जाणार आहे. या ऑफरचा लाभ 26 एप्रिल 2022 ते 8 मे 2022 पर्यंत दिला जाणार आहे. बँकेच्या या ऑफरचा लाभ घ्यायचा असेल तर ही ऑफर 8 मे 2022 पर्यंत सुरु राहणार आहे याची नोंद घ्यावी.
Share your comments