आपल्याला माहित आहेच कि जेव्हा उसाची तोडणी होते तेव्हा शेतामध्ये मोठ्या प्रमाणात उसाच्या पाचटाचा पसारा पडतो. बरेच शेतकरी ही पाचट जाळून टाकतात. परंतु ही पाचट न जाळता ती जर कुजवली किंवा तिचा वापर आच्छादन म्हणून केला तर ऊस उत्पादन वाढीसाठी आणि मजुरी व पाण्याच्या बचतीसाठी खूप मोठा उपयोग होऊ शकतो. पाचट कुजवून यामुळे जमिनीचा पोत सुधारण्यास मदत होते व उसाच्या एकरी उत्पादनात वाढ संभवते.
नक्की वाचा:Agri News: आता 'या' दिवशी होणार ऊस दराचा फैसला,राजू शेट्टी यांनी केली ऊसपरिषदेची घोषणा
परंतु जर आपण उसाच्या पाचटापासून खत तयार होण्याचा कालावधीचा विचार केला तर त्याला जवळजवळ आठ ते दहा महिन्यांचा कालावधी लागतो.
परंतु याच पाचटचे शेतामध्ये छोटे छोटे तुकडे केले आणि ती पाचट कुजविण्यासाठी जिवाणू कल्चर, शेणकाला व नत्रयुक्त खते ही प्रक्रिया केली तर पाचट कुजण्याची प्रक्रिया फक्त तीन ते साडेतीन महिन्यांत पूर्ण होते.
नक्की वाचा:मक्याचे 4 नवीन संकरीत वाण लॉन्च; शेतकऱ्यांसाठी ठरणार फायदेशीर
पाचट कुजण्यासाठी उपयुक्त ऊस पाचट यंत्र
हे यंत्र एक रोटावेटर सारखे दिसणारे असून तीन फूट पिकाच्या खोडव्यात वापर करून सरीमध्ये असलेल्या पाचटाचे 10 ते 15 सेंटिमीटरचे बारीक तुकडे या यंत्राच्या साह्याने करता येतात. या यंत्राला पुढच्या बाजूला असलेल्या रोलर मुळे सरीत असलेली पाचट सरीत दाबली जाते. या यंत्राच्या रॉडवर मधल्या भागात बसवलेल्या जे आकाराची पाती पाचटाचे तुकडे करत जातात.
तसेच या यंत्राच्या दोन्ही बाजूस असलेली एल आकाराची पाती वरंब्याच्या बगलेची माती काढून पाचटसोबत थोड्या प्रमाणावर मिसळली जाते.
या यंत्राच्या साह्याने दिवसभरात अडीच ते तीन एकरातील पाचटाचे तुकडे करता येतात. ज्या शेतकऱ्यांकडे रोटावेटर उपलब्ध आहे, त्यावर पाती जोडणी केल्यास कमी खर्चात हे काम करता येते.
Share your comments