केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना (PMGKAY) योजना आणखी तीन महिन्यांसाठी वाढवण्याची घोषणा केली. या योजनेअंतर्गत देशातील 80 कोटी लोकांना मोफत रेशन दिले जाते. ही योजना 30 सप्टेंबर रोजी संपणार होती, परंतु आता मंत्रिमंडळाने ती आणखी तीन महिन्यांसाठी म्हणजेच डिसेंबर 2022 पर्यंत वाढवली आहे.
केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी ही माहिती दिली. योजनेच्या विस्तारानंतर, त्यात समाविष्ट असलेला खर्च अंदाजे 44,700 कोटी रुपये आहे. मार्च 2020 मध्ये कोरोनाच्या काळात प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना सुरू करण्यात आली. या अंतर्गत बीपीएल श्रेणीतील कुटुंबांना मोफत रेशनची सुविधा मिळते. याअंतर्गत प्रत्येक व्यक्तीला दर महिन्याला 4 किलो गहू आणि 1 किलो तांदूळ मोफत दिला जातो.
आतापर्यंत या योजनेचा अनेक वेळा विस्तार करण्यात आला आहे. यापूर्वी मार्च 2022 मध्ये मोफत रेशनची ही योजना एप्रिल-सप्टेंबर 2022 पर्यंत सहा महिन्यांसाठी वाढवण्यात आली होती. ही योजना लागू झाल्यापासून अनुदानित धान्याव्यतिरिक्त रेशन दुकानातून मोफत रेशन दिले जाते. या योजनेमुळे कोरोनाच्या काळात गरीब कुटुंबांना मोठी मदत झाली आहे.
लसीकरण झालेल्या बैलांना शर्यतीस परवानगी मिळणार? बैलगाडा चालकांची मागणी
याशिवाय मंत्रिमंडळाने अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. केंद्र सरकारी कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी महागाई भत्ता (DA) 4 टक्क्यांनी वाढवण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. छत्रपती शिवाजी आणि अहमदाबाद रेल्वे स्थानकांच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारने 10,000 कोटी रुपयांची तरतूद केल्याची माहिती केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली.
सध्या एकूण 199 रेल्वे स्थानकांच्या पुनर्बांधणीचे कामही सुरू आहे. नवी दिल्ली रेल्वे स्टेशन, सीएसएमटी रेल्वे स्टेशन, अहमदाबाद रेल्वे स्टेशनसह एकूण 199 स्थानकांच्या पुनर्विकासासाठी 60,000 कोटी रुपये खर्च येणार आहे. याशिवाय मंत्रिमंडळाने दिल्ली रेल्वे स्थानक बस, ऑटो आणि मेट्रो रेल्वे सेवांसोबत रेल्वे सेवा एकत्रित करण्याचा निर्णय घेतला आहे.
मेहंदी शेतीतून करोडोंची कमाई, प्रत्येक ऋतूमध्ये मागणी असणारे एकमेव पीक
अहमदाबाद रेल्वे स्थानकाची पुनर्रचना मोडेराच्या सूर्यमंदिरापासून प्रेरित असून सीएसएमटीच्या हेरिटेज इमारतीत बदल केला जाणार नसून, आजूबाजूच्या इमारतींचा पुनर्विकास करण्यात येणार असल्याची माहितीही रेल्वेमंत्री वैष्णव यांनी दिली. अशाप्रकारे अनेक निर्णय या बैठकीत घेण्यात आले आहेत.
महत्वाच्या बातम्या;
केंद्र सरकारची घोषणा! शेतकऱ्यांना देणार 5 लाख, वाचा काय आहे योजना..
जमिनीचे भूसंपादन नाही शेतकऱ्यांना पैसे नाहीत, तरीही महामार्ग तयार
शेतकरी आता पीक नुकसानीचा स्वताच पंचनामा करणार, कोणीही राहणार नाही मदतीपासून वंचीत
Share your comments