भारताची प्रसिद्ध ट्रॅक्टर निर्माता कंपनी सोनालीका ट्रॅक्टर ने भारतातील पहिला फाईव्ह जी ट्रॅक्टर लॉन्च केले आहे. या नवीन लॉन्च केलेल्या फाईव्ह जी ट्रॅक्टर चे नाव आहे महाराजा डी आय-745lll हे आहे. ट्रॅक्टर प्रामुख्याने राजस्थानच्या शेतकऱ्यांच्या समस्या लक्षात घेऊन बनवले गेले आहे.
राजस्थानातील शेतकऱ्यांच्या स्थानिक आवश्यकता लक्षात घेऊन बनवले गेले आहे.
सोनालीका महाराजा डीआय -745lll ट्रॅक्टर ची वैशिष्ट्ये
- सोनालिका चे नवीन ट्रॅक्टर 5 जी महाराजा डी आय -745lll प्रगत तंत्रज्ञानाने संचलित ट्रॅक्टर असून भारतातील पहिले 5 जी टेक्नॉलॉजी लिफ्ट टेक्निक पासून निर्मित केले गेले आहे.
- हे ट्रॅक्टर प्रामुख्याने राजस्थानच्या शेतकऱ्यांच्या स्थानिक आवश्यकतेनुसार बनवले गेले आहे.
- महाराजा ट्रॅक्टर 2000 किलो ची लिफ्ट क्षमता पुरवते. त्यामुळे या ट्रॅक्टरला हायड्रोलिक चा महाराजा असे म्हटले जाते.
- महाराजा ट्रॅक्टर मध्ये 3065 सी सी चे heavy-duty मायलेज इंजिन असून जे 50 एचपी श्रेणी मधील सगळ्यात कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा दर्जेदार कामासाठी जास्तीचा टॉर्क निश्चित करते.
- सोनालिका च्या महाराजा ट्रॅक्टर मध्ये फिंगर टच कंट्रोल मुळे शेतकरी अन्य कृषी उपकरणाचा वापर सहजतेने करू शकतात.
- सोनालिका छाया महाराज ट्रॅक्टर मध्ये शेतकऱ्यांसाठी एलइडी डीआयएल हेडलाईट आणि एलईडी टेल लाईट आहे. जय महाराजा ट्रॅक्टर चा दबदबा बनवून ठेवण्यामध्ये सक्षम आहेत.
- या ट्रॅक्टर मध्ये आकर्षक मटेरियल रेड पेंट आणि आरामदायक रॉयल रेड सीट आहे. ज्या शेतकऱ्यांना अत्यंत पसंद आहे.
- या ट्रॅक्टरला प्रो प्लस बंपर आणि अग्रोनोमिक रूपांमध्ये डिझाईन केल्या गेलेल्या स्टेरिंग मुळे शेतकऱ्यांना कामांमध्ये बिलकुल थकवा जाणवत नाही त्यामुळे जास्त वेळ पर्यंत शेतकरी ट्रॅक्टर द्वारे काम करू शकता.
- इतकेच नाही तर सोनालिका च्या महाराजा ट्रॅक्टर मध्ये हाय कूलिंग रिंग फॅन हा 45 केवी रेडिएटर इंजिन ला थंड ठेवते त्यामुळे इंजिनचे आयुष्य वाढते.
सोनालिका च्या 5जीट्रॅक्टर महाराजा डी आय -745lll ट्रॅक्टर ची किंमत
सोनालिका च्या या फाईव्ह जी ट्रॅक्टर महाराजा डी आय 745lll ट्रॅक्टरची एक्स शोरूम किंमत 6.60 -7.10 लाख रुपये आहे.
Share your comments