प्रित ट्रॅक्टर्स हा एक भारतीय ट्रॅक्टर ब्रँड असून शेतकऱ्यांसाठी कमी मेंटेनन्स खर्चामध्ये शक्तिशाली ट्रॅक्टर बनवतो. या ब्रँडमध्ये प्रीत 4049 ट्रॅक्टर अतिशय प्रसिद्ध आहे. हे ट्रॅक्टर कमी डिझेल खर्चात जास्तीचे काम करते व त्याचा मेंटेनन्स देखील कमी आहे. हे ट्रॅक्टर खूपच आकर्षक असून त्याचे बोनट एरोडायनामिक प्रकारचे असून ते स्वतःच्या किल्लीने उघडते. तेलकट आपल्या ट्रॅक्टरचे वैशिष्ट्य आणि किंमत जाणून घेऊ.
प्रीत 4049 ट्रॅक्टरची वैशिष्ट्ये
1- हे ट्रॅक्टर तीन सिलेंडर, चाळीस हॉर्स पावरचे असून 2892 सीसी पावरफुल 4stroke डीआय इंजिनसह येते. या ट्रॅक्टरच्या कुलिंग साठी वाटर कुलिंग सिस्टिम देण्यात आली असून एअर फिल्टर मोठ्या आकारात कोरड्या प्रकारचे असून इंजिनला शुद्ध हवा देते.
हे ट्रॅक्टर बॉश कंपनीचे असून यामध्ये मल्टी सिलेंडर इनलाइन इंधन पंप देण्यात आला आहे. या ट्रॅक्टर चे गिअर बॉक्स मध्ये 8 गिअर्स समोर आणि दोन गिअर्स मागील बाजूस दिली आहेत. या ट्रॅक्टरचा कमाल वेग 31 किमी प्रति तास असून शेतीच्या कामासाठी खूप चांगले ट्रॅक्टर आहे.
त्याच्या मागील बाजूस कमाल वेग 13.86 प्रतितास आहे. या ट्रॅक्टर मध्ये 280 मिमीचा हेवी ड्युटी सिंगल ड्राय क्लच देण्यात आला आहे व ड्युअल क्लचचा पर्यायदेखील उपलब्ध आहे. हे ट्रॅक्टर मेकॅनिकल स्टेरिंग सोबत येते व तुम्ही यामध्ये पावर स्टेरिंग देखील निवडू शकता.
तसेच या ट्रॅक्टरला स्वयंचलित खोली आणि ड्राफ्ट कंट्रोल सोबत 1800 किलो वजन उचलण्याची क्षमता देण्यात आली असून हायड्रोलिक पंप गीअर प्रकारचा आहे.
ट्रॅक्टर चे एकूण वजन दोन हजार 50 किलो असून लांबी 3700 मीमी आणि रुंदी 1765 मीमी आहे. ट्रॅक्टरची फ्युएल टॅंक कॅपॅसिटी 67 लिटर आहे.
2- या ट्रॅक्टरची किंमत- प्रीत 4049 ट्रॅक्टर ची किंमत 4 लाख 80 हजार ते पाच लाख दहा हजार रुपये असून ही किंमत एक्स शोरूम आहे. किंमत तुमच्या राज्य आणि शहरानुसार बदलू शकते.
Share your comments