1. यांत्रिकीकरण

ट्रॅक्टारचलित फुले बहुपीक टोकण यंत्राच्या साह्याने लागवड होईल समान अंतरावर आणि रोपांची संख्या राहील योग्य

आपण पिकांची पेरणी किंवा रोपांची लागवड करतो. परंतु बऱ्याचदा एकरी रोपांची संख्या योग्य प्रमाणात ठेवता येत नाही. कधी दाट लागवड होते व त्याचा परिणाम हा रोपांवर होतो कारण दाटीमुळे पुरेसा सूर्यप्रकाश रोपांना मिळत नाही..

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
this machine useful for cultivation

this machine useful for cultivation

आपण पिकांची पेरणी किंवा रोपांची लागवड करतो. परंतु बऱ्याचदा एकरी रोपांची संख्या योग्य प्रमाणात ठेवता येत नाही. कधी दाट लागवड होते  व त्याचा परिणाम हा रोपांवर होतो कारण दाटीमुळे पुरेसा सूर्यप्रकाश रोपांना मिळत नाही..

त्यामुळे विरळणी करावी लागते. तसेच रोपांच्या अयोग्य अंतर असले तर खतेव पाण्याचे नियोजन व्यवस्थित करता येत नाही. परंतु जर लागवडीसाठी आपण जर सुधारित तसेच वेळेची आणि श्रमात बचत करणारी यंत्रे  जर वापरली तर निविष्ठांचा योग्य प्रमाणात आणि आवश्यक असा वापर करता येतो. एवढेच नाही तरपेरणी योग्य अंतरावर केल्यामुळे खत आणि पाणी व्यवस्थापन करणे सोयीचे होते. तसेच हेक्‍टरी रोपांची संख्या देखील योग्य प्रमाणात राखली जाते व रोपांची दाटी होत नाही. तसेच यंत्राद्वारे आंतरमशागत व खते देण्याचे काम व्यवस्थित व पटकन करता येते. या लेखात आपण ट्रॅक्‍टरचलित फुले बहुपीक टोकण यंत्र विषयी माहिती घेणार आहोत. टोकण पद्धतीने लागवड करण्यासाठी खूपच उपयुक्त आहे.

ट्रॅक्‍टरचलित फुले बहुपीक टोकण यंत्र फायदे व वैशिष्ट्ये

 जर आपण शेतीमध्ये ट्रॅक्टरच्या वापराचा विचार केला तर ते बारा ते पंचवीस अश्‍वशक्तीच्या ट्रॅक्टर वापरतो याच्या साह्याने ऊस तसेच फळबागांमध्ये आंतरमशागतीची तसेच पेरणीची कामे केली जातात.या कामामध्ये सुसंगतता यावी यासाठी महात्मा फुले कृषी विद्यापीठाने फुले बहुपीक टोकण यंत्र विकसित केले आहे.

 फुले बहुपीक टोकण यंत्राची वैशिष्ट्ये

  • हे यंत्र वापरण्यासाठी बारा अश्वशक्ती आणि त्यापेक्षा अधिक क्षमतेचे ट्रॅक्टर उपयोगी ठरते.
  • या यंत्राच्या वापराने शेतामध्ये लागणारी मजुरी,वेळ आणि लागणारे कष्ट यामध्ये खूपच बचत होते.
  • सूर्यफूल, गहू, ज्वारी, सोयाबीन,हरभरा, मका, भुईमूग  इत्यादी पिकांची टोकण करण्यासाठी उपयुक्त असते.
  • यासोबतच दाणेदार खतांची देखील व्यवस्थित पेरणी करता येते.
  • पारंपारिक पद्धती मध्ये होणाऱ्या खर्चाच्या तुलनेत 40 ते 50 टक्के बचत होते.
  • पारंपरिक पद्धतीपेक्षा वेळेमध्ये 50 ते 60 टक्के बचत होते.
English Summary: this machine is useful for cultivation of various crop and vegetable plant cultivation Published on: 12 March 2022, 09:33 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters