आता जुने ट्रॅक्टर पण वाचवेल वर्षाला दीड ते दोन लाख रुपये

26 May 2021 10:10 PM By: KJ Maharashtra
तुमचं जुनं ट्रॅक्टर पैशाची बचत करणार

तुमचं जुनं ट्रॅक्टर पैशाची बचत करणार

केंद्र सरकारने केंद्रीय मोटर वाहन नियममध्ये मोठा बदल केला आहे. केंद्र सरकारने आणलेल्या संशोधनामध्ये जेव्हां पेट्रोल आणि डिझेलवर चालतात अशा वाहनांची इंजिन आता सीएनजी, बायो सीएनजी आणि एलएनजी इंधनवर चालतील अशा पद्धतीने इंजिनमध्ये बदल करता येऊ शकेल. या श्रेणीच्या वाहनांमध्ये कृषी  ट्रॅक्टर, पावर टिलर, हार्वेस्टर आणि निर्माण उपकरण वाहनांचा समावेश करण्यात आला आहे.

नियमांमध्ये बदल केल्याचा सगळ्यात मोठा फायदा हा शेतकऱ्यांना होईल. शेतकरी आपल्या जुन्या ट्रॅक्टरचा इंजिनचा इंजिनमध्ये बदल करू शकतात. त्यामुळे इंधनला लागणारा खर्च हा कमी होणार आहे.एका अनुमानानुसार जर शेतकऱ्यांनी डिझेल आणि पेट्रोल ऐवजी ट्रॅक्टरमध्ये सीएनजीचा उपयोग केला तर वर्षभरात दीड ते दोन लाख रुपये शेतकरी वाचवू शकता. केंद्र सरकारची मोटर वाहन नियमांमध्ये आणलेल्या संशोधनाचे अधिसूचना

 सडक परिवहन आणि राजमार्ग मंत्रालय यांनी देशात व कल्पित इंधनाला चालना देण्यासाठी आणि पर्यावरणाला सुरक्षित ठेवण्याच्या उद्देशाने केंद्रीय मोटर वाहन नियमांमध्ये संशोधनची अधिसूचना जारी केली आहे. या संशोधनानंतर डिझेल आणि पेट्रोलवर चालणारे कृषी ट्रॅक्टर, पावर टिलर इत्यादी वाहनांना सीएनजी, बायो सीएनजी आणि एलएनजी इंधनामध्ये परावर्तित केले जाऊ शकते. याबाबतीत मंत्रालयाने ट्विट केले की, मंत्रालयाने कृषी ट्रॅक्टर, पावर टिलर आणि हार्वेस्टर इत्यादी वाहनांच्या इंजिनला सीएनजी, बायो सीएनजी आणि एलएनजी इंधनामध्ये परावर्तित करण्यासाठी केंद्रीय मोटर वाहन नियम, 1989 यामध्ये एक संशोधन अधी सूचित केले आहे.

 

याचा फायदा, असा होईल की सीएनजी एक स्वच्छ इंधन आहे यामध्ये कार्बन आणि अन्य प्रदूषण करणाऱ्या घटकांची मात्रा सर्वात कमी असते. तसेच या इंधनाचा वापर केल्याने फक्त पैशांची बचत न होता वायु प्रदूषण ही कमी करण्यासाठी मदत होईल. तसेच महत्त्वाचे म्हणजे १५ वर्ष जुने ट्रॅक्टर, पावर टिलर आणि हार्वेस्टर हे उपकरणेही व्यवस्थित वापरात येऊ शकतात. नवीन नियमानुसार कृषी उपकरणे आणि वाहने यांच्या इंजिनमध्ये बदल करता येऊ शकेल. ज्या वाहनांच्या इंजिन मध्ये थोड्या प्रमाणात बदल करता येईल, अशा वाहनांच्या इंजिनमध्ये बदल केले जातील. तसेच फारच वर्ष जुन्या वाहनांच्या इंजिनमध्ये सुद्धा बदल करण्याचा पर्याय ठेवण्यात आला आहे. कशा वाहनांमध्ये सीएनजी सारख्या इंधनाचा वापर केल्याने पारंपारिक इंधनाची यामुळे बचत होईल.

हेही वाचा : टाफेने(TAFE) शेतकऱ्यांसाठी विनामूल्य ट्रॅक्टर भाड्याने देण्याची योजना सुरु केली

 जुने ट्रॅक्टरचा इंजिनमध्ये बदल केल्यामुळे सरकारचा अंदाज आहे, की एका वर्षामध्ये शेतकरी दीड ते दोन लाखांची बचत करू शकतो. सडक परिवहन आणि राजमार्ग मंत्री नितिन गडकरी यांनी यावर्षी डिझेल इंजिनमध्ये बदल करून  सीएनजी वर चालणारे भारतातील पहिले ट्रॅक्टर लाँच केले होते. यामुळे वर्षाला दीड ते दोन लाखांच्या बचत तर होईलच परंतु 75 टक्के वायू प्रदूषण ही कमी होऊ शकते. फेब्रुवारीमध्ये गडकरी यांनी दावा केला होता की, शेतकरी डिझेलवर वर्षाला तीन ते साडेतीन लाख रुपये खर्च करतात.

 

दर शेतकऱ्यांना सीएनजीवर आधारित ट्रॅक्टरचा वापर केला तर जवळजवळ वर्षाला दीड ते दोन लाख रुपये वाचू शकतात. त्यावेळी गडकरी यांनी म्हटले होते की, यामुळे ग्रामीण अर्थव्यवस्थामध्ये बदल होईल तसेच मोठ्या प्रमाणात रोजगाराची संधी निर्माण होतील. सीएनजी एक स्वच्छ इंधन असून त्यामध्ये कार्बन आणि अन्य प्रदूषकांचे मात्रा खूपच कमी असते.

केंद्र सरकार central government केंद्रीय मोटर वाहन नियम Central Automotive Rules सीएनजी CNG बायो सीएनजी Bio CNG ट्रॅक्टर tractor
English Summary: Now an old tractor will save one and a half to two lakh rupees a year

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.