शेतीतील यांत्रिकीकरणाचा विचार केला तर सगळ्या प्रकारच्या कृषी यंत्रांमध्ये आपल्या डोळ्यासमोर येते ट्रॅक्टर हे होय. कारण ट्रॅक्टरचा वापराशिवाय शेती हा विचारच करता येऊ शकत नाही. कारण अगदी हंगामाच्या सुरुवातीला शेतीची पूर्व मशागत, पीक लागवड तसेच आंतरमशागतीची काम व पिक काढण्याच्या कामांसाठी ट्रॅक्टरचा उपयोग फार मोठ्या प्रमाणावर होतो. तसेच शेतमाल ने-आण करण्यासाठी देखील ट्रॅक्टर हे आवश्यक आहे.
म्हणजे एकंदरीत विचार केला तर शेतकऱ्यांच्या सोबत ट्रॅक्टर शेतीत राबत असते असे म्हटले तरी ते वावगे ठरणार नाही.
जर आपण ट्रॅक्टरचा विचार केला तर अनेक वेगवेगळ्या नामांकित कंपन्यांचे ट्रॅक्टर बाजारपेठेत आहेत व प्रत्येक कंपनीच्या ट्रॅक्टरचे वेगवेगळे वैशिष्ट्य आहेत. या पार्श्वभूमीवर आपण या लेखात शेतकऱ्यांसाठी अगदी फायदेशीर आणि किफायतशीर किमतीत मिळणाऱ्या या स्वराज्य कंपनीच्या काही ट्रॅक्टर मॉडेलची माहिती घेणार आहोत.
हे आहेत स्वराज कंपनीचे शेतकऱ्यांसाठी उपयुक्त आणि फायदेशीर ट्रॅक्टर
1- स्वराज्य 855 डीटी प्लस- जर आपण स्वराज्य कंपनीच्या या ट्रॅक्टरचा विचार केला तर हे एक सर्वोत्कृष्ट ट्रॅक्टर असून त्याची क्षमता 22 एचपीची आहे. ट्रॅक्टर मध्ये तीन सिलेंडर आणि दोन हजार सीसी क्षमतेचे इंजिन देण्यात आले आहे.
जर या ट्रॅक्टरचे ट्रान्समिशनचा विचार केला तर या ट्रॅक्टरला पुढे आठ गियर आणि रिव्हर्स दोन गिअर आहेत. या ट्रॅक्टरची वजन उचलण्याची म्हणजेच हायड्रोलिक क्षमता 1700 किलोग्रॅम असून या ट्रॅक्टरची किंमत सात लाख 35 हजार ते सात लाख 80 हजार इतकी आहे.
2- स्वराज्य 724 एक्सम- हे 25 एचपी क्षमतेचे स्वराज कंपनीचे सर्वोत्कृष्ट कमी बजेट ट्रॅक्टर आहे. ह्या ट्रॅक्टरमध्ये दोन सिलेंडर देण्यात आले असून इंजिन क्षमता 1824 सीसी आहे.
या ट्रॅक्टरचा ट्रान्समीशनचा विचार केला तर आठ फॉरवर्ड आणि दोन रिव्हर्स गिअर आहेत. या ट्रॅक्टरची वजन उचलण्याची क्षमता साधारण एक हजार किलो एवढी असून या ट्रॅक्टरची किंमत तीन लाख 75 हजार रुपये एवढी आहे.
नक्की वाचा:शेतीकामासाठी सर्वोत्तम भारतातील टॉप 5 ट्रॅक्टर; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये
Share your comments