शेतकऱ्यांनी शेती मशागतीचा खर्च वाढल्याने सरकारच्या अनुदानातील ट्रॅक्टरची मागणी केली आहे. यासाठी राज्यातील तब्बल 15 लाख 29 हजार शेतकऱ्यांनी कृषी विभागाकडे अनुदानातील ट्रॅक्टरसाठी अर्ज केले आहेत. मात्र शासनाकडे पुरेसा निधी उपलब्ध नसल्याने 2023-24 मध्ये राज्यातील फक्त 25 हजार शेतकऱ्यांना ट्रॅक्टर मिळणार आहे.
यामुळे या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. शेतीकामांसाठी शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरचा वापर सुरू केल्यामुळे पुढील काही काळात बैल जोडी नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. राज्य सरकारने राज्यातील १५ हजार शेतकऱ्यांना अनुदानातून ट्रॅक्टर दिले आहेत. शासनाच्या माध्यमातून खुल्या प्रवर्गातील शेतकऱ्यांना एक लाखांची तर मागासवर्गीय, दिव्यांग, महिला, अल्प भूधारक शेतकऱ्यांना सव्वालाख रुपयांची सबसिडी दिली जाते.
उर्वरित पैसे हप्त्याने संबंधित ट्रॅक्टर कंपनीला शेतकरी भरतात. खताबरोबरच आता शेती मशागतीचा खर्च महागला आहे. भाड्याच्या ट्रॅक्टरला नांगरणीसाठी एकरी बावीसशे रुपये, तर कोळपणी, फणासाठी दीड हजार रुपये मोजावे लागतात. स्वत:चाच ट्रॅक्टर असल्यास तेवढा खर्च होत नाही. त्यामुळे शेतकऱ्यांचा कल ट्रॅक्टर खरेदीकडे वाढला आहे.
दूध उत्पादन आणि मुरघास निर्मितीसाठी सातारा जिल्ह्यातील हे गाव ठरले एक नंबर! जाणून घ्या...
त्यांची गरज पूर्ण करण्याचा प्रयत्न शासनाच्या माध्यमातून सुरू आहे. आता ‘मागेल त्याला शेततळे’ या योजनेतून अर्जदार शेतकऱ्यांना त्याचा लाभ दिला जाणार आहे. ट्रॅक्टर हे कमी वेळेत जास्त काम करून देणारे यंत्र आहे. यामुळे वेळेची व श्रमाची बचत होते. तसेच ट्रॅक्टरला शेतीसाठी लागणारी अनेक प्रकारची यंत्रे जोडता येतात.
अवकाळीची नुकसान भरपाई ८ दिवसात थेट शेतकऱ्यांच्या खात्यात, अर्थमंत्र्यांची माहिती..
यामुळे शेतकऱ्यांना शेतीच्या कामासाठी ट्रॅक्टर सोयीस्कर पडतो. तसेच शेतीच्या कामासाठी मजूर न मिळण्याच्या समस्येवर देखील ट्रॅक्टर उत्तम उपाय आहे. सध्या ट्रॅक्टरच्या मशागतीचा खर्च मोठ्या प्रमाणात वाढला आहे. यामुळे ट्रॅक्टर खरेदीकडे शेतकरी मोठ्या प्रमाणात वळत आहेत.सरकार देखील शेतकऱ्यांना मदत करत आहेत.
गुलाबी लसूण एक वरदान! खासियत आणि फायदे जाणून वाटेल आश्चर्य
राज्यातील काँग्रेसच्या एकमेव खासदाराचे निधन! चंद्रपूरचे काँग्रेस खासदार बाळूभाऊ धानोरकर यांचे निधन
आता सरकार शेतकऱ्यांना ३ वर्षांसाठी मोफत पीक विमा देणार, सरकारची मोठी घोषणा
Share your comments