1. यांत्रिकीकरण

विद्यार्थ्यांनी बनवले चक्क ऊस लागवडीचे यंत्र, सोपे होईल ऊस लागवडीचे काम

यांत्रिकीकरण हा आता प्रत्येक क्षेत्राचे अविभाज्य भाग बनले आहे. यंत्रांच्या मदतीने कुठलेही काम जास्त कष्ट न पडता सहजरीत्या व कमी वेळात करता येते. याला आता क्षेत्र सुद्धा अपवाद राहिले नाही. शेतामध्ये सुद्धा सगळ्या प्रकारची कामे म्हणजे शेताची पूर्वमशागत असूया आंतरमशागत किंवा पिकांची कापणी,लागवड इत्यादीसाठी बऱ्याच प्रकारची यंत्रे विकसित करण्यात आली आहेत. या यंत्राच्या मदतीने शेतीची कामे हे कमी खर्चात आणि कमी वेळात होऊ लागले आहेत. अशाच प्रकारचे यंत्र काही विद्यार्थ्यांनी तयार केले आहे.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
courtesy-agrowon

courtesy-agrowon

यांत्रिकीकरण हा आता प्रत्येक क्षेत्राचे  अविभाज्य भाग बनले आहे. यंत्रांच्या मदतीने कुठलेही काम जास्त कष्ट न पडता  सहजरीत्या व कमी वेळात करता येते. याला आता क्षेत्र सुद्धा अपवाद राहिले नाही.  शेतामध्ये सुद्धा सगळ्या प्रकारची कामे म्हणजे शेताची पूर्वमशागत असूया आंतरमशागत किंवा पिकांची कापणी,लागवड इत्यादीसाठी बऱ्याच प्रकारची यंत्रे विकसित करण्यात आली आहेत. या यंत्राच्या मदतीने शेतीची कामे हे कमी खर्चात आणि कमी वेळात होऊ लागले आहेत. अशाच प्रकारचे यंत्र काही विद्यार्थ्यांनी तयार केले आहे.

 त्याचा उपयोग ऊस लागवडीसाठी करता येईल.या लेखात आपण या यंत्राची माहिती घेणार आहोत.

 तयार केले ऊस लागवडी साठी यंत्र

 उसाच्या लागवडीसाठी भरपूर प्रमाणात मजुरांची आवश्‍यकता असते. परंतु सद्यस्थितीत मजुरांची टंचाई असल्याने  आणि ऊस लागवडीला येणारा खर्च या गोष्टी विचारात घेऊनकमी वेळेमध्ये,कमी खर्चात व कमी कष्ट मध्ये ऊस लागवड करता यावी यासाठीकळंब तालुका इंदापूरयेथील फडतरे नॉलेज सिटी मधीलबाबासाहेब फडतरे पॉलिटेक्निक महाविद्यालयातील वैभव जगताप,रोहन लांडगे,प्रसाद पाठक काशिनाथ दुबळे या विद्यार्थ्यांनी ऊस लागवड यंत्रकरण्यासाठी प्रयत्न सुरू केले. यासाठी त्यांना प्राचार्य नागेश ठोंबरे व महाविद्यालयातील इतर कर्मचारी यांचे मार्गदर्शन लाभले.

 

 कसे काम करते हे यंत्र?

 या ऊस लागवड यंत्रावर चार चाकी असलेले गाडे असून त्यावर माणूस बसण्याची सोय केलेली आहे. तसेच या गाडीच्या पुढील बाजूला खोदण्यासाठी छोटा फाळबसवला आहे.  त्याच्या मागोमाग वरून खालपर्यंत पोकळा साहेब बाई बसला असून त्याच्या शेजारी उसाची कांडी ठेवण्यासाठी बादली बसवली आहे.दुसरा माणूस ही गाडी ढकलतो व पाइपच्या मागे असलेल्या सीटवर एक माणूस बसण्याची सोय असून तिथे बसलेला माणूस हाताने उसाचे कांडे पाईप मध्ये टाकतो.गाडा जसा पुढे पुढे जातो तसतशी आपोआप माती ढकलली जाते.यासाठी दोन तिरके प्लेटखाली बसवले आहेत.

 असं या विद्यार्थ्यांनी दुसऱ्या प्रकारामध्ये चार चाकी यंत्राला चालविण्यासाठी चेन पॉकेट आणि  पॅडेलचीसोय केली असल्याचे सांगितले आहे.सायकल प्रमाणे पॅडल मारून ते चालवता येते.

भुसभुशीत मातीमध्ये पेडल द्वारे चालवण्यासाठी अधिक श्रम पडत असल्याचे लक्षात आल्याने हे श्रम कमी करण्यासाठी इंजिन द्वारे यंत्राला ऊर्जा मिळवून देण्याचे काम केले असल्याचेसांगितले आहे. अद्याप यावर प्रयोग चालू असल्याचे विभाग प्रमुख उदय चव्हाण यांनी सांगितले. या यंत्राच्या चाचण्या प्रत्यक्ष शेतामध्ये घेतल्या जात असूनयेणाऱ्या अडचणी सोडवण्याचा प्रयत्न केला जात असल्याची माहिती दिली आहे.( स्त्रोत- मी E- शेतकरी)

English Summary: make a cane cultivation machine by polytechnic student Published on: 09 September 2021, 10:26 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters