1. यांत्रिकीकरण

Farming Technology : हा रोबो करेल दिवसाला 50 एकर क्षेत्रावरील तणावर फवारणी, वाचा काय आहे नेमके तंत्रज्ञान?

Farming Technology :- सध्या कृषी क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर तंत्रज्ञानाचा शिरकाव झाला असून शेतीतील अनेक प्रकारचे कामे आता यंत्रांच्या साह्याने आणि तंत्रज्ञानाचा वापराने सोपे झाले आहेत. त्यामुळे वेळ आणि पैसा दोन्हींमध्ये मोठ्या प्रमाणावर बचत होत असून शेतकऱ्यांचे उत्पादन वाढण्यात यामुळे नक्कीच मदत होणार आहे. कारण सध्या मजूरटंचाई ही शेती समोरील फार मोठी समस्या असून मजुरांच्या अभावी अनेकदा वेळेवर कामे करता येणे अशक्य होते व त्याचा निश्चितच उत्पादनावर विपरीत परिणाम होतो.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
robo technology for crop sprey

robo technology for crop sprey

 Farming Technology  :- सध्या कृषी क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर तंत्रज्ञानाचा शिरकाव झाला असून शेतीतील अनेक प्रकारचे कामे आता यंत्रांच्या साह्याने आणि तंत्रज्ञानाचा वापराने सोपे झाले आहेत. त्यामुळे वेळ आणि पैसा दोन्हींमध्ये मोठ्या प्रमाणावर बचत होत असून शेतकऱ्यांचे उत्पादन वाढण्यात यामुळे नक्कीच मदत होणार आहे. कारण सध्या मजूरटंचाई ही शेती समोरील फार मोठी समस्या असून मजुरांच्या अभावी अनेकदा वेळेवर कामे करता येणे अशक्य होते व त्याचा निश्चितच उत्पादनावर  विपरीत परिणाम होतो.

या अनुषंगाने तंत्रज्ञानाचा वापर आणि यंत्राचा वापर वाढल्यामुळे नक्कीच मजूर टंचाईच्या समस्येवर मात करणे शक्य झाले आहे. मजूर टंचाई सोबतच मजुरीचे दर देखील प्रचंड प्रमाणात वाढल्याने शेतकऱ्यांना ते परवडेनासे झाले आहे. त्यामुळे शेतकरी या समस्यांनी बऱ्याचदा त्रस्त असतात. याच पार्श्वभूमीवर आता वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा विचार केला तर एआय तंत्रज्ञान अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञान खूप फायद्याचे ठरणार असून शेतीला देखील ते उपयोगी ठरू शकते.

 सॉलिक्स स्प्रेअर या कंपनीने फवारणी करता विकसित केला रोबो

 आर्टिफिशल इंटेलिजन्स या तंत्रज्ञानाने आता बऱ्याच क्षेत्रांमध्ये एन्ट्री केली असून त्याला शेतीक्षेत्र देखील आता अपवाद राहिलेले नाही. तंत्रज्ञानाचा वापर शेतीत देखील फायदेशीर ठरू लागले आहे.

याच अनुषंगाने जर आपण विचार केला तर ब्राझील मधील सॉलिक्स स्प्रेयर  कंपनीने सौर उर्जेवर ऑपरेट होणारा रोबो विकसित केला असून या रोबोच्या माध्यमातून एका दिवसाला 50 एकर क्षेत्रावरील तनावर फवारणी करता येणार आहे. सध्या फवारणी करिता ड्रोनचा वापर हळूहळू वाढत असून त्यापेक्षा देखील कमीत कमी खर्चामध्ये या रोबोच्या साह्याने फवारणी करता येईल अशा प्रकारचा दावा देखील या कंपनीने केलेला आहे.

मोठ्या प्रमाणावर असलेल्या तणांची समस्या ही खूप भयानक असून पीक उत्पादन वाढीवर याचा खूप विपरीत परिणाम होतो. हीच गोष्ट समोर ठेवून सॉलिक्स स्प्रेयर या कंपनीने रोबो तयार केला असून येणाऱ्या वर्षांमध्ये भारतामध्ये देखील हा रोबो उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने कंपनीकडून तयारी करण्यात येत आहे. 

या रोबोमध्ये एआय टेक्नॉलॉजी चा वापर करण्यात आला असून सेन्सरच्या मदतीने फक्त पिकातील तणावरच फवारणी या माध्यमातून करण्यात येते. त्यामुळे शेतकऱ्यांना फायदा होतो. तसेच कीटकनाशकाचा देखील बेसुमार वापर टाळतो व कीटकनाशकावरील देखील खर्च कमी होतो.

अमेरिकेमध्ये मका उत्पादक शेतकऱ्यांनी मागच्या वर्षी या रोबोचा वापर केला व त्यांना फायदा झाल्याचे देखील कंपनीने सांगितले आहे. अमेरिकेतील तीन कंपन्यांची मदत घेऊन सॉलिक्स स्प्रेयर या कंपनीने भारतासाठी हा रोबो उपलब्ध करून देण्यासाठी तयारी सुरू केली आहे.

English Summary: This robot will spray on 50 acres of land a day, read what exactly is the technology? Published on: 27 August 2023, 07:35 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters