पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना अर्थात पीएम किसान योजना ही आजपर्यंतच्या सगळ्या योजनांपैकी एक यशस्वी योजना असून या योजनेच्या माध्यमातून वार्षिक सहा हजार रुपये तीन हप्त्यात विभागून शेतकऱ्यांच्या खात्यात थेट वर्ग करण्यात येतात. आतापर्यंत या योजनेच्या माध्यमातून 11 हप्ते शेतकऱ्यांना देण्यात आली असून आता सर्व लाभार्थी बाराव्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत.
परंतु या आधी आपल्याला माहित आहेच की, या योजनेमध्ये सरकारने बर्याच प्रकारचे बदल केले असून या केलेल्या बदलानुरूप व्यवस्थित कागदपत्रांची पूर्तता किंवा ई-केवायसी 31 ऑगस्टपर्यंत करून घेणे देखील महत्त्वाचे आहे.
जेणेकरून तुमचा येणारा 12 वा हप्ता हा न अडकता तुम्हाला मिळू शकेल. परंतु आता प्रश्न आहे की अकरावा हप्ता आला परंतु आता बारावा हप्ता कधी येईल? परंतु याबाबतीत जर आपण काही मीडिया रिपोर्टचा विचार केला तर सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात बाराव्या हप्त्याचे पैसे शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यात येण्याची शक्यता आहे.
नक्की वाचा:PM Kisan Yojana: पीएम किसान योजनेसंदर्भात अडचणी येत आहेत? करा फक्त एकच काम..
ई केवायसी करणे बंधनकारक
केंद्र सरकारने ई-केवायसी करणे बंधनकारक केले असून जर तुम्ही अजून पर्यंत ई-केवायसी केली नसेल तर तुम्ही येणाऱ्या लाभापासून वंचित राहू शकतात त्यामुळे सरकारने यासाठीची मुदतवाढ केली आहे म्हणजे शेतकऱ्यांना एकदिलासा मिळाला आहे.31 जुलै ई-केवायसी करण्याची शेवटची तारीख होती परंतु सरकारने यामध्ये वाढ करत ती आता 31 ऑगस्ट 2022 पर्यंत वाढवली आहे
त्यामुळे तुम्ही या तारखेपर्यंत तुमचे राहिलेली ई केवायसी पूर्ण करू शकतात आणि विनाअडथळा तुम्हाला मिळणारा लाभ तुम्ही मिळवु शकता. ई केवायसी करण्यासाठी तुम्ही तुमच्या नजीकच्या कॉमन सर्विस सेंटरवर जाऊन करू शकतात किंवा तुमच्या मोबाईलच्या माध्यमातून देखील घरबसल्या ई केवायसी करता येते.
Share your comments