अलीकडे शेती क्षेत्रात अमुलाग्र बदल बघायला मिळत आहेत. शेती क्षेत्रात उपयोगी पडणाऱ्या अनेक यंत्राचा शोध लावला जात आहेत. काळानुसार शेती संपूर्ण हायटेक (Hi-tech) बनत जात आहे. आणि शेती क्षेत्रात आता मोबाईलचा देखील चांगला प्रभावी वापर बघायला मिळत आहे. आता अनेक अशा ॲप्लिकेशन बाजारात आल्या आहेत ज्याद्वारे शेती क्षेत्रातील कामे अजूनच सुलभरीत्या पूर्ण केले जाऊ शकतील. आता केवळ मोबाईल द्वारे पिकांची माहिती, तसेच पिकांवर येणारे रोगांची माहिती त्याचे नियंत्रण, हवामानाचा अंदाज, तसेच आता मोबाईल द्वारे शेतजमीन (Farmland) देखील मोजता येऊ शकते. आज आपण मोबाईल द्वारे शेत जमीन कशी मोजायची याविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत.
मोबाईल द्वारे शेत जमीन मोजण्यासाठी (To measure farm land) आपणास केवळ एका ॲप्लिकेशनची आवश्यकता भासणार आहे, शेतकरी मित्रांनो आम्ही आपणास सांगू इच्छितो की, हि ॲप्लीकेशन आपणास प्लेस्टोर (Play Store) या प्लॅटफॉर्मवरती मोफत उपलब्ध करून देण्यात आली आहे. चला तर मग मित्रांनो जाणून घेऊया या अप्लिकेशन विषयी सविस्तर माहिती. शेतकरी मित्रांनो जर आपणासही आपली शेत जमीन मोजायचे असेल तर आता आपण अवघ्या काही सेकंदात आपली शेतजमीन मोजू शकता यासाठी आपणास आपल्या मोबाईल मधील प्ले स्टोअर या एप्लीकेशन डाऊनलोड केल्या जाणाऱ्या प्लॅटफॉर्म ला भेट द्यावी लागेल. प्ले स्टोअर वर गेल्यानंतर आपणास जीपीएस एरिया कॅल्क्युलेटर असे सर्च करावे लागेल. जीपीएस एरिया कॅल्क्युलेटर हे एप्लीकेशन डाउनलोड केल्यानंतर आपण अगदी काही सेकंदात आपली शेत जमीन मोजू शकता.
एप्लीकेशन डाउनलोड केल्यानंतर शेत जमीन मोजण्यासाठी आपणास एप्लीकेशन ओपन करावे लागेल ओपन केल्यानंतर आपल्या स्क्रीनवर खाली तळाशी जीपीएस सारखे चिन्ह दिसेल त्यावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर तीन पर्याय ओपन होतील त्यापैकी एरिया (Area) या पर्यायावर क्लिक करा. Area या पर्यायावर क्लिक केल्यानंतर आपल्या समोर दोन पर्याय ओपन होतील Measuring By Walking आणि Measuring By Manual.
जर आपणास जमीन चालून मोजायची असेल तर पहिल्या पर्यायावर क्लिक करा आणि आपल्या शेतजमिनीला पूर्ण वेढा घाला. पूर्ण वेढा घातल्यानंतर आपले शेत जमीन मोजली जाईल. आणि जर आपणास गुगल मॅप वरून जमीन सिलेक्ट करून मोजायची असेल तर Measuring By Manual या पर्यायावर क्लिक करा पाणी आपल्या शेतजमिनी व्यवस्थितरित्या सिलेक्ट करा, त्यानंतर आपली जमीन मोजली जाईल. आपली जमीन हेक्टर तसेच एकर मध्ये मोजली जाईल.
Share your comments