tractor News :- कृषी यांत्रिकीकरणाचा विचार केला तर यामध्ये विविध प्रकारच्या यंत्रांचा वापर शेतकरी करतात. परंतु सर्वात जास्त वापरात असलेले यंत्र म्हणजे ट्रॅक्टर हे होय. शेताची पूर्व मशागत ते पिकांची काढणी या मध्यंतरीच्या कालावधीमध्ये सर्व कामांसाठी ट्रॅक्टरचा उपयोग शेतकरी करतात. त्यामुळे शेतकरी ट्रॅक्टर घेताना किमतीचा आणि चांगले वैशिष्ट्ये असणारे ट्रॅक्टर घेण्यासाठी प्रयत्नशील असतात.
बाजारात अनेक कंपन्यांचे ट्रॅक्टर उपलब्ध आहेत. परंतु त्यामधून कमी किमतीत आणि चांगले वैशिष्ट्य असणारे ट्रॅक्टरची निवड करणे खूप गरजेचे असते. याच अनुषंगाने जर आपण स्वराज कंपनीच्या टार्गेट 630 या ट्रॅक्टरचा विचार केला तर हे छोट्या फळ बागायतदार शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचे असे ट्रक्टर आहे.
कंपनीने हे ट्रॅक्टर बनवताना लहान शेतकरी, तसेच भाड्याने ट्रॅक्टर इतर शेतकऱ्यांना देणाऱ्यांचा विचार करून या ट्रॅक्टरची निर्मिती केली आहे. हे 29 एचपी क्षमतेचे ट्रॅक्टर असून याचा आकार खूप लहान आहे. फळबागांसाठी आणि इतर पिकांच्या कामांकरिता हे ट्रॅक्टर खूप उपयोगी आहे.
स्वराज्य टार्गेट 630 ट्रॅक्टरची वैशिष्ट्ये
हे ट्रॅक्टर मजबूत आणि त्याचा आकार यामुळे प्रसिद्ध असून आणि कठीण परिस्थितीमध्ये देखील ते उत्तम काम करते. हे ट्रॅक्टरचे मॉडेल फ्युएल एफिशियंट असल्यामुळे कमीत कमी किमतीत चांगला नफा देण्यासाठी सक्षम आहे. या ट्रॅक्टरमध्ये 9F+3R गिअर बॉक्स देण्यात आलेला असून ट्रॅक्टर कंट्रोल साठी खूप महत्त्वपूर्ण आहे.
महत्वाचे म्हणजे या ट्रॅक्टरमध्ये कंपनीने सहा वर्षांची वॉरंटी दिली आहे. जर ट्रॅक्टरचा आरपीएमचा विचार केला तर याला 2800 rpm देण्यात आले असल्यामुळे ते काम करण्यासाठी खूप उपयुक्त आहे. ट्रॅक्टरची पावर कॅपॅसिटी 29 एचपी आहे. एवढेच नाही तर याची वजन उचलण्याची क्षमता देखील 980 किलोग्राम इतकी आहे. त्यामुळे मालाची वाहतूक करण्याकरीता आहे ट्रॅक्टर उपयुक्त आहे.
जर तुम्हाला फळबागातील कामांकरिता आणि 980 kg वजन उचलण्याच्या कामाकरिता जर ट्रॅक्टर घ्यायचा असेल तर स्वराज टारगेट 630 ट्रॅक्टर तुमच्यासाठी फायद्याचे ठरू शकते. हे ट्रॅक्टर चार व्हील ड्राइव्ह या वैशिष्ट्यांसाठी ओळखले जाते. हे तीन सिलेंडर असलेले ट्रॅक्टर असून पीटीओची पावर क्षमता 24 एचपीची आहे. इंजिनची क्षमता पाहिली तर 1331 एवढी आहे.
स्वराज टारगेट 630 ट्रॅक्टरची किंमत
जर आपण स्वराज टारगेट 630 या ट्रॅक्टरची किंमत पाहिली तर ती पाच लाख 35 हजार रुपये इतकी आहे.
Share your comments