वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे पावसाचे पाणी जमा करणे. ही संकल्पना भारतात प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे. बुंदेला चौक, कुंडी, तालाब, कुल, बावडी, कुंड, तलाई अशी अनेक नावे आहेत. जमिनीवर आणि इमारतींच्या छपरांवर पडणारे पावसाचे पाणी अशा दोन ठिकाणांहून शहरात पाणी मिळू शकते.
कसे करावे रेनवॉटर हार्वेस्टिंग शहरी भागात पावसाचे पाणी दोन ठिकाणांहून मिळू शकत
१)जमिनीवर पडलेले पाणी जमिनीवर पडलेला पाऊस आपल्याला शंभर टक्के गोळा करता येत नाही. त्यातील थोडाफार जमिनीत मुरतो. काहीचे बाष्पीभवन होते, तर काही वाहून जाते. त्यामुळे आपल्याला अंदाजे ५० टक्के पाऊस जमा करता येतो. आपण अंदाजे ०.८५ इतका जास्तीत जास्त पाऊस गोळा करू शकतो.
२)इमारतींच्या छपरावर पडणारे पाणी जर आपल्याकडे ५०० चौरस मीटरचा प्लॉट आहे. त्यावर १०० चौरस मीटरचे बांधकाम आहे. त्यावर पडणारे पाणी किती असेल व ते आपल्याला किती मिळेल, याचा विचार करावा. छतावर पडणारे पाणी तुलनेने खूपच स्वच्छ, शुद्ध असते. पहिल्या पावसाचे पाणी सोडून देऊन पुढील पाऊस अडवून आपण ते एखाद्या हौदात साठवू शकतो. एवढे पाणी साठविणे हे खर्चाचे असल्याने आपल्याला लागेल तेवढेच पाणी साठवून उरलेले पाणी बोअरवेलच्या पुनर्भरणासाठी वापरता येईल. पाणी साठविण्यासाठी कॉंक्रीट, वीट, सिंटेक्सब किंवा फेराक्रिट या कोणत्याही प्रकारात हौद बांधता येतो.
हे पाणी कुंड्यांना, बागेला, गाड्या धुण्यासाठी व इतर सफाईसाठी वापरता येते. जिथे पाण्याची खूप कमतरता आहे, तिथे त्याची गुणवत्ता बघून ते शुद्ध करून पिण्यासाठीही वापरता येते. पाणी शुद्ध राहण्यासाठी हौदाला झाकण हवे व तेथे सूर्यप्रकाश आत जाणार नाही, याची काळजी घ्यावी. बोअरवेल किंवा विहीर नसल्यास आपल्या परिसरातील एखाद्या बोअरवेलमध्ये सामूहिक पद्धतीने पुनर्भरण करता येईल अथवा झिरप खड्डा तयार करून, जमिनीत चर खणून, झाडे लावूनही पाणी मुरविता येते.
कूपनलिका पुनर्भरण कसे करावे?
पावसाचे पाणी कूपनलिकेत सोडणे म्हणजेच कूपनलिका पुनर्भरण होय.कूपनलिकेजवळ नाला अथवा ओढ्याचे पाणी वळवावे. (ओढ्याचे पाणी क्षार व रसायनविरहित हवे)
कूपनलिकेच्या सभोवताली दोन मीटर रुंद व दोन मीटर खोल आकाराचा खड्डा खोदावा.
खड्ड्यातील उंचीएवढ्या केसिंग पाइपच्या भागात एक-दोन सें. मी. अंतरावर सर्व बाजूंनी विशिष्ट व्यासाची छिद्रे पाडावीत.
या छिद्रांवर नारळदोरी (काथ्या) घट्ट गुंडाळावी.खड्ड्याचे चार भागांत विभाजन करून सर्वांत खालच्या भागात दगडगोटे, त्यावरील भागात खडी, त्यानंतरच्या भागात वाळूची चाळ व सर्वांत वरच्या भागात बारीक वाळू भरावी.अशा प्रकारे ओढ्याचे अथवा नाल्याचे गढूळ पाणी गाळणीतून स्वच्छ होऊन कूपनलिकेत जाईल आणि कूपनलिकेचे पुनर्भरण होईल.
विहीर पुनर्भरण कसे करावे.
पाणलोट विहिरी, विंधन विहिरी, भूजल स्रोतांचे पुनर्भरण करण्याच्या दृष्टीने विहिरीजवळ गाळप उपचार करावेत. प्रारंभीच्या गाळप उपचाराचा विसर्ग, जाड वाळूच्या दुसऱ्या गाळप उपचाराद्वारा विहिरीत सोडण्यात यावा. गाळप उपचारांचे नियोजन विहिरीलगतच्या भूपृष्ठाच्या पातळीपेक्षा खालच्या स्तरात करण्यात यावे. विहिरी क्षेत्राच्या उंच भागात असल्यास क्षेत्राच्या नैसर्गिक खोल भागात गाळप उपचार घेण्यात येऊन सिमेंट वा प्लॅस्टिक पाइप (सहा इंच व्यास) अथवा बंद चराद्वारा विहिरीत योग्य खोलीवर जोडण्यात यावेत.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ : इंटरनेट
Share your comments