1. यांत्रिकीकरण

Tractor News: शेतकरी बंधूंनो! शेतातील आणि फळबागातील छोट्या कामांसाठी मिनी ट्रॅक्टर घ्यायचा प्लान आहे का? तर 'हे' ट्रॅक्टर ठरेल तुमच्या फायद्याचे

जर आपण ट्रॅक्टरचा विचार केला तर शेतकऱ्यांसाठी सगळ्यात जास्त उपयोगात पडणारे यंत्र असा त्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की शेतीची सगळी कामे मग ती पूर्व मशागतीपासून असो की पिकांची आंतरमशागत किंवा पिकांची काढणी पर्यंतचे कामांसाठी ट्रॅक्टरचा उपयोग आता होऊ लागलेला आहे. तसेच इतर शेती यंत्रे जे शेतीसाठी उपयोगी आहेत तेसुद्धा ट्रॅक्टरचलित असल्यामुळे त्यांचा वापर करताना ट्रॅक्टरची आवश्यकता भासते.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
vst 932 super mini tractor

vst 932 super mini tractor

जर आपण ट्रॅक्टरचा विचार केला तर शेतकऱ्यांसाठी सगळ्यात जास्त उपयोगात पडणारे यंत्र असा त्याचा उल्लेख आपल्याला करता येईल. कारण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की शेतीची सगळी कामे मग ती पूर्व मशागतीपासून असो की पिकांची आंतरमशागत किंवा पिकांची काढणी पर्यंतचे कामांसाठी ट्रॅक्टरचा उपयोग आता होऊ लागलेला आहे. तसेच इतर शेती यंत्रे जे शेतीसाठी उपयोगी आहेत तेसुद्धा ट्रॅक्‍टरचलित असल्यामुळे त्यांचा वापर करताना  ट्रॅक्टरची आवश्यकता भासते.

परंतु यामध्ये जर आपण खास फळबागांचा विचार केला तर फळबागांमध्ये बरीचशी कामे तसेच बागांचे अंतरमशागत असो की बागेवर करायची फवारणी यासाठी मिनी ट्रॅक्टर खूप महत्त्वाचे आहे.

नक्की वाचा:Tractor News: शेतीकामासाठी किफायतशीर आणि शेतकऱ्यांना फायद्याचे 'हे'ट्रॅक्टर ठरेल शेतकऱ्यांसाठी वरदान, वाचा याची वैशिष्ट्ये आणि किंमत

यामुळे अनेक फळबागायतदार मिनी ट्रॅक्टर घेतात. परंतु बाजारात जर आपण विचार केला तर अनेक कंपन्यांचे मिनी ट्रॅक्टर उपलब्ध असून त्यामुळे व्यक्ती गोंधळात पडते आणि कोणते घेऊ आणि कोणते नको असे होऊन जाते. त्यामुळे या लेखामध्ये आपण शेतकऱ्यांना फायद्याचे ठरेल अशा मिनी ट्रॅक्टर विषयी थोडक्यात माहिती घेणार आहोत.

 शेतकऱ्यांना फायद्याचे मिनी ट्रॅक्टर आहे 'व्हीएसटी ट्रॅक्टर' हे होय

 व्हीएसटी ट्रॅक्टर टीलर्स ही भारतातील सर्वात जुन्या ऑटोमोबाईल कंपन्यांपैकी एक असून ही कंपनी अनेक दमदार मिनी ट्रॅक्टर बनवते. तसाच या कंपनीचा 'व्हीएसटी 932 शक्ती सुपर' ट्रॅक्टर हा लहान शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वपूर्ण आहे. हा ट्रॅक्टर 30 एचपीचा असून त्याची उच्च इंजिन क्षमता आणि कार्यक्षम मायलेज यासाठी शेतकऱ्यांमध्ये खूप लोकप्रिय आहे.

या ट्रॅक्‍टरची इंजिन क्षमता दमदार असल्यामुळे ते बराच वेळपर्यंत शेतामध्ये काम करण्यास सक्षम आहे. या ट्रॅक्टर मध्ये पावर स्टेरिंग सह याची सेटिंग म्हणजेच आसन व्यवस्था खूप शेतकऱ्यांना आधार ठरेल अशा पद्धतीने बनवण्यात आली आहे.

नक्की वाचा:Tractor News: 'या' कंपनीचे 'हे'दोन ट्रॅक्टर ठरतील शेती आणि शेतकऱ्यांसाठी वरदान, वाचा किंमत आणि आकर्षक वैशिष्ट्ये

तसेच या ट्रॅक्टरमध्ये ऑइल ब्रेक असून ट्रॅक्टरचा प्लॅटफॉर्म फारच मोठा आहे. व्हीएसटी 932 सुपर ट्रॅक्टर मध्ये सिंक्रोमेश प्रकारचे ट्रान्समिशन असून यामध्ये 9 फॉरवर्ड गिअर्स आणि तीन रिव्हर्स गिअर आहेत.  जर आपण या ट्रॅक्टरचा कमाल वेगाचा विचार केला तर तो 1.79 ते 22.3 किलोमीटर प्रतितास इतका असून यामध्ये डबल क्लच देण्यात आला आहे.

या ट्रॅक्टरचे वजन उचलण्याची म्हणजेच हायड्रोलिक क्षमता 1250 किलोग्रॅम आहे. पीटीओ पावर 25 एचपीची असून त्याची डिझेल टाकी पंचवीस लिटरची आहे. या ट्रॅक्टरमध्ये चार डब्ल्यूडी टायर दिलेले आहेत.

 किती आईला ट्रॅक्टर ची किंमत?

 आपण भारतीय बाजारपेठेचा विचार केला तर व्हीएसटी 932 सुपर ट्रॅक्टरची किंमत पाच लाख चाळीस हजार ते पाच लाख 70 हजार रुपयांच्या दरम्यान आहे.

नक्की वाचा:आता सरकारकडून फळबागांची लागवड करण्यासाठी तब्बल 100 टक्के अनुदान; असा घ्या लाभ

English Summary: vst 932 shakti super is so benificial mini tractor for farmer and farming works Published on: 20 October 2022, 05:08 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters