ऑनलाईन सोडतीवर मिळेल ट्रॅक्टर; वशिलेबाजीला बसेल आळा

27 August 2020 07:37 PM By: भरत भास्कर जाधव


कृषी यांत्रिकीकरण योजनेचे संपुर्ण कामकाज ऑनलाईन नेणारा प्रकल्प अंतिम टप्प्यात आहे. त्यामुळे राज्यात यंदा अवजारे अनुदासाठी म्हाडात काढण्यात येणाऱ्या सोडती पद्धतीने काढले जाणार असल्याचे माहिती सुत्रांनी दिली आहे. यांत्रिकीकरण अनुदान योजना १ जुलैपासून महाडीबीटीत आणली गेली आहे. तथापि, शेतकरी सध्या फक्त ऑनलाईन अर्ज करु शकतात. या अर्जावरील प्रशासकीय कामकाज मात्र ऑनलाईन केले जात नाही. कृषी सचिव एकनाथ डवले यांच्या मार्गदर्शनाखाली उपसचिव प्रकाश आंडगे यांनी या प्राणालीचे काम पूर्ण केले आहे.

या योजनेची नवी नियमावली लवकरच जाहीर होणार आहे. उद्दिष्ट वाटप व सोडत ही दोन्ही कामे आता ऑनलाईन होणार असल्याने वशिलेबाजीला आळा बसेल व शेतकऱ्यांना खुल्या बाजारातून छोटी अवजारे खरेदीला प्रात्सोहन मिळेल. पोर्टलवरच शेतकरी अर्ज भरुन बिले अपलोड करतील. मोका तपासणी, बिले मंजुरीची कामे पोर्टलवरच होतील. शेतकऱ्याने अवजार खरेदीचे बिल अपलोड करताच तीस दिवसात अनुदान जमा होईल. यंदा असे ६२ कोटी रुपये वितरित केले जाणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली. शेतकऱ्यांसाठी  आधार नंबर सक्तीचा केल्याने बनवाबनवीला  आळा बसणार आहे, केंद्राच्या यादीतील सर्व छोटीमोठी अवजारे यंदा योजनेत आणली गेली आहेत. विळ्या, खुरप्यापासून ते ट्रॅक्टरपर्यंत अनुदासाठी तीन प्रकारच्या सोडती असतील.

ट्रॅक्टर पॉवर टिलरसाठी एक मनष्यचिलत व बैलचलित अवजारांसाठी दुसरी लॉटरी  काढली जाणार आहे.  तिसरी लॉटरी टॅक्टर- टिलरचलित अवजारांची असेल. दिवाळीच्या आसपास या योजनेचा लाभ शेतकऱ्यांना मिळण्याची शक्यता आहे.  दरम्यान सार्वजिनक सुविधा केंद्रावर शेतकऱ्यांना या योजनेसाठी अर्ज भरता येतील. अर्ज दाखल केल्यापासून ते अनुदान मिळेपर्यंत सर्व प्रक्रियेचे एसएमएस शेतकऱ्यांना मोबाईलवर पाठविले जाणार आहेत. त्यामुळे मध्यस्थी तसेच शासकीय कार्यालयांमधून होणारी वशिलेबाजी थांबेल.

online draw ऑनलाईन सोडत tractors Tillers कृषी यांत्रिकीकरण Agricultural Mechanization शेती अवजारे Farming Equipment farm mechianization
English Summary: Tractors will be available at the online draw

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.