यांत्रिकीकरण हा सगळ्या क्षेत्रात अविभाज्य भाग होऊन बसला आहे. याला शेतीक्षेत्र देखील अपवाद नाही. आपल्याला माहित आहेच कि शेताची कामे करताना खूप वेळ आणि कष्ट लागतात. परंतु आता कृषी क्षेत्रामध्ये देखील विविध कामांसाठी यांत्रिकीकरणाचे वारे वाहू लागले आहेत. मग ते विविध प्रकारची पिके असो की फळबागा यांच्यासाठी विशिष्ट कामांसाठी वेगवेगळ्या पद्धतीचे यंत्रे विकसित करण्यात आले आहेत.
नक्की वाचा:Agri Machinary: पिकांना सारख्या प्रमाणात खते द्यायचे असतील तर वापरा 'हे' यंत्र,होईल फायदा
शेतकरी बंधू आता शेतीची पूर्व मशागत असो कि पिकांची आंतरमशागत ते काढणी पर्यंतची सगळी कामे यंत्राच्या साहाय्याने करू लागले आहेत. यंत्राच्या वापरामुळे वेळेत बचत तर होतेच परंतु कष्ट देखील कमी लागतात व काम देखील अगदी वेळेवर होते.
बऱ्याच प्रकारच्या यंत्र विकसित करण्याच्या कामात विविध कृषी विद्यापीठांचा मोलाचा सहभाग आहे. असेच एक यंत्र महात्मा फुले कृषी विद्यापीठाने ऊस पिकाच्या तण नियंत्रण तसेच खत देण्यासाठी व उसाची बांधणी इत्यादी कामांसाठी विकसित केले आहे. उसाला भर देण्यासारखे कष्टाचे काम आणि दाणेदार खतांच्या पेरणीसाठी देखील हे यंत्र वापरता येते. या यंत्राची या लेखात आपण माहिती घेऊ.
महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे फुले ऊस आंतरमशागत यंत्र
ऊस पिकामध्ये विविध प्रकारची कामे करावी लागतात. यामध्ये प्रामुख्याने आंतरमशागत उसाला भर देणे किंवा बाळबांधणी इत्यादी कामेही खूप कष्टाचे असतात. परंतु महात्मा फुले कृषी विद्यापीठाने विकसित केलेले ट्रॅक्टरचलित फुले ऊस अंतरमशागत यंत्राचा शेतकऱ्यांना खूप फायदा होऊ शकतो.
या यंत्राच्या साह्याने ऊसाच्या आंतरमशागत करताना मातीचा वरचा थर देखील मोकळा करता येतो व मातीची भर ऊस पिकाला चांगल्या पद्धतीने देता येते. दाणेदार खताची पेरणी देखील योग्य पद्धतीने होते व ही कामे एकाच वेळी केली जातात.
आपल्याला माहित आहेच की आपण जेव्हा खत देतो तेव्हा एक तर ते उसात फेकतो. त्याचा कितपत उपयोग पिकाला होतो हा एक संशोधनाचा विषय आहे. परंतु या यंत्राच्या साह्याने दाणेदार खताची पेरणी करता येत असल्यामुळे खते उसाच्या मुळाशी जाते त्यामुळे पिकांना त्याचा चांगला फायदा होऊन उसाची चांगली वाढ होते.
ज्या उसाची लागवड एकशे वीस सेंटीमीटर पेक्षा जास्त अंतरावर आहे अशा उसामध्ये हे यंत्र वापरायला सोपे आहे. यंत्र ट्रॅक्टरचलित असून 18.5 अश्व शक्ति पेक्षा जास्त ट्रॅक्टरच्या साह्याने हे वापरता येते.
नक्की वाचा:Machinary: 'ट्रॅक्टरचलित फुले बहुपीक टोकण यंत्रा'चे फायदे आणि शेतकऱ्यांना होणारा फायदा
Share your comments