अलीकडच्या काळात शेती क्षेत्रामध्ये शेत मशागत ते पीक कापणी पर्यंत सगळ्या टप्प्यात यंत्राचा वापर मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे. या यंत्रांच्या मदतीने शेतीतील एकदा कष्टाची कामे सहज आणि सोप्या रीतीने आणि कमी वेळात होण्यास मदत झाली आहे.
यामुळे शेतकऱ्यांचा पैसा आणि वेळ देखील वाचतो. या लेखामध्ये आपण पिकांचे शिल्लक राहिलेले अवशेष म्हणजेच पेंडा कापणी तसेच शिल्लक राहिलेला असल्याने बारीक तुकडे करणे व ती गोळा करणे साठी उपयुक्त असलेल्या स्ट्रा कम्बाईन या मशीन विषयी माहिती घेणार आहोत.
पिकाची काढणी केल्यानंतर शिल्लक राहणाऱ्या पेंडा किंवा भुशाचा वापर जनावरांच्या खाद्यामध्ये करण्यात अनेक प्रकारच्या अडचणी येतात.
अनेक ठिकाणी ही उरलेली पिकांच्या अवशेष जाळल्यामुळे प्रदूषणात वाढ होते. या गोष्टी टाळण्यासाठी पिकाचा उरलेला पेंडा कापणी, आवश्यकता असल्यास त्याचे बारीक तुकडे करणे व गोळा करणे हे तिन्ही काम एकत्र करणारे यंत्र उपयोगी ठरते. ही कामे स्ट्रॉ कंबाईन या यंत्राच्या साह्याने करता येऊ शकतात. हे यंत्र 35 ते 50 एचपी क्षमतेचा ट्रॅक्टर द्वारे चालवले जाते तसेच या प्रकारची स्वयंचलित यंत्र उपलब्ध आहे. स्ट्रॉ कम्बाईन यंत्राच्या मागे जोडलेल्या ट्रेलरमध्ये भुसा गोळा केला जातो.
स्ट्रा कम्बाईन मशीनची रचना
या यंत्रामध्ये पेंडा कापणी घटक,पेंढा गोळा करणारा घटक,फीडींग युनिट, झेंड्याचा भुगा करणारा घटक आणि स्ट्रॉ ब्लोईंग युनिट इत्यादी प्रमुख घटक कार्यरत असतात. तसेच शेंडा एकत्र करण्यासाठी माईक टूथ प्रकार, चाप कटर प्रकार आणि सेरेटेड सॉअशा तीन वेगवेगळ्या प्रकारच्या यंत्रणांचा उपयोग यंत्रामध्ये केला जातो.या यंत्राच्या प्रमुख घटक रील,कटर बार,ऑगर, फिडर,काँकॅव्ह अस्पीरेटर ब्लोअर, चाळण्या आणि गेर बॉक्स ही आहेत.
या मशिन ची उपयुक्तता
- पारंपारिक पद्धतीने मळणी करण्याच्या तुलनेत यंत्र 55 ते 65 टक्के पेंडा यशस्वीरित्या पुन्हा उपलब्धशकते.
- वाया जाण्याची शक्यता असलेले धान्य प्रतिहेक्टरी 75 ते 100 किलो पुन्हा मिळू शकते.
- स्ट्रा कम्बाईन याची कार्यक्षमता 0.4 ते 0.5हेक्टर प्रतितास एवढे आहे.
Share your comments