Mahindra Tractors : भारतातील ट्रॅक्टर उत्पादक महिंद्रा ट्रॅक्टर्सने मे 2024 मधील ट्रॅक्टर विक्रीचे आकडे आज (दि.1) प्रसिद्ध पत्रकाच्या माध्यमातून जाहीर केले आहेत. मे महिन्यात कंपनीची कामगिरी चांगली झाली आहे. महिंद्रा ट्रॅक्टर्सने जारी केलेल्या आकडेवारीनुसार कंपनीने मे 2024 मध्ये देशांतर्गत विक्रीत 6 टक्के आणि निर्यात विक्रीत 85 टक्के वाढ केलील आहे.
देशांतर्गत विक्रीत 6% वाढ
कंपनीने जारी केलेल्या विक्री अहवालानुसार, महिंद्रा ट्रॅक्टर्सने मे 2024 मध्ये देशांतर्गत विक्रीत 6% ची वाढ साधली आहे. कंपनीने मे 2024 मध्ये भारतात 35,237 ट्रॅक्टरची विक्री केली आहे. तर गेल्या वर्षी याच महिन्यात भारतात 33,113 युनिट्सची विक्री झाली होती.
निर्यात विक्रीत 85% वाढ
महिंद्रा ट्रॅक्टर्सने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, कंपनीने मे 2024 मध्ये ट्रॅक्टरच्या निर्यात विक्रीत 85% ची वाढ नोंदवली आहे. मे 2024 मध्ये कंपनीने भारताबाहेर 1872 ट्रॅक्टर विकले आहेत. तर गेल्या वर्षी मे महिन्यात 1013 युनिट्सची निर्यात विक्री झाली होती.
एकूण विक्रीत 9% वाढ
महिंद्रा ट्रॅक्टर्सने मे महिन्यात एकूण देशांतर्गत निर्यात ट्रॅक्टर विक्रीत 9 टक्के वाढ नोंदवली आहे. कंपनीने मे 2024 मध्ये 37,109 ट्रॅक्टरची विक्री केली आहे. तर मागील वर्षी याच महिन्यात 34,126 युनिट्सची विक्री झाली होती.
ट्रॅक्टरची मागणी वाढण्याची शक्यता
महिंद्रा अँड महिंद्राचे फार्म इक्विपमेंट सेक्टरचे अध्यक्ष हेमंत सिक्का म्हणाले की, “आम्ही मे 2024 मध्ये देशांतर्गत बाजारपेठेत 35,237 ट्रॅक्टरची विक्री केली आहे. जी गेल्या वर्षीच्या तुलनेत 6 टक्क्यांनी वाढली आहे. पूर्वेकडील राज्ये नैऋत्य मान्सूनचे वेळेवर आगमन आणि पेक्षा जास्त मान्सूनचा अंदाज यामुळे खरीप पिकांसाठी जमिनीची तयारी करण्याची क्रिया वेळेवर सुरू होण्याची अपेक्षा आहे. ज्यामुळे येत्या काही महिन्यांत ट्रॅक्टरची मागणी वाढेल निर्यात बाजार, अमेरिकेला OJA निर्यातीच्या आधारावर, आम्ही 1,872 ट्रॅक्टर विकले आहेत, जे गेल्या वर्षीच्या तुलनेत 85 टक्क्यांनी वाढले आहे."
Share your comments