भारतातील नंबर वन ट्रॅक्टर ब्रँड महिंद्रा अँड महिंद्रा मी एक चांगली संधी उपलब्ध करून दिली आहे.येऊ घातलेल्या नवरात्र उत्सवाच्या पार्श्वभूमीवर महिंद्रा अँड महिंद्रा या कंपनीने शेतकऱ्यांसाठी एक नवीन ऑफर सुरू केली आहे.
शेतकऱ्यांसाठी महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी शेतकरी महोत्सव चे आयोजन केले आहे. या योजनेच्या माध्यमातून देशातल्या वेगवेगळ्या राज्यातील शेतकऱ्यांसाठी आकर्षक योजना सादर केले आहेत.
या वर्षाच्या सणासुदीच्या हंगामामध्ये महिंद्रा अँड महिंद्रा कंपनी च्या सगळ्या उत्पादनांवर आकर्षक एक्सचेंज ऑफर, कमीत कमी डाऊन पेमेंट आणि कमी व्याज दरा सोबतच बऱ्याच प्रकारचे लाभ देणार आहे. यासोबतच ट्रॅक्टरच्या खरेदीवर एक रोटावेटर बिलकुल मोफत मिळणार आहे. महिंद्रा अँड महिंद्रा ने योजना कुठल्या राज्यांसाठी सुरू केली आहे,ते ह्या लेखाच्या माध्यमातून पाहू.
- राजस्थान– राजस्थानच्या शेतकऱ्यांसाठी महिंद्रा 265 डीआय आणि महिंद्रा 265 डी आय पावर प्लस च्या खरेदीवर विशेष ऑफर दिली जात आहे. या ऑफर नुसार महिंद्रा 265 डी आय ची किंमत 4.49लाख निश्चित केली गेली आहे. त्यासोबतच महिंद्रा 265 डी आय पावर प्लस ची किंमत 4.79 लाख रुपये आहे.
- उत्तर प्रदेश – महिंद्रा किसान महोत्सव ऑफरचा लाभ सेंट्रल युपी,बुंदेलखंड आणि पूर्वी उत्तर प्रदेश मधील काही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिला जाणार आहे. या ऑफर नुसार शेतकऱ्यांना महिंद्रा 275 डी आय टी यु एक्सपी प्लस ट्रॅक्टर खरेदी वर एक चांगली ऑफर दिली गेली आहे या ट्रॅक्टरची किंमत 6.50 लाख रुपये आहे. या ट्रॅक्टर खरेदी वर Tez-e रोटावेटर पूर्णपणे मोफत दिले जाणार आहे.
- मध्य प्रदेश – मध्यप्रदेश मधील शेतकऱ्यांना महिंद्रा 275 डी आय टी यु एक्सपी प्लस ट्रॅक्टरच्या खरेदीवर खास ऑफर दिली जात आहे. या ट्रॅक्टर ची किंमत 5.61 लाख रुपये निश्चित केली आहे. परंतु शेतकरी हे ट्रॅक्टर 51 हजार रुपये डाऊन पेमेंट भरून खरेदी करू शकतात. बाकीची रक्कम 4.99 टक्के या व्याजदराने हप्त्यांमध्ये भरता येईल.
- पंजाब- पंजाब राज्यातील शेतकऱ्यांसाठी महिंद्रा ने दोन ट्रॅक्टर यांच्या खरेदीवर ऑफर लागू केली आहे महिंद्रा युवो 415 डी आय आणि महिंद्रा 265 डीआय हे दोन ट्रॅक्टर आहेत. या ऑफर नुसार महिंद्रा युवो415 याचीकिंमतपाचलाख 65 हजाररुपयेआहे. तसेच महिंद्रा 265 डी आय ची किंमत चार लाख 99 हजार 999 रुपये आहे.
- आंध्र प्रदेश – आंध्रप्रदेश राज्यातील शेतकऱ्यांना महिंद्रा 275 डी आय टी यु एक्स पी प्लस ट्रॅक्टर खरेदीवर एक शानदार ऑफर दिली जात आहे. त्यानुसार तेथील शेतकरी हे ट्रॅक्टर पाच लाख 75 हजार रुपये किमतीत खरेदी करू शकतात.
Share your comments