1. यांत्रिकीकरण

Agri News: काय म्हणता! आता ओले सोयाबीनचे टेन्शन नाही!डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने तयार केले सोयाबीन सुकवण्यासाठी ड्रायर, वाचा डिटेल्स

जर आपण शेतीक्षेत्राचा विचार केला तर विविध पद्धतीचे तंत्रज्ञान आणि आधुनिक यत्रांचा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे. परंतु अशी तंत्रे आणि शेतीला उपयोगी यंत्रे विकसित करण्यामागे राज्यातील कृषी विद्यापीठांचा फार मोठा सहभाग आहे. शेती क्षेत्रामध्ये शेतकऱ्यांच्या उत्पादन वाढीसाठी कृषी विद्यापीठांचे शास्त्रज्ञ यांची मोलाची भूमिका आहे.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
machine develope for soyabean dry

machine develope for soyabean dry

जर आपण शेतीक्षेत्राचा विचार केला तर विविध पद्धतीचे तंत्रज्ञान आणि आधुनिक यत्रांचा वापर मोठ्या प्रमाणावर होत आहे. परंतु अशी तंत्रे आणि शेतीला उपयोगी यंत्रे विकसित करण्यामागे राज्यातील कृषी विद्यापीठांचा फार मोठा सहभाग आहे. शेती क्षेत्रामध्ये  शेतकऱ्यांच्या उत्पादन वाढीसाठी कृषी विद्यापीठांचे शास्त्रज्ञ यांची मोलाची भूमिका आहे.

त्या अनुषंगाने जर आपण सोयाबीन पिकाचा विचार केला तर हे महाराष्ट्रातील खरीप हंगामातील प्रमुख पीक असून महाराष्ट्रातील बहुतांश भागातील शेतकऱ्यांचे आर्थिक व्यवहार हे सोयाबीन पिकावर अवलंबून आहेत.

नक्की वाचा:Tractor News: शेतीकामासाठी किफायतशीर आणि शेतकऱ्यांना फायद्याचे 'हे'ट्रॅक्टर ठरेल शेतकऱ्यांसाठी वरदान, वाचा याची वैशिष्ट्ये आणि किंमत

जर आपण या वर्षीचा विचार केला तर या कालावधीमध्ये सोयाबीन पिकाची काढणी सुरू असून झालेला पाऊस आणि वातावरणातील बदल इत्यादी मुळे सोयाबीनमध्ये आद्रता अधिक असल्या मुळे म्हणजेच ओलावा जास्त असल्याचे कारण देत व्यापारी वर्गाकडून सोयाबीनचे भाव पाडले गेल्याचा आरोप देखील केला जात आहे.

ओलावा असल्यामुळे सोयाबीन बाजारामध्ये कमी भावाने विकले जात आहे. परंतु ही समस्या आत्ताच नाही तर ती प्रत्येक वर्षी शेतकऱ्यांना येते.

परंतु आता या पार्श्‍वभूमीवर शेतकरी बंधुंनी ओल्या सोयाबीनची काळजी करण्याची गरज नसून डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने एक यंत्र यासाठी विकसित केले आहे.

 डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने तयार केले हे विशेष यंत्र

 डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने ओले सोयाबीन सुकवण्यासाठी एक विशेष यंत्र तयार केले असून या यंत्राच्या साहाय्याने आता सोयाबीन वाळवता येणे सोपे होणार आहे.

या यंत्राच्या साह्याने सोयाबीन मधील आद्रता कमी करता येणार असून सोयाबीन वाळवण्यासाठी एक विशेष ड्रायर डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने तयार केले आहे.

त्यामुळे आदर्तेमुळे सोयाबीन उत्पादक शेतकरी बांधवांचे सोयाबीन मातीमोल दरात विक्री होते. त्यासोबतच ढगाळ हवामान तसेच सूर्यप्रकाश अपुरा असणे इत्यादी गोष्टींमुळे सोयाबीन वाळवणे खूप जिकिरीचे बनते.

नक्की वाचा:Tractor News: 'या' कंपनीचे 'हे'दोन ट्रॅक्टर ठरतील शेती आणि शेतकऱ्यांसाठी वरदान, वाचा किंमत आणि आकर्षक वैशिष्ट्ये

आता शेतकरी बांधवांना ओला सोयाबीन विकण्याची गरज नसून या ड्रायरच्या मदतीने शेतकरी बांधव सोयाबीन आता वाळवू शकणार आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे समजा तुम्हाला सोयाबीनचा साठा करून ठेवायचा असेल तर ओल्या सोयाबीन चा साठा करण्यास समस्या निर्माण होते. असे सोयाबीन साठवले तर त्यांना बुरशी लागण्याची शक्यता असते. परंतु आता या ड्रायरच्या मदतीने सोयाबीन सहजच सुकवता येणार आहे.

या ड्रायरमध्ये लाकूड जाळून गरम हवा तयार केली जाते व या हवेच्या साहाय्याने सोयाबीन वाळवले जाते. या ड्रायर चे सगळ्यात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये तापमान कमी किंवा जास्त म्हणजे तुमच्या सोयीनुसार तुम्ही तापमानाची स्थिती ठेऊ शकतात.

या यंत्रामुळे शेतकरी बांधवांचे सगळ्यात मोठी समस्या आता दूर होणार असून जास्त आद्रते मुळे किंवा ओलाव्यामुळे कमी भावात सोयाबीन आता शेतकरी बंधूंना विकावा लागणार नाही.

नक्की वाचा:Agricultural Technology: शेतीसाठी शेतकऱ्यांना मदत करतात 'हे' 5 तंत्रज्ञान, उत्पादन वाढीसाठी होतो फायदा

English Summary: punjaabrao deshmukh krushi vidyapith delope dryer machine for dry soyabean Published on: 17 October 2022, 01:41 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters