केंद्र सरकार आणि राज्य सरकार (state government) शेतकऱ्यांसाठी नवनवीन योजना राबवत असते, ज्यामधून शेतकऱ्यांना चांगला फायदा मिळतो. आता केंद्र सरकारने आणखी एक दिलासादायक निर्णय घेतला आहे.
केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री पशुपती कुमार पारस यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या मंत्रालयाने आज आत्मनिर्भर भारत मोहिमेअंतर्गत पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (PMFME) लाँच केली आहे.
या योजनेअंतर्गत 10 लाख रुपयांच्या कमाल अनुदान मर्यादेसह सूक्ष्म अन्न प्रक्रिया युनिट्सच्या स्थापनेसाठी 35 टक्के क्रेडिट लिंक्ड सबसिडी आणि सामान्य पायाभूत सुविधांसाठी जास्तीत जास्त 3 कोटी रुपये अनुदान दिले जात आहे. या योजनेचा आतापर्यंत अन्न प्रक्रिया कार्यात गुंतलेल्या सुमारे 62 हजार लोकांना लाभ झाला आहे.
फक्त 50 रुपयांच्या छोट्या गुंतवणुकीत मिळवा चांगला नफा; ग्रामीण पोस्टल योजना करतेय मालामाल
देशातील सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योगांना चालना देण्यासाठी आर्थिक, तांत्रिक आणि व्यावसायिक सहाय्य प्रदान करणे हा या योजनेचा उद्देश आहे. नवीन मायक्रो फूड एंटरप्राइझ स्थापन करण्यासाठी किंवा सध्याच्या युनिट्सच्या अपग्रेडेशनसाठी या योजनेअंतर्गत सुमारे 7,300 कर्ज मंजूर करण्यात आले आहेत.
यापैकी सुमारे 60 टक्के पात्र लाभार्थी प्राथमिक कृषी उत्पादनात गुंतलेले आहेत आणि त्यांना बँकांकडून आकारण्यात येणाऱ्या व्याज दरावर 3 टक्के अतिरिक्त व्याज सवलत मिळत आहे.
LIC च्या नवीन पेन्शन योजने संबंधित खास 10 महत्वाच्या गोष्टी; जाणून घ्या
अनुदान मिळणे सोपे झाले
नरेंद्र सिंह तोमर म्हणाले की, पंतप्रधान सांगत आहेत की सर्व मंत्रालयांनी एकत्र काम करावे आणि एकतर्फी विचार करू नये, जेणेकरून लोकांना विविध योजनांचा लाभ मिळू शकेल. शेतकरी प्रधानमंत्री सूक्ष्म अन्न उपक्रम उन्नती योजना (PMFME) अंतर्गत अर्ज करून सबसिडीचा लाभ मिळवू शकतात.
महत्वाच्या बातम्या
भारतातील 5 टॉप देशी गायींचे करा पालन; एका गाईचे पालन केले तरी होईल भरपूर कमाई
आनंदाची बातमी; नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यात ४८ लाख ४९ हजार रुपयांचा निधी वाटप
शेतकऱ्यांनो पुढचे 2 दिवस पावसाचा जोर कायम; कापूस, तूर, भुईमूग पिकांची अशी घ्या काळजी
Share your comments