शेती क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणात तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. त्यासोबतच विविध यंत्र देखील शेती मध्ये मोठ्या प्रमाणात वापरली जात आहेत.यायंत्राच्या वापराने शेतीची कामेही सहज आणि सुलभ झाले आहेत.
इतकेच नाही तर यामुळे वेळ आणि पैसा देखील बचत होताना दिसत आहे. खाद्य पिकांची लागवड करण्याअगोदर शेताची पूर्वमशागत असो की पिकांची काढणीसगळेच कामेआता यंत्रांच्या द्वारे होऊ लागले आहेत. या लेखामध्ये आपण शेतीत उपयोगी पडणारी म्हणजेच पिकांची कापणी ते बांधनी पर्यंत शेतकरी बंधूंना उपयोगी पडणाऱ्या यंत्र विषयी जाणून घेणार आहोत.
शेतकरी बंधूंना शेतीसाठी उपयोगी पडणारे यंत्र
- ट्रॅक्टरचलित पीक काढणी यंत्र(Reper Binder)- पिकांच्या काढणीसाठी रिपर बाईंडर या यंत्राचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. गहू काढण्यासाठी हे यंत्र खूपच उपयुक्त आहे तसेच बरेच शेतकरी या यंत्राचा वापर करत आहेत.
- स्वयंचलित पीक कापणी यंत्र(Automatic Reper Machine)- रिपर यंत्राच्या साह्याने अगदी एका दिवसांमध्ये दोन ते तीन हेक्टर क्षेत्रावरील गहू व भात पिकाची कापणी एकदम सहजपणे करता येते. अगदी कमी वेळेमध्ये शेतातील कामे यंत्राने पूर्ण करता येतात.
- स्वयंचलित पीक कापणी व बांधणी यंत्र- या यंत्राच्या साह्याने एका दिवसांमध्ये दीड ते दोन हेक्टर क्षेत्रावरील गहू आणि भाताची कापणी करून निघालेल्या पेंढ्याचीदेखील पटकन बांधणी करता येते त्यामुळे हे यंत्र शेतकऱ्यांना खूपच उपयुक्त आहे.
- वैभव विळा- ज्वारी, गहू आणि भात पिकाच्या कापणी साठी या दातेरीविळ्याचा उपयोग चांगल्या प्रकारे उपयोगी ठरतो. हा विळा धारदार असून या विळ्याला धार लावण्याची गरज पडत नाही.
- मनुष्य चलित भेंडी कात्री- भेंडीला लहू असते त्यामुळे हाताने तोडले की हाताला भयंकर आग होते. त्यामुळे भेंडी कात्री वापरणे उपयोगी ठरते. या भेंडी कात्री मुळे भेंडी अगदी सहजपणे व अलगद तोडता येते.
- मिनी स्वयंचलित कम्बाईन हार्वेस्टर- या यंत्राचा वापर आता बरेच शेतकरी मोठ्या प्रमाणात करू लागले आहेत. या यंत्राच्या साह्याने अगदी एका दिवसामध्ये दोन ते तीन एकर क्षेत्रावरील गहू व भात पिकांची कापणी आणि मळणी एकाच वेळी करतात. या यंत्रामुळे एकाच वेळी दोन्ही काम होत असल्याने दुहेरी फायदा मिळतो.(स्त्रोत-मी E शेतकरी)
Share your comments