1. यांत्रिकीकरण

काय सांगता! आता घरबसल्या काही मिनिटातच करता येणार माती परीक्षण; जाणुन घ्या याविषयी सविस्तर

बदलत्या काळानुसार आधुनिक पद्धतीने शेती करणे हे गरजेचे ठरत आहे, कृषी वैज्ञानिकांच्या मते, पिकाच्या यशस्वी उत्पादनासाठी शेतजमिनीचे आरोग्य सदृढ राहणे महत्त्वाचे ठरते. त्यामुळे पिकाच्या लागवडीपूर्वी मातीची चाचणी करणे अर्थात माती परीक्षण करणे गरजेचे असते, माती परीक्षण करून जमिनीत कमतरता असलेल्या घटकांची पूर्तता करून पिकाचे चांगले उत्पादन प्राप्त करता येऊ शकते, परिणामी शेतकऱ्यांचा उत्पन्नात दुपटीने वाढ होते. अनेक शेतकरी बांधवांना माती परीक्षणाचे महत्व माहिती असते, पण त्यासाठी केला जाणारा आटापिटा लक्षात घेऊन शेतकरी बांधव माती परीक्षण करण्याचा टाळाटाळ करताना आपल्याला दिसतात. माती परीक्षण करण्याचे म्हटले की मग ठराविक प्रमाणात माती टेस्टिंग करण्यासाठी लॅबमध्ये पाठवावी लागते, मग तिथे मातीचे परीक्षण केले जाते आणि तदनंतर तब्बल आठवड्याभरात माती परीक्षणाचा रिपोर्ट हा आपल्या हातात येतो. हा एवढा आटापिटा आणि याला लागणारा वेळ यामुळे शेतकरी बांधव माती परीक्षण करतच नव्हते पण आता हे सारे जुनं झालंय! आता माती परीक्षण अवघ्या काही मिनिटात करता येऊ शकते, तुम्ही स्वतः घरबसल्या माती परीक्षण करू शकता. ऐकून विश्वास बसत नसेल बरोबर ना! पण आम्ही खरं सांगतोय आता हे शक्य आहे, अवघ्या काही मिनिटात आता तुम्ही घरबसल्या आपल्या मोबाईल द्वारेच माती परीक्षण करू शकता.

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
soil testing

यासंदर्भात अधिक माहिती अशी की कानपूर येथील भारतीय तंत्रज्ञान संस्था म्हणजेच आय आय टी ने माती परीक्षण करण्यासाठी एक किटतयार केली आहे. या पोर्टेबल किटद्वारे माती परीक्षण आधीपेक्षा अधिक वेगाने आणि अचूक केले जाऊ शकते असा संस्थेचा दावा आहे. यासाठी आपणास केवळ पाच ग्रॅम मातीची आवश्यकता भासणार आहे, आणि या किटचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे, ही पोर्टेबल किट केवळ एक मिनिट आणि तीस सेकंदात माती परीक्षणाचा रिपोर्ट आपणास देऊ शकते.

पोर्टेबल किट कसे करते काम

माती परीक्षणासाठी लागणारा आटापिटा आणि वेळ त्यामुळे सामान्य शेतकरी माती परीक्षण करण्यापासून दोन हात लांबच राहत असे, पण आता ते सारं जुनं झालंय! आता माती परीक्षण केवळ अवघ्या काही सेकंदात केले जाऊ शकते. शेतकऱ्यांची समस्या लक्षात घेऊन आयआयटी कानपुर येथील कृषी वैज्ञानिकांनी हे उपकरण बनवले आहे. या पोर्टेबल किटद्वारे माती परीक्षण करण्यासाठी आपणास पाच ग्रॅम माती परीक्षानळी सारख्या दिसणाऱ्या यंत्रात टाकावी लागणार आहे. या यंत्राला ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी उपलब्ध करून दिली गेली आहे. या यंत्राला ब्लूटूथ द्वारे आपल्या मोबाईलशी कनेक्ट करावे लागणार आहे.

शेतकरी मित्रांनो यासाठी आपणास एक विशिष्ट ॲप्लिकेशन देखील डाउनलोड करावी लागणार आहे हे ॲप्लिकेशन आपणास प्लेस्टोर वरती सहज भेटून जाईल. एप्लीकेशन चे नाव आहे भू-परीक्षक. आपण परीक्षानळीत माती टाकली की तद्नंतर केवळ 90 सेकंदात आपल्या मोबाईलवर अर्थात भू परीक्षक या अँप्लिकेशनवर माती परीक्षणाचा रिपोर्ट येऊन जातो. या माती परीक्षणाद्वारे आपणास जमिनीतील सहा घटकांची माहिती समजते त्यात प्रामुख्याने नत्र स्फुरद पालाश सेंद्रिय कर्ब यांचा समावेश आहे. शेतकरी मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की हे अप्लिकेशन तसेच किट अजून बाजारात उपलब्ध झालेले नाहीये पण याचा सफल प्रयोग झालेला आहे

आणि हे ॲप्लिकेशन लवकरच बाजारात येईल अशी आशा देखील व्यक्त केली जात आहे. या अँप्लिकेशनमुळे साहजिकच शेतकऱ्यांचे मोठे संकट दूर होणार आहे आणि यातून शेतकऱ्यांना मोठा फायदा होणार आहे.

English Summary: soil testing can now be done within minutes learn more about it Published on: 25 December 2021, 11:00 IST

Like this article?

Hey! I am अजय वसंत शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters