1. यांत्रिकीकरण

जाणून घेऊ आधुनिक ऊस शेतीतील यंत्रे व त्यांचा वापर

ऊस हे कृषी औद्योगिक दृष्ट्या महत्त्वाचे नगदी पीक आहे. परंतु दिवसेंदिवस कमी होणारी ऊस उत्पादकता आणि वाढता उत्पादन खर्च यामुळे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर टाकणे ही काळाची गरज बनली आहे. ऊस लागवडीचा विचार केला तर साधारणपणे 40 ते 45 टक्के खर्च निव्वळ मजुरीवर होतो एकीकडे वाढत चाललेले मजुरीचे दर आणि दुसरीकडे शेतीच्या कामासाठठी मजुरांची कमी उपलब्धता यामुळे शेतीमध्ये सुधारित अवजारांचा व यंत्रांचा वापर करणे म्हणजे यांत्रिकीकरण करणे अनिवार्य झाले आहे. उसाच्या शाश्वत आणि अधिक उत्पादनासाठी पूर्वमशागत, लागण, आंतर मशागत तसेच तोडणी इत्यादी कामे वेळच्या वेळी होणे व योग्य पद्धतीने होणे अत्यावश्यक आहे. त्यासाठी ऊसशेतीत यंत्राचा वापर केल्यास फायद्याचे ठरेल. उत्पादन खर्च कमी करण्यासाठी आणि उत्पादन वाढविण्यासाठी सुधारित अवजारांचा व यंत्रांचा वापर करणे अत्यंत गरजेचे आहे. या लेखात आपण ऊस शेतीस उपयोगी पडणारे यंत्रे या बद्दल माहिती घेऊ.

KJ Maharashtra
KJ Maharashtra
machinary in sugercane farming

machinary in sugercane farming

 ऊस हे कृषी औद्योगिक दृष्ट्या महत्त्वाचे नगदी पीक आहे. परंतु दिवसेंदिवस कमी होणारी ऊस  उत्पादकता आणि वाढता उत्पादन खर्च यामुळे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांच्या उत्पन्नात भर टाकणे ही काळाची गरज बनली आहे. ऊस लागवडीचा विचार केला तर साधारणपणे 40 ते 45 टक्के खर्च निव्वळ मजुरीवर होतो एकीकडे वाढत चाललेले मजुरीचे दर आणि दुसरीकडे शेतीच्या कामासाठठी मजुरांची कमी उपलब्धता यामुळे शेतीमध्ये सुधारित अवजारांचा व यंत्रांचा वापर करणे म्हणजे यांत्रिकीकरण करणे अनिवार्य झाले आहे.

 उसाच्या शाश्वत आणि अधिक उत्पादनासाठी पूर्वमशागत, लागण, आंतर मशागत  तसेच तोडणी इत्यादी कामे वेळच्या वेळी होणे व योग्य पद्धतीने होणे  अत्यावश्यक आहे. त्यासाठी ऊसशेतीत  यंत्राचा वापर केल्यास फायद्याचे ठरेल. उत्पादन खर्च कमी करण्यासाठी आणि उत्पादन वाढविण्यासाठी सुधारित अवजारांचा व यंत्रांचा वापर करणे अत्यंत गरजेचे आहे. या लेखात आपण ऊस शेतीस उपयोगी पडणारे यंत्रे या बद्दल माहिती घेऊ.

 ट्रॅक्‍टरचलित ऊस लागवड यंत्र:

या यंत्राने सपाट जमिनी मध्ये दोन रिजरच्या साह्याने सऱ्या पाडणे, अखंड ऊस टाकल्यानंतर औषध मारलेला उसाचे 30  सेंटी मीटर लांबीचे तुकडे करून बेणे  सरीत पाडणे, बेन्यावर माती पसरणे दाणेदार खते पेरून देणे, रोलर च्या मदतीने माती दाबणे इत्यादी कामे एकाच वेळी केली जातात. त्यामुळे वेळेची, कष्टाचे  आणि पैशांची बचत होते. या यंत्राने 75 ते 90 सेंटिमीटर अंतरावर गरजेनुसार सऱ्या पाडता येतात. या यंत्रासाठी पंचेचाळीस ते पन्नास अश्‍वशक्तीचा ट्रॅक्‍टर आवश्यक आहे. या यंत्राच्या वापरामुळे पारंपारिक पद्धतीपेक्षा साधारणपणे 35 ते 40 टक्के पर्यंत लागवड खर्चात बचत होते. या यंत्रामुळे एका दिवसात साडेचार ते पाच एकर क्षेत्र ऊस लागवड करता येते.

 

 तीन पहारीचे अवजार:

 या अवजाराच्या तीन लोखंडी पहारी 45 अंशाच्या कोनात जोडलेले असतात. या अवजाराचा उपयोग ऊस पिकातील सरी-वरंबा फोडण्यासाठी केला जातो. उसाच्या बाळ बांधणी च्या वेळी या अवजाराचा वापर सरी-वरंबा फोडण्यासाठी, जमीन भुसभुशीत करण्यासाठी व तन नियंत्रण करण्यासाठी केला जातो ऊस साडेचार पाच महिन्यांचा झाल्यावर उसाची मोठी बांधणी केली जाते. या वेळी तीन पहारीच्या यंत्राच्या साह्याने वरंबा फोडून जमीन भुसभुशीत केली जाते. त्यानंतर रिजरच्या साह्याने मोठी बांधणी केली जाते.

 लहान ट्रॅक्टरचलीत ऊस अंतर मशागत यंत्र: महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी अंतर्गत डॉ. आ. शिं. कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय राहुरी येथे यंत्र विकसित केले आहे. हे यंत्र 18.5 अश्वशक्ती ते 22.0 अश्वशक्ती लहान ट्रॅक्टर द्वारे चालविता येते. या यंत्राच्या साहाय्याने उसाची संपूर्ण आंतरमशागत करता येते. चार ते पाच फुटाच्या सरीत उसाला भर घालने तसेच खते पेरुन देणे इत्यादी कामे या यंत्राच्या सहाय्याने  अगदी सहज करता येतात. एका दिवसात हे यंत्र साडेसहा ते सात एकर क्षेत्राचे आंतरमशागत करते.

 ट्रॅक्टर चलीत ऊस पाचट बारीक करण्याचे यंत्र:

 ऊस कापणी नंतर शेतात सरासरी आठ ते दहा टन प्रति हेक्‍टरी पाचट जमिनीवर पसरलेली असते. या पाचटाचा वापर सेंद्रिय खत तयार करण्यासाठी होऊ शकतो. या रोटावेटर सदृश्य यंत्राने तीन फूट पिकांच्या खोडव्यात वापरून सरीतील पाचट आचे दहा ते पंधरा सेंटीमीटर चे बारीक तुकडे करता येतात. या यंत्रात पुढच्या बाजूला असलेल्या रोलरमुळे पाचट सरीत दाबली जाते. रोटर वर मधल्या भागात बसवलेली जे आकाराची पाती तुकडे करीत जातात तर दोन्ही बाजूस बसवलेली एल आकाराचे पाती वरंब्याच्या बगलेची माती काढून पाचटाचा सोबत थोड्या प्रमाणात मिसळली जाते. या यंत्राने दिवसभरात अडीच ते तीन एकरावरील पाचटाचे तुकडे करता येतात.

हे यंत्र पंचेचाळीस ते पन्नास अश्वशक्ति ट्रॅक्टर द्वारे चालवता येते. या यंत्राने एका दिवसात अडीच ते तीन एकर क्षेत्रावरील पाचट बारीक करता येते. ज्या शेतकऱ्याकडे रोटावेटर उपलब्ध आहे त्यावर आता पात्यांची  जोडणी केल्यास कमी खर्चात हे यंत्र उपलब्ध होते.

 कृषिराज:

 या यंत्राला तीन लोखंडी फन असतात. म्हणूनच या अवजाराचा उपयोग उसाला भर देणे व सरी वरंबा फोडण्यासाठी केला जातो. तसेच रिझर जोडून उसाची बांधणी करता येते. कृषिराजा यंत्रा मधील मधला फण काढल्यास हे यंत्र ऊस लागणीनंतर दीड ते दोन महिन्यांनी उसामधील आंतरमशागतीसाठी वापरता येते. मधला लोखंडी फण काढल्यामुळे कडेच्या दोन्ही फणाच्या मध्ये ऊस  येतो व व फणांच्या साह्याने ऊसाला दोन्ही बाजूंनी थोड्या प्रमाणात भर लागते. याच वेळी शिफारशीत नत्र खताचा दुसरा हप्ता द्यावा. म्हणजे दिलेली खतमात्रा मातीआड केली जाते. फुटवे फुटण्याचे प्रमाण वाढते व उसाच्या बगलेतील तणांचा बंदोबस्त करता येतो. या अवजाराच्या साहाय्याने एका दिवसात एक बैलजोडी दीड एकर क्षेत्रात आंतरमशागतीच्या काम पूर्ण करते. याच अवजाराला तीनही फन जोडून ऊस लागणीनंतर तीन ते साडेतीन महिन्यांनी सरी-वरंबा फोडण्यासाठी उपयोग करतात. सरी वरंबा फोडल्यामुळे जमीन सपाट व भुसभुशीत होते व उसाला भर दिली जाते याला उसाची बाळ बांधणी असे म्हणतात.

English Summary: machinary in sugercane farming Published on: 04 July 2021, 03:46 IST

Like this article?

Hey! I am KJ Maharashtra. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters