वर्तमान परिस्थितीत कृषी क्षेत्रामध्ये निरंतर प्रगती होताना दिसत आहे.कृषी क्षेत्रावर भारताचे अर्थव्यवस्था अवलंबून आहे. या सगळ्या गोष्टींचे श्रेय फक्त शेतकऱ्यांना जाते. परंतु आता हे श्रेय शेतकऱ्यांसोबत आधुनिक तंत्रज्ञान निमित्त कृषी यंत्रणाही द्यायला लागेल. प्रत्येक शेतकऱ्याची इच्छा असते की हंगामात पिकांचे उत्पादन जास्तीत जास्त मिळावे. त्यासाठी शेतकरी दिवस-रात्र शेतामध्ये मेहनत करतात या मेहनतीला कृषी यंत्राची देखील मदत मिळत असते. या लेखामध्ये आपणशेतातील दगड गोटे अगदी सहजपणे उचलू शकणाऱ्या स्टोन पिकर या मशीन बद्दल माहिती येणार आहोत.
काय आहे स्टोन पिकर मशीन आणि त्याची वैशिष्ट्ये?
आपल्याला माहिती आहे की भारताचा बराचसा भाग पर्वतीयआहे. अशा ठिकाणी बरेच शेतकरी शेती करतात परंतु अशा ठिकाणी शेतामध्ये बऱ्याच प्रकारचे दगडगोटे आढळतात. त्यामुळे शेतकऱ्यांना मशागत करणे फार जिकिरीचे होते. तसेच शेतात असलेल्या एका दगडगोटे यामुळे बियाण्याची उगवण क्षमता ही प्रभावित होते. अशा क्षेत्रातील शेतकऱ्यांसाठी दगड उचलणारी म्हणजेचस्टोन पिकर मशीन तयार केली गेली आहे. या यंत्राच्या साहाय्याने शेतातील बारीक दगड गोटे वेचून शेत व्यवस्थित साफ करता येते.
यंत्राच्या साह्याने शेतातील बरीच कामेसोपीकरता येतात. यंत्राच्या साह्याने शेतातील छोटे-मोठे आकाराचे सगळ्या प्रकारचे दगड गोटेएकाच वेळेस उचलून घेते.या यंत्राचे वैशिष्ट्य म्हणजे हे कमीत कमी खर्चात खरेदी करता येते पाणी याच्या साहाय्याने कमी वेळेत काम होत असल्याने वेळेची बचत होते.
स्टोन पिकर यंत्राची काम करण्याची पद्धत
हे यंत्र ऑपरेट करण्यासाठी ट्रॅक्टर ची आवश्यकता असते. या यंत्राच्या सहाय्याने एका एकर मधील दगड गोटे दोन तासात उचलून घेता येतात.
स्टोन पिकर मशीन चे फायदे
- या यंत्राच्या साह्याने शेतीची मशागत करणे सोपे होते व कष्ट कमी लागतात.
- स्टोन पिकर यंत्राच्या सहाय्याने शेतातील छोटे-मोठे सगळ्या प्रकारचे दगड उचलता येतात.
- पिकांच्या उत्पादनात वाढ होते.
- पिकांची गुणवत्ता वाढते.
- जमीन चांगली उत्पादनक्षम बनते.
- पिकांमध्ये रोग आणि किडींचा प्रादुर्भाव कमी होतो.
स्टोन पिकर यंत्राची किंमत
बाजारामध्ये स्टोन पीकर यंत्राची किंमत जवळजवळ चार लाख रुपये पर्यंत आहे. हे मशीन पंजाबच्या मध्ये जास्त प्रमाणात तयार केले जाते. जर तुम्हाला हे यंत्र खरेदी करायची असेल तर तुम्ही पंजाब राज्यातील खासगी कंपन्यांशी संपर्क करू शकता. तसेच आपल्या राज्यातील काही खाजगी कंपन्यांकडूनही या बाबतीत माहिती मिळू शकते.
Share your comments