आजकाल शेती करायचं म्हटलं की सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे ट्रॅक्टर. कारण बैल जोडीने शेती करण्याचा वेळ निघून गेला आहे.क्षेत्र वाढल्यामुळे बैलाने शेती करणे सोपे राहिले नाही. तसेच बैलाने शेती केल्यावर जमिनीची मशागत चांगली होते परंतु मशागती साठी वेळ हा खूप लागतो त्याच्या तुलनेने ट्रॅक्टर ने शेती केल्यामुळे कमी वेळात शेतीची योग्य पद्धतीने मशागत होते.शेती साठी ट्रॅक्टर घ्यायचा म्हटलं की प्रत्येकाच्या मनात प्रश्न वेगवेगळे प्रश्न पडतात, कोणता घेऊया, कोणता चांगला आहे परंतु या लेखात आम्ही आपणास जून ते सोनं आणि शेतकऱ्यांना वापरासाठी असणारे रफ अँड टफ ट्रॅक्टर ची माहिती या लेखात देणार आहोत.
मार्केट मध्ये अनेक वेगवेगळ्या कंपन्यांचे ट्रॅक्टर आपणास पहावायला मिळतात.परंतु आपल्या शेतकरी बांधवांची एक समज आहे ते म्हणजे जून ते सोन.
1) महिंद्रा 575 डी आय:-
महिंद्रा 575 डी आय हा आपल्या भारतातील सर्वात लोकप्रिय असणारा ट्रॅक्टर आहे. सुरवातीस आपल्या कडे जास्त प्रमाणात सापडणार हा ट्रॅक्टर आहे. या ट्रॅक्टर चे वैशिष्ट्य म्हणजे हा 47 हॉर्स पॉवर आणि 50 हॉर्स पावर मध्ये उबलब्ध आहे. एकरी मशागती साठी या ट्रॅक्टर ला 2 लिटर डिझेल ची आवश्यकता आहे. तसेच शेतकऱ्यांना पूर्णपणे विश्वास असणारा हा ट्रॅक्टर आहे. मायलेज सुद्धा या ट्रॅक्टर चे चांगले आहे.
2) मेसी फर्ग्युसन 1035 डी आय:-
सर्वात जुनी शेतकऱ्यांची पसंत असणारा हा मेसी फर्ग्युसन ट्रॅक्टर आहे. आपल्या भारतात सर्वात जास्त शेतकरी वापरणारे हा ट्रॅक्टर वापरतात.
शेती कामासाठी एक दम रफ आणि टफ असा हा ट्रॅक्टर आहे. मेसी फर्ग्युसन 1035 डी आय हा ट्रॅक्टर 30 हॉर्स पावर पासून 50 हॉर्स पावर मध्ये उपलब्ध आहेत. परंतु जुना लोकप्रिय असलेला मेसी फर्ग्युसन ट्रॅक्टर हा 35 हॉर्स पावर चा आहे. तसेच शेती कामासाठी हा ट्रॅक्टर एकदम परवडणारा आहे तसेच मायलेज आणि एव्हरेंज सुद्धा चांगले आहे.
3)महिंद्रा B 275 डी आय:-
महिंद्रा ट्रॅक्टर या कंपनीने अनेक मॉडेल्स ची निर्मिती केली आहे त्यातील एक म्हणजे महिंद्रा B 275 डी आय.या मॉडेल्स मध्ये 35 हॉर्स पावर ताकत आहे. तसेच घरगूती शेती साठी सर्वात उपयुक्त असणारा हा ट्रॅक्टर आहे. या ट्रॅक्टर ची निर्मिती ही 19 व्या शतकापासून अस्तित्वात आहे.
4)HMT(हिंदुस्थान मशीन टूल):-
हिंदुस्थान मशीन टूल कंपनी निर्मित HMT ट्रॅक्टर हा सर्वात जास्त शक्तिशाली ट्रॅक्टर आहे. या ट्रॅक्टर ची ताकत ही 50 हॉर्स पावर एवढी आहे.
या ट्रॅक्टर चा वापर ऊस वाहतूक तसेच वाळू वाहतूक करण्यासाठी मोठ्या प्रमाणात केला जातो. तसेच शेतीसाठी सुद्धा तुम्ही वेगवेगळ्या प्रकारची औजारे वापरून ट्रॅक्टर च्या साह्याने शेती करू शकतो.आधुनिक आणि तंत्रज्ञानाच्या जोडी मुळे बाजारात आज अनेक वेगवेगळ्या प्रकारचे ट्रॅक्टर आले आहेत ऑइल ब्रेक, पावर स्टेरिंग इत्यादी तंत्रज्ञान प्रणाली ट्रॅक्टर मध्ये विकसित केली गेली आहे.
Share your comments