महाराष्ट्रातील (Maharashtra) शेतकऱ्यांच्या पाठीमागील संकटे काही कमी होताना दिसत नाहीत. त्यामुळे राज्यातील शेतकरी (Farmers) आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. हाच मुद्दा पावसाळी अधिवेशनात विरोधकांनी लावून धरला होता. शेतकरी आत्महत्येचे (Farmer suicide) प्रमाण कमी व्हावे तसेच शेतकऱ्यांना आर्थिक हातभार लागावा यासाठी राज्य आणि केंद्र सरकार अनेक योजना राबवत आहे.
राज्य सरकार (State Govt) शेकऱ्यांसाठी प्रोत्सहानपर म्हणून ५० हजारांचे अनुदान (50 thousand grant) देणार असल्याची घोषणा केली आहे. नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना हे अनुदान देण्यात येणार आहे. लवकरच राज्य सरकार शेतकऱ्यांच्या खात्यात ५० हजार रुपये अनुदान वर्ग करण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळत आहे.
या अनुदानाचा लाभ फक्त नियमित कर्जफेड (Regular loan payments) करणारे शेतकरीच घेऊ शकणार आहेत. त्यासाठीही सरकारने काही अति आणि शर्ती लागू केल्या आहेत. चला तर जाणून घेऊया तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात की अपात्र आहात जाणून घेऊया...
महिंद्राच्या या दमदार इलेक्ट्रिक कारमध्ये आहेत धमाकेदार फीचर्स; सिंगल चार्जमध्ये धावेल ४५० किमी
कर्जमुक्तीचा लाभ देत असताना वैयक्तिक शेतकरी हा निकष गृहीत धरण्यात येईल.शासन निर्णय क्रमांकः प्रोअयो ०६२२/प्र.क्र.७२/२स या योजनेसाठी केवळ राष्ट्रीयकृत बँका, खाजगी बँका, ग्रामीण बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका व विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थांनी (बँकांकडून कर्ज घेऊन किंवा स्वनिधीतून) शेतकऱ्यांना दिलेले अल्पमुदत पीक कर्ज विचारात घेण्यात येईल.
50 हजार प्रोत्साहन पात्र शेतकरी कोण
सन २०१९ वर्षामध्ये राज्यात झालेल्या अतिवृष्टी व महापूरामुळे नुकसान झाल्याने नैसर्गिक आपत्ती अंतर्गत कर्जमाफीचा लाभ मिळालेले शेतकरी सुद्धा सदर योजनेस पात्र असणार आहेत. तसेच एखादा शेतकरी मयत झाल्यानंतर त्यांच्या वारसांनी कर्जाची परतफेड केली असल्यास वारस सुद्धा प्रोत्साहनपर योजनेचा लाभ घेऊ शकतात.
आनंदाची बातमी! कच्चा तेलाच्या किमतीत मोठी घसरण; पेट्रोल डिझेलही स्वस्त, जाणून घ्या नवे दर...
सदर कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळण्यास खालील व्यक्ती पात्र असणार नाहीत :-
महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना २०१९ अंतर्गत कर्जमाफीचा Crop Insurance लाभ मिळालेले शेतकरी या योजनेसाठी अपात्र आहेत. महाराष्ट्र राज्यातील आजी/माजी मंत्री/राज्यमंत्री, आजी/माजी लोकसभा/राज्यसभा सदस्य,आजी/माजी विधानसभा/विधान परिषद सदस्य हेदखील या योजनेसाठी अपात्र असणार आहेत.
महत्वाच्या बातम्या:
महाराष्ट्रातील अनेक भागात पावसाची मुसळधार बॅटिंग! अनेक नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी
खुशखबर! केंद्र सरकार पीएम किसान योजने व्यतिरिक्त शेतकऱ्यांना देतंय ३६ हजार रुपये; अशी करा नोंदणी
Share your comments