
soil testing
सध्या पिकांवर विविध किडे आणि रोगांचाबंदोबस्त करण्यासाठी विविध प्रकारचे कीटकनाशकांची फवारणी शेतकरी करीत असतात.त्यातील बहुसंख्य कीटकनाशके अति विषारी असतात.
.दिवसेंदिवस कीटकनाशकांचा वापर हा वाढतच जात आहे. यातील फरक कीटनाशक वापराचा परिणाम मानवी आरोग्यावर अतिशय घातक पद्धतीने होऊ शकतो. त्यांच्या सारख्या दुर्धर आजार तसेच अनेक प्रकारचे घातक रोगमनुष्याला होऊ शकतात.या सगळ्या पार्श्वभूमीचा विचार करून पंजाब कृषी विद्यापीठातील संशोधकांनी पाणी व मातीतील कीडनाशकांचे आढळणारे तंत्रज्ञान विकसित केले आहे.
हे तंत्रज्ञान नेमके काय आहे ते थोडक्यात पाहू.
काय आहे हे तंत्रज्ञान?
या तंत्रज्ञानामध्ये एक काचेची पट्टी वापरली जात असून त्यावर एक रसायनांचे कोटिंग केले आहे ज्या पाण्याचे किंवा मातीचे याद्वारे परीक्षण करायचे आहे.त्या मातीचा द्रावणाचा किंवा पाण्याचा एक थेंब त्या पट्टीवर विशिष्ट स्थानी ठेवायचा आहे.जर या द्रावणात किंवा नमुन्यात कीडनाशकांचा प्रमाण अधिक असेल तर काही सेकंदात त्याचे इंडिकेशन मिळतात.जर कीडनाशकांचे प्रमाण कमी असेल तर पाच मिनिटे लागतात.
इतके साधे हे तंत्रज्ञान आहे. ही किट अवघी पाच ते सात रुपयात मिळणार आहे. एका नमुन्यासाठी एक पट्टी वापरायचे आहे.याकीटचे नाव हे नॅनोटेक्नॉलॉजी जेल बेस्डमॅटिक्सअसे आहे.
ही कीट लवकर विक्रीसाठी उपलब्ध होणार आहे. तिच्या विक्रीसाठी अधिकृत संमतीची गरज असून तिची पेटंटची पूर्ण प्रक्रिया ही बाकीआहे.या तंत्रज्ञानासाठी विद्यापीठाने पंजाब सरकार सोबत करारकेला आहे.म्हणून या बाबतीत सरकारचा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे.
Share your comments