भारत एक कृषिप्रधान देश आहे. आपल्या देशाची निम्म्याहून अधिक जनसंख्या कृषी क्षेत्रावर अवलंबून आहे. यामुळे कृषी क्षेत्रात काळाच्या ओघात आता मोठ्या प्रमाणात आधुनिक यंत्रसामग्रीचा वापर होऊ लागला आहे. शेतीमध्ये आधुनिकतेची कास धरत आता शेतकरी राजा चांगले उत्पन्न देखील कमवू लागला आहे. शेतीमधून चांगले उत्पन्न प्राप्त करण्यासाठी शेतकरी बांधवांना काही गोष्टींची विशेष काळजी देखील घ्यावी लागते.
कोणत्याही पिकातून दर्जेदार उत्पादन मिळविण्यासाठी पिकाच्या पेरणीपूर्वी देखील जातीने लक्ष ठेवणे महत्त्वाचे असते. एकातून चांगले उत्पन्न मिळवण्यासाठी पेरणीपूर्वी जमिनीची मशागत योग्य पद्धतीने करणे अनिवार्य असते. शेतीची मशागत चांगली झाली तरच चांगले उत्पादन प्राप्त होते हे शेतीचे एक महत्त्वाचे सूत्र आहे.
नांगरणी, वखरणी, रोटर फिरवणे यांसारख्या क्रियेला मशागत म्हणतात. शेतकरी बांधवांना शेत जमीन भुसभुशीत करण्याचा कृषी वैज्ञानिक सल्ला देत असतात. यासाठी बाजारात रोज नवनवीन आधुनिक यंत्र देखील दाखल होत आहेत. शेत जमीन भुसभुशीत करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या अत्याधुनिक यंत्रांमध्ये डीस्क हॅरो या यंत्राचा देखील समावेश आहे. हे एक अत्याधुनिक कृषी उपकरण आहे. याचा उपयोग मातीचे ढेकळे फोडून जमीन भुसभुशीत करण्यासाठी होतो.
डिस्क हॅरो या कृषी उपकरणाचे वैशिष्ट्ये : हे यंत्र ट्रॅक्टरच्या साह्याने चालवले जाते. डिस्क हॅरो ट्रॅक्टरच्या शक्तीचा उपयोग करीत जमीन भुसभुशीत करत असते. या कृषी उपकरणात गोल मेटल डिस्क असतात, याचा आकार सुमारे 5 ते 7 सें.मी पर्यंत असू शकतो.
हेही वाचा:-अच्छे दिन आ गए रे….! कापसाला 13 हजार रुपये प्रति क्विंटलचा भाव
डिस्क हॅरोचा वापर कसा केला जातो: या यंत्राचा वापर मशागतीसाठी केला जातो, या यंत्राचा जमिनीची पहिली नांगरणी केल्यानंतर वापर केला जातो. शेतजमीनीतील ढेकळे फोडून जमीन भुसभूशीत शेतकऱ्यासाठी या यंत्राचा वापर केला जातो. हे कृषी उपकरण गवत/तणांचे छोटे तुकडे जमिनीत मिसळून टाकते. या मशीनचा वापर केल्याने जमीन भुसभुशीत होऊन शेतजमीन पेरणीसाठी योग्य बनते.
हेही वाचा:-शेतकरी मित्रांनो, काजु लागवड कसं आपल्याला लखपती बनवू शकत, वाचा याविषयी…..
डिस्क हॅरोचे फायदे : या यंत्रामुळे शेतीची पूर्वमशागत अगदी सहज आणि सोपी होते. यामुळे शेतकऱ्यांचा वेळ आणि मजुरीचा खर्च वाचतो. परिणामी उत्पादन खर्चात मोठी बचत होते. साहजिक यामुळे उत्पादनात 2 ते 5 टक्क्यांनी वाढ होत असल्याचे सांगितलं जाते. भारतात अनेक वेगवेगळ्या कंपन्यांनी या यंत्राची निर्मिती केली आहे. या कृषी उपकरणाची किंमत कंपनीनुसार तसेच मशीनच्या आकारानुसार कमी-जास्त असते. असे असले तरी या मशीनची किंमत तीस हजार रुपयांपासून ते एक लाख रुपयांपर्यंत असते.
हेही वाचा:-शेतकरी मोठ्या संकटात!! अचानक द्राक्ष खरेदी बंद, काय झालं असं, जाणुन घ्या याविषयी
Share your comments