मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवल्या आहेत. यामध्ये पीएम किसान योजना ही एक महत्वपूर्ण योजना आहे. यामध्ये शेतकऱ्यांना आर्थिक मदत म्हणून पैसे दिले जातात. आतापर्यंत या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांच्या खात्यावर १० हप्ते जमा झाले आहेत. आता ११ व्या हप्ता कधी जमा होणार याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले होते. आता 11 व्या हप्त्यासाठी अक्षय तृतीयाचे मुहूर्त साधले जाणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
यामुळे आता याकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. यापूर्वीचा 10 हप्ता बरोबर नववर्षाच्या पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला होता. यानंतर योजनेत अनेक मोठे बदल करण्यात आले होते. अनेकांची नावे यामधून हटवण्यात आली होती. अनेकांनी नियमांना बगल देत याचा फायदा घेतला होता. यामुळे त्यांच्याकडून हे पैसे पुन्हा वसूल केले जाणार आहेत.
आता मे महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात शेतकऱ्यांच्या खात्यावर 2 हजार रुपये जमा होऊ शकतात. गतवर्षीही मे महिन्यातच ही रक्कम शोतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आली होती. याबाबत राज्य शासनाकडून याद्यांची पूर्तता करण्यात आली आहे. यामुळे याची प्रक्रिया पूर्ण झाली आहे. आता फक्त शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसे जमा व्हायचे बाकी आहेत.
औपचारिकरित्या पंतप्रधान नरेंद्र मोदीच ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करणार आहेत. ही योजना केंद्र सरकारची असली तरी यामध्ये राज्य सरकार याच्या याद्यांची पूर्तता करते. ११ व्या हप्त्यासाठी तुम्ही पात्र आहात की नाही हे बघण्यासाठी तुम्हाला तुमचे पीएम किसानचे खाते चेक करावे लागणार आहे. यावर Rft Signed By State For 11th Installment असा उल्लेख असेल तरच तुम्हाला याचा लाभ घेता येणार आहे.
महत्वाच्या बातम्या;
आता पशुधन विमा योजना लवकरच होणार सुरु, अनेकांना होणार फायदा
क्षणात झाले होण्याचे नव्हते, कोकणातील शेतकरी मोठ्या संकटात
शेतकऱ्यांनो 'या' म्हशीच्या जातींचे करा संगोपन, होईल बक्कळ फायदा..
Share your comments