अनुभवाच्या जोरावर बनवला कमी किंमतीचा बुलेट ट्रॅक्टर; इतर राज्यातही ठरतोय हिट

12 February 2021 04:41 PM By: भरत भास्कर जाधव
Bullet Tractor (Maqboo sheikh)

Bullet Tractor (Maqboo sheikh)

''अनुभव हाच खरा शिक्षक'' असा सुविचार आपण आपल्या शालेय जीवनात ऐकला असेल किंवा वाचला असेल. हे किती खरे आहे, याचं उदाहरण लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्याचे रहिवाशी असलेले मकबूल शेख यांनी आपल्या बुलेट ट्रॅक्टरमधून सिद्ध केले आहे. आता तुमच्या आमच्या शेतात बुलेट ट्रॅक्टर धावणार आहे. मकबूल शेख यांनी ही किमया केली असून गरीब शेतकऱ्यांना विकत घेता येईल असा बुलेट दुचाकीचा ट्रॅक्टर आहे.

आधुनिक यंत्राच्या सहाय्याने शेती समृद्ध करण्याचे अनेक शेतकऱ्यांचे स्वप्न असते, मात्र हे स्वप्न पैशांअभावी साकार होत नाही. अशा सामान्य शेतकऱ्यांसाठी आता बुलेट ट्रॅक्टरच्या माध्यमातून नवा पर्याय उपलब्ध झाला आहे. हा छोटा बाईक ट्रॅक्टर शेतीच्या मशागतीची सर्व कामे करतो. अगदी दीड टनापर्यंत ट्रॉलीही ओढतो. हा ट्रॅकर बनवणारे मकबूल शेख यांनी यांचे कोणतेही तांत्रिक शिक्षण घेतलेले नाही. पण आपल्या अनुभवाच्या जोरावर हा बुलेट ट्रॅक्टर त्यांनी तयार केला आहे. मकबूल यांनी फक्त इयत्ता सातवीपर्यंतचे शिक्षण घेतलं आहे. पण त्यांची कामगिरी ही एखाद्या मॅकेनिकल अभियंत्याला लाजवेल, अशी आहे. मकबूल शेख लहानपणापासून ट्रॅक्टर दुरुस्तीचे काम करतात. ट्रॅक्टर दुरुस्तीनंतर ते शेतीची अवजारे बनवू लागले. फवारणी, कोळपणी, अशी विविध शेतीची अवजारे मकबूल शेख यांनी तयार केली आहेत.

लातूरच्या निलंगा शहरात मकबूल शेख यांचं शेती अवजारांचं वर्कशॉप आहे. या वर्कशॉपमध्ये शेतकऱ्यांना उपयोगी ठरणारा बुलेट ट्रॅक्टर तयार झाला आहे. हा ट्रॅक्टर बनवायला साधारण ८ दिवस जातात. ‘कृषी जागरण मराठी’शी बोलताना मकबूल शेख म्हणाले की, कमी जमीन असणारे आणि ऊसाची शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना परवडणारे ट्रॅक्टर मिळावे. या निश्चयाने आपण या बुलेट ट्रॅक्टरची निर्मिती केली. आपण बाजारात पाहातो की, साधे ५ एचपीचे ट्रक्टर घ्यायचे ठरवले तरी त्याची किंमत ही ५ लाख रुपयांपर्यंत असते. अवजारांसोबत या ट्रॅक्टरची किंमत ७ लाखापर्यंत होत असते. यामुळे कमीत-कमी किंमतीत शेतकऱ्यांना ट्रॅक्टर मिळावे, असे वाटत होतं.शिवाय बऱ्याचवेळा मजूर भेटत नसल्याने शेतातील कामे होत नाहीत.

 

काहीवेळा ऊस शेतीमध्ये,डाळींब बागेत कमी जागा असल्याने मोठे यंत्र नेता येत नाहीत.यामुळे छोट्या आकाराचे ट्रॅक्टर शेतकऱ्यासाठी उपयोगी पडते. मकबूल शेख यांनी बनवलेले ट्रॅक्टर सर्व बाबतीत फायदेशीर आहे, म्हणजेच हे बुलेट ट्रॅक्टर कमी वजनासह कमी किंमतीचे आहे. या ५ एचपी बुलेट ट्रॅक्टरची किंमत फक्त ६० हजार रुपये आहे. तर १०एचपी ट्रॅक्टरची किंमत १ लाख ६० हजार रुपये आहे. विशेष म्हणजे या दोन्ही ट्रॅक्टरमध्ये इतर ट्रॅक्टरप्रमाणे फिचर्स आहेत.  हा बुलेट ट्रॅक्टर पेरणी, कोळपणी, फवारणी, नांगरणी याबरोबरच शेतातली सगळी कामे सहजपणे करतो. जर ट्रॅक्टरमध्ये काही खराबी झाली तर शेतकरी या बुलेट ट्रॅक्टरचे सर्व पार्ट खोलून दुरुस्त करू शकतो. एवढ्या सोप्या पद्धतीने हा ट्रॅक्टर बनवला आहे.

 

मकबूल यांनी सुरुवातीला बनवलेल्या ट्रॅक्टरमध्ये विविध वाहनांची यंत्रे होती. छोट्या हत्ती,(पिक-अप),बुलेट दुचाकी, ट्रॅक्टर्सची काही पार्ट्स, असे पार्ट्स जोडून त्यांनी पहिला ट्रॅक्टर तयार केला होता. ट्रॅक्टर तयार झाल्यानंतर त्यांनी आपल्या शेतात वर्षभर त्याची चाचणी घेतली. व्यवस्थित काम करत असल्यानंतर मकबूल यांनी आपल्या छोट्या ट्रॅक्टरमध्ये सुधारणा केल्या. 

लातूरच्या ग्रामीण भागातल्या एका युवक व्यावसायिकाने बनवलेला हा ट्रॅक्टर अल्पावधीत राज्यासह कर्नाटक आणि मध्यप्रदेश, गुजरात आणि आंध्र प्रदेशातल्या शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय होत आहे. नेपाळमधल्या काही शेतकऱ्यांनी मोबाईलवर संपर्क साधून नोंदणीही केली आहे.

संपर्क –

मकबूल शेख –

9881436262

9657359857

9561696912.

bullet tractor tractor बुलेट ट्रॅक्टर ट्रॅक्टर मकबूल शेख Maqbool Sheikh लातूर latur
English Summary: Low cost bullet tractor built on experience

कृषी पत्रकारितेसाठी आपला पाठिंबा दर्शवा

प्रिय वाचक, आमच्यात सामील झाल्याबद्दल धन्यवाद. आपल्यासारखे वाचक आमच्यासाठी कृषी पत्रकारितेसाठी प्रेरणा आहेत. कृषी पत्रकारितेला अधिक बळकट करण्यासाठी आणि ग्रामीण भारतातील कानाकोप in्यात शेतकरी आणि लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी आम्हाला तुमचे समर्थन किंवा सहकार्य आवश्यक आहे. आपले प्रत्येक सहकार्य आमच्या भविष्यासाठी मोलाचे आहे.

आपण आम्हाला समर्थन करणे आवश्यक आहे (Contribute Now)

Share your comments

Krishi Jagran Marathi Magazine Subscription ऑनलाईन अंक मागणीसाठी

शासन निर्णय

CopyRight - 2021 Krishi Jagran Media Group. All Rights Reserved.