भारताचे प्रसिद्ध ट्रॅक्टर उत्पादक कंपनी टाफे ट्रॅक्टर अँड फार्म कंपनी लिमिटेड ने खास करून हरियाणा,बिहारआणि झारखंड राज्यातील शेतकऱ्यांसाठीट्रॉली आणि व्यापार विषयक वापरासाठी 35 एचपी चे मॅसी फरगुशन 7235 डीआय हॉलेज स्पेशल ट्रॅक्टर लॉन्च केले. या ट्रॅक्टरच्या जबरदस्त परफॉर्मन्स मुळे हे ट्रॅक्टर ग्रामीण भागातील उद्योगी, ठेकेदार आणि ड्रायव्हरसाठी फार उपयोगी आहे.
हे नवीन स्पेशल ट्रॅक्टर एमएफ 7235 डी आय वीट भट्टी,दगडांच्या खाणी, ऊसातील आंतरमशागत, पाण्याचे टॅंकर,पायाभूत तसेच विकास कामांमध्ये फार उपयोगी पडणारे आहे.या ट्रॅक्टरचीमहत्वाचे वैशिष्ट्य म्हणजेत्याच्या आधुनिक तंत्रज्ञान,प्रगत सुविधा, या श्रेणीमध्ये सगळ्यात पावरफुल, कमीइंधन लागणे, जगप्रसिद्ध एम एफ हायड्रॉलिक्स,कमीत कमी मेंटेनन्स,चालकासाठी विशेष आरामदायक इत्यादी वैशिष्ट्यांसहट्रॅक्टर लॉन्च करण्यात आले आहे.
या ट्रॅक्टर ची महत्त्वाची वैशिष्ट्ये
- एमएफ 7235 डीआय कमी ऑपरेटिंग आरपीएम वर उच्च बॅकअप वर प्रदान करते. त्यामुळे याला कमीत कमी इंधनाची गरज असते.
- या ट्रॅक्टर मध्ये 35 एचपी चे शक्तिशाली आणि इंधन कुशल सिम्पसन इंजिन आहे. तसेच पोर्टल बुल गिअर सिस्टिम, ऑइल मध्ये बुडालेले ब्रेक, डायाफ्राम क्लच, उच्च ग्राउंड क्लिअरन्स,लांब व्हीलबेस, फॅक्टरी फिटेड बंपर, पावर स्टेरिंग,फ्लॅट प्लॅटफॉर्म इत्यादी वैशिष्ट्ये ट्रॅक्टरचे सांगता येतील
- हे ट्रॅक्टर खास डिझाईन ने सादर केले गेले आहे जे वापरकर्त्यांना चांगल्या प्रकारची सुरक्षा, आराम आणि चालवण्यात सुलभता इत्यादी सुविधा देते.
- या ट्रॅक्टरची मायलेजक्षमता जास्त असल्याने कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त अंतर कापण्याससमर्थ आहे.
- एमएफ7235 डीआय जगप्रसिद्ध एम एफ हायड्रोलिक आहे जे 1200 किलो वजन उचलण्याची सर्वोच्च क्षमता ठेवते.
- या ट्रॅक्टरची कमीत कमी देखभाल करावी लागते.
ट्रॅक्टर वापराचे फायदे
- एमएफ7235 ट्रॅक्टरच्या वापरामुळे इंधनाचा वापर जवळजवळ 60 हजार रुपयांपर्यंत बचत केली जाऊ शकते.तसेच या ट्रॅक्टरची बुकिंग ची किंमत कमी आहे. 35 हजार रुपये भरून ट्रॅक्टर बुक करता येऊ शकते. त्यामुळे छोटे शेतकरी देखील ट्रॅक्टर खरेदी करू शकतात.
- तसेच हे ट्रॅक्टर साठी लोनचा पर्याय देखील सोयीस्कर ठेवण्यात आल्याने छोट्या शेतकऱ्यांना देखील आर्थिकसमस्या पासून मुक्ती मिळू शकते.
- तसेच या ट्रॅक्टर मध्ये दोन वर्षापर्यंत फ्री मेंटेनन्स ची सुविधा दिली गेली आहे.
Share your comments