बेड प्लांटर मशीनच्या साहाय्याने करा गव्हाची पेरणी

10 October 2020 12:13 PM


गहू हे भारतातील सगळ्यात महत्त्वाचे अन्नधान्य पीक आहे. भारतामध्ये साधारणतः रब्बी हंगामात जास्त प्रमाणात गव्हाची पेरणी केली जाते. भारतातील पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, महाराष्ट्र या राज्यांचा उल्लेख अग्रक्रमाने करावा लागेल. गव्हाच्या पेरणीमध्ये अलीकडच्या काळामध्ये विविध तंत्रज्ञानाचा वापर होताना दिसत आहे. त्यामुळे गव्हाच्या एकूण उत्पादनामध्ये काही वर्षांपासून लक्षणीय वाढ होत आहे. गव्हाच्या पेरणी बाबतीतल्या एका यंत्राविषयी माहिती घेणार आहोत. त्या यंत्राचे नाव आहे बेड प्लांटर मशीन चला तर मग जाणून घेऊया काय आहे हे यंत्र.

साधारणत: आपल्याकडे महाराष्ट्राचा विचार केला तर रब्बी हंगामामध्ये गव्हाची पेरणी केली जाते. या पेरणीला जर उच्च तंत्रज्ञानाची जोड दिली तर शेतकरी कमी उत्पादन खर्चात जास्त उत्पादन मिळून आर्थिक नफा मिळू शकतो. गहू लागवडीपूर्वी आपण शेतजमीन तयार करतो. या लेखात आपण एक महत्त्वाचे माहिती घेणार आहोत. जर आपल्याला बेडवर गहू लागवड करायची असेल तर आपण बेड प्लांटर मशीनच्या साह्याने लागवड करू शकतो.

 काय आहे बेडपर्यंत मशीन

बेडवर गहू लागवड करण्यासाठी एक विशेष प्रकारची मशीन जिचे नाव आहे. या मशिनच्या साह्याने आपण व्यवस्थित प्रकारच्या सरी पाडण्यासाठी बेड बनवण्यासाठी, आणि गव्हाच्या लागवडीसाठी याचा वापर करू शकतो.  

बेड प्लांटर मशीनच्या साह्याने कशी लागवड करावी

या यंत्राच्या साह्याने जर आपण गव्हाची लागवड केली तर एका बेडवर दोन ते तीन रांगेमध्ये गव्हाची लागवड करता येते. इतकेच नाही तर यंत्राच्या साह्याने पाडलेल्या सरीद्वारे आपण पिकाला व्यवस्थितरित्या पाणी देऊ शकतो. जर एखाद्या वेळेस जास्तीचा पाऊस झाला तर या पाडलेल्या सरीद्वारे त्याला आपण एक प्रकारची नाली म्हणू त्याद्वारे आपण पाण्याचा निचरा उत्तम प्रकारे करू शकतो.

 या यंत्राद्वारे पेरणी करण्यासाठी लागणाऱ्या बियाणांची मात्रा

जर आपण बेडवर गव्हाची लागवड केली तर २५ टक्केपर्यंत गहू बियाण्याची बचत होते. त्याचा अर्थ असा होतो की, कमीत कमी ३०  ते ३२ किलो ग्राम बियाणे एक एकरसाठी पुरेशी असते.

या मशिनच्या साह्याने लागवड केल्याने होणारे फायदे

बियाण्यामध्ये चांगल्या प्रकारचे बचत करता येते.

उपलब्ध पाण्यामध्ये २५ ते ४० टक्‍क्‍यांपर्यंत बचत करता येते. या मशिनच्या साह्याने लागवड केल्याने चांगल्या प्रकारचे गव्हाचे उत्पन्न होऊ शकते. या मशिनच्या साह्याने आपण ७० सेंटिमीटर चे पॅड बनवू शकतो. त्यावर दोन-तीन ओळी मध्ये लागवड करता येते.

बेड प्लांटर मशीनची किंमत

या यंत्राची किंमत साधारणतः ७० हजार रुपये आहे. जर आपल्याला हे यंत्र विकत घ्यायचे असेल तर आपण आपल्या परिसरातील असलेल्या खाजगी कंपन्यांशी संपर्क करू शकतात किंवा या मशीनच्या एजन्सी भरपूर ठिकाणी असतील त्याचा व्यवस्थित तपास करुन संपर्क साधावा.

bed plant machine wheat wheat sowing बेड प्लांटर मशीन गव्हाची पेरणी गहू पीक
English Summary: Sow wheat with the help of bed plant machine

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.