देशातील शेतकरी वेगवेगळ्या कारणाने अनेकदा अडचणीत येत आहे. यामुळे केंद्र सरकार आणि राज्य सरकार वेगवेगळ्या योजना राबवत असते. शेती हा आपला कणा असून देशाची अर्थव्यवस्था देखील शेतीवर (Farming) अवलंबून आहे. अशा परिस्थितीत शेती क्षेत्राला चालना देण्यासाठी तसेच शेतकऱ्यांचे (Farmer) जीवनमान उंचावण्यासाठी सरकार देखील प्रयत्न करत असते.
मोदी सरकारने (Modi Government) देखील शेतकऱ्यांच्या हितासाठी अनेक योजना आणल्या, यामध्ये पीएम किसान सम्मान निधि योजना ही देखील अशीच एक शेतकरी हिताची योजना आहे. तसेच आता शेतकऱ्यांना शेती करण्यासाठी आवश्यक उत्पादन खर्चाचे ओझे कमी कमी करण्यासाठी शेतकरी उत्पादक संघटना (Farmers Producers Organization) ही योजना संपूर्ण देशात राबवत आहे.
ही योजना शेतकऱ्यांसाठी खूपच फायदेशीर आहे. या माध्यमातून 2024 पर्यंत 10,000 शेतकरी उत्पादक संघटना स्थापन करण्याचे सरकारने ठरवले आहे. दरम्यान शेतकरी उत्पादक संघटना ही एक सामूहिक कंपनी असते, ज्यामध्ये किमान 11 शेतकरी जोडले जाऊ शकतात. या माध्यमातून शेतकऱ्यांना अनेक गोष्टी करता येतात. आता यासाठी मोदी सरकाने 15 लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर केली आहे.
वयाच्या 85 व्या वर्षापर्यंत त्यांनी 14 तलाव खोदले, पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही केले कौतुक..
यामुळे शेतकऱ्याला शेतीसाठी खते, बियाणे, खते, कीटकनाशके आणि यंत्रसामग्री वेळेवर खरेदी करणे सोपे जाते. या योजनेचा थेट लाभ अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना होणार आहे. यामुळे ही योजना एक फायदेशीर ठरत आहे. यामध्ये योजनेत सामील होण्यासाठी डोंगराळ भागात जास्तीत जास्त 100 शेतकरी आणि मैदानी भागातील 300 शेतकरी जोडले जाऊ शकतात.
शेतकऱ्यांना 15 लाख रुपये मिळवायचे असतील तर किमान 11 शेतकऱ्यांच्या गटाला जोडून एक कंपनी तयार करावी लागते. शासनाकडून दिला जाणारा हा निधी केवळ कंपनी कायद्यांतर्गत नोंदणीकृत कंपनीच्या बँक खात्यात 3 वर्षात फिरत्या आधारावर हस्तांतरित केला जातो.
शिंदे सरकारचा मोठा निर्णय! लवकरच राज्यात पेट्रोल डिझेल होणार स्वस्त..
शेतकरी उत्पादक संघटनेत सामील होऊन, आपण कृषी स्टार्ट-अप करून चांगला नफा कमवू शकता. ज्या शेतकऱ्यांना FPO म्हणजेच शेतकरी उत्पादक संघटनेत सामील व्हायचे आहे, त्यांच्यासाठी सरकारने पात्रता निश्चित केली आहे, ज्यामध्ये शेतकऱ्याकडे भारतीय नागरिकत्व आणि शेतीयोग्य जमीन असणे अनिवार्य आहे. यासाठी राष्ट्रीय कृषी बाजार (E-NAM) https://enam.gov.in/web/ च्या अधिकृत वेबसाइटवर माहिती मिळेल.
महत्वाच्या बातम्या;
मोठ्या मनाचा शेतकरी!! शेतकऱ्यांसाठी राबतोय शेतकरी पुत्र, ट्रॅक्टर आमचे डिझेल तुमचे..
सोलरमुळे आयुष्यच बदलले, 12 एकर शेती झाली हिरवीगार..
शेतीपूरक व्यवसायातून कमवा लाखो रुपये, जाणून घ्या नेमकं करायचं तरी काय..
Share your comments