आधुनिक शेतीमध्ये यांत्रिकीकरणाला खूप महत्त्व आहे. कृषी यांत्रिकीकरण हे मजुरांच्या टंचाईवर मात करण्यासाठी फार महत्त्वाचे आहे. कृषी यांत्रिकीकरणामुळे शेतीतील कामे योग्य वेळेवर होण्यास मदत होते सोबतच निविष्ठांचा कार्यक्षम वापर देखील होतो. आज आपण या लेखाच्या माध्यमातून शेतीतील कष्ट कमी करणाऱ्या काही अवजारांबद्दल माहिती घेणार आहोत. कृषी शक्ती व अवजारे विभाग डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांनी विकसित केलेल्या आजाराबद्दल आपण थोडक्यात माहिती बघू
हातकोळपे
लहान क्षेत्रातील आंतरमशागतीसाठी हात कोळपे हे फार उपयुक्त आहे. हलक्या लोखंडी पाईपपासून बनवलेल्या अवजाराचा १५ सेंटिमीटर रुंद पास आहे. त्याच्या साह्याने एक माणूस एका दिवसाला ०.१२ ते०.१५ हेक्टर क्षेत्रावर काम करू शकतो.
ठिंबक नळी वेटोळीकरण यंत्र
ठिबक संच वापरून झाल्यावर व्यवस्थित गुंडाळून ठेवण्यासाठी हे यंत्र फार उपयुक्त आहे. ठिबक नळी वेटोळीकरण यंत्राच्या साह्याने उपनद्यांच्या गोल गड्डे तयार करण्यास मदत होते.
रुंद वरंबा सरी टोकन व अंतर मशागत यंत्र
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांनी विकसित केलेली रुंद वरंबा सरी पद्धतीवर पिकांची पेरणी व आंतरमशागत करता यंत्र विकसित करण्यात आले आहे. या यंत्राद्वारे उडीद, सोयाबीन, मका, ज्वारी, कपाशी इत्यादी पिकांची पेरणी करणे शक्य आहे. या यंत्राद्वारे पेरणी केल्यास उत्पादनात ३० टक्के वाढ व मजुरांची बचत होण्यास मदत होते.
पीकेव्ही लिंबूवर्गीय फळ तोडणी यंत्र
लिंबूवर्गीय फळांच्या तोडणी करता डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला द्वारा हे यंत्र विकसित करण्यात आले आहे.लिंबू तोडणी यंत्राची क्षमता १५.६ किलो प्रतितास तर संत्रा तोडणी यंत्राची क्षमता एकूण ५९ किलो प्रति तास आहे. या यंत्राच्या सहाय्याने फळे तोडल्यास थोडी देठ फळांना राहते त्यामुळे फळांचा साठवणूक कालावधी वाढतो.
पीकेव्ही कडबा कटर
जनावरांना खाण्यासाठी कडबापासून कुट्टी तयार करण्यासाठी या यंत्राचा उपयोग केला जातो. सर्व अवजारे मिळवण्यासाठी आपण कृषी शक्ती व अवजारे विभाग पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथे संपर्क करू शकता.
संदर्भ:-कृषिसंवादिनी (२०२०) डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ, अकोला
Share your comments