Government Schemes

सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय शोधत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. तुम्हाला चांगला परतावा हवा असेल तर एलआयसीची सरल पेन्शन योजना तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते.

Updated on 14 September, 2022 10:54 AM IST

सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय शोधत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. तुम्हाला चांगला परतावा हवा असेल तर एलआयसीची सरल पेन्शन योजना (LIC Saral Pension Yojana) तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकते.

वयाच्या साठाव्या वर्षांनंतर पेन्शनशी संबंधित अनेक योजना आहेत. परंतु या योजनेत तुम्ही लहानपणापासूनच पेन्शनचा लाभ घेऊ शकता. LIC सरल पेन्शन योजना ही एक नॉन-लिंक केलेली, सिंगल प्रीमियम, वैयक्तिक तत्काळ वार्षिकी योजना आहे.

LIC सरल पेन्शन योजना एकल जीवन आणि संयुक्त जीवन दोन्हीमध्ये मिळू शकते. सिंगल लाईफमध्ये पॉलिसी एकाच व्यक्तीच्या नावावर असते. पॉलिसीधारकाला आयुष्यभर पेन्शन (Pension for life) मिळत राहते. पॉलिसीधारकाच्या मृत्यूनंतर, मूळ प्रीमियमची रक्कम त्याच्या/तिच्या नॉमिनीला परत केली जाते.

तर दुसरीकडे संयुक्त जीवनात पती-पत्नी दोघेही मिळून पेन्शन (pension) घेऊ शकतात. जोपर्यंत प्राथमिक पेन्शनधारक जिवंत आहेत, तोपर्यंत त्यांना पेन्शन मिळत राहते. त्याचा मृत्यू झाल्यावर त्याच्या जीवनसाथीला पेन्शन मिळते. लाइफ पार्टनरच्या मृत्यूनंतर, बेस प्रीमियमची रक्कम नॉमिनीला दिली जाते.

'या' योजनेत फक्त 100 रुपयांपासून पैसे जमा करा; मॅच्युरिटीनंतर 16 लाख रुपये मिळतील

एकवेळ प्रीमियम भरावा लागेल

तुम्ही ही योजना एकट्याने किंवा तुमच्या जोडीदारासोबत घेऊ शकता. तुम्हाला त्यात एकरकमी गुंतवणूक करावी लागेल आणि त्यानंतर तुम्हाला पेन्शन मिळत राहते. ही पॉलिसी घेताना ग्राहकाला एकरकमी प्रीमियम भरावा लागतो आणि पॉलिसी घेतल्यापासून पेन्शन सुरू होते.

जेवढी पेन्शन सुरु होते तेवढीच पेन्शन आयुष्यभर चालू राहते. या योजनेसाठी किमान वय 40 वर्षे आणि कमाल वय 80 वर्षे आहे. ही पॉलिसी सुरू झाल्यानंतर सहा महिन्यांनंतर कधीही सरेंडर (sarender) केली जाऊ शकते.

महत्वाची बातमी! शेतजमीन विकल्यास शेतकऱ्यांना भरावा लागणार 'इतका' टॅक्स; वाचा सविस्तर

पेन्शन मिळवण्यासाठी चार पर्याय

LIC सरल पेन्शन प्लॅनमध्ये (aral Pension Yojana) पेन्शन मिळवण्यासाठी चार पर्याय आहेत. ग्राहक मासिक, त्रैमासिक, सहामाही किंवा वार्षिक पेन्शन घेऊ शकतात. मासिक पेन्शन किमान 1000 रुपये, त्रैमासिक पेन्शन किमान 3,000 रुपये, सहामाही पेन्शन किमान 6,000 रुपये आणि वार्षिक पेन्शन किमान 12,000 रुपये असेल.

पेन्शनच्या कमाल रकमेवर मर्यादा नाही. उदाहरणार्थ, तुम्ही 42 वर्षांचे असाल आणि तुम्ही 30 लाख रुपयांची वार्षिकी खरेदी करत असाल तर तुम्हाला 12,388 रुपये मासिक पेन्शन मिळेल. जर तुम्हाला जास्त रकमेची पेन्शन मिळवायची असेल, तर त्यानुसार तुम्ही जास्त रकमेचा सिंगल प्रीमियम (Single premium) जमा करू शकता.

महत्वाच्या बातम्या 
कोणत्या बाजार समितीमध्ये कांद्याला किती दर मिळतोय? जाणून घ्या आजचे कांदा बाजारभाव
'या' लोकांना मनासारखा जोडीदार भेटण्याची शक्यता; जाणून घ्या आजचे राशीभविष्य
शेतकरी मित्रांनो जनावरांचे पालन 'अशा' पद्धतीने करा; अनेक आजारांपासून राहतील दूर

English Summary: Adequate pension LIC Saral Pension Yojana
Published on: 14 September 2022, 10:46 IST

எங்களுக்கு ஆதரவளியுங்கள்!

প্রিয় অনুগ্রাহক, আমাদের পাঠক হওয়ার জন্য আপনাকে ধন্যবাদ। আপনার মতো পাঠকরা আমাদের কৃষি সাংবাদিকতা অগ্রগমনের অনুপ্রেরণা। গ্রামীণ ভারতের প্রতিটি কোণে কৃষক এবং অন্যান্য সকলের কাছে মানসম্পন্ন কৃষি সংবাদ বিতরণের জন্যে আমাদের আপনার সমর্থন দরকার। আপনার প্রতিটি অবদান আমাদের ভবিষ্যতের জন্য মূল্যবান।

এখনই অবদান রাখুন (Contribute Now)