1. यांत्रिकीकरण

Krushi Drone: कृषी ड्रोन योजना काय आहे? ड्रोन तंत्रज्ञानाचे फायदे काय? कुठे मिळेल प्रशिक्षण? वाचा माहिती

Krushi Drone:- तंत्रज्ञान आणि कृषीक्षेत्र या आता एकाच नाण्याच्या दोन बाजू असून कृषी क्षेत्रामध्ये तंत्रज्ञानाचा वापर आता मोठ्या प्रमाणावर शेतकरी करतात. खूप मोठ्या प्रमाणावर तंत्रज्ञान आता शेती क्षेत्रासाठी विकसित झाले असून येणाऱ्या काही दिवसांमध्ये शेतीची अनेक अवघड पद्धतीची कामे देखील आता सोप्या पद्धतीने करता येणे शक्य झाले आहे. कृषी क्षेत्रामध्ये कीड व रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी किंवा नियंत्रणात आणण्याकरिता शेतकरी मोठ्या प्रमाणावर कीटकनाशकांचे फवारणी करतात.

पाटील रत्नाकर अशोक
पाटील रत्नाकर अशोक
krushi drone scheme

krushi drone scheme

Krushi Drone:- तंत्रज्ञान आणि कृषीक्षेत्र या आता एकाच नाण्याच्या दोन बाजू असून कृषी क्षेत्रामध्ये तंत्रज्ञानाचा वापर आता मोठ्या प्रमाणावर शेतकरी करतात. खूप मोठ्या प्रमाणावर तंत्रज्ञान आता शेती क्षेत्रासाठी विकसित झाले असून येणाऱ्या काही दिवसांमध्ये शेतीची अनेक अवघड पद्धतीची कामे देखील आता सोप्या पद्धतीने करता येणे शक्य झाले आहे. कृषी क्षेत्रामध्ये कीड व रोगांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी किंवा नियंत्रणात आणण्याकरिता शेतकरी मोठ्या प्रमाणावर कीटकनाशकांचे फवारणी करतात.

परंतु योग्य काळजी न घेतल्या गेल्यामुळे बऱ्याचदा शेतकऱ्यांना या माध्यमातून विषबाधा होण्याची शक्यता असते आणि कधी कधी शेतकऱ्यांना जीव देखील गमावावा लागतो. या अनुषंगाने विचार केला तर कृषी ड्रोन योजना ही केंद्र सरकारच्या माध्यमातून राबवली जाणारी योजना असून शेतकऱ्यांसाठी खूप फायद्याची अशी योजना आहे. या माध्यमातून 50 टक्के अनुदानाचा लाभ  शेतकऱ्यांना मिळू शकतो.

 कृषी ड्रोन योजनेचे स्वरूप

 शेतकऱ्यांना जर ड्रोन खरेदी करायचा असेल तर या योजनेच्या माध्यमातून शेतकरी बंधूंना अनुदान देण्यात येते. ड्रोन खर्चाच्या 50% किंवा कमाल पाच लाख रुपये अनुदान या योजनेच्या माध्यमातून दिले जाते. हे अनुदान प्रामुख्याने पदवीधर सुशिक्षित तरुण,

अनुसूचित जाती जमाती, लहान व सीमांत शेतकरी व महिला शेतकरी यांना दिले होते. या व्यतिरिक्त इतर शेतकऱ्यांना ड्रोन खरेदीच्या खर्चाच्या 40 टक्के किंवा कमाल 4 लाख रुपये आर्थिक मदत देखील दिली जाते. तसेच कृषी विज्ञान केंद्र, आयसीएआर संस्था आणि राज्य कृषी विद्यापीठांना ड्रोन खरेदी करायचा असेल तर कृषी यंत्रणा 100% पर्यंत अनुदान देते.

 शेतकऱ्यांना कुठे मिळते प्रशिक्षण?

 या माध्यमातून सरकार शेतकऱ्यांना ड्रोन कसा वापरावा यासंबंधीचे महत्त्वपूर्ण ट्रेनिंग देखील देणार आहे. ड्रोनचा वापर अगदी सोप्या पद्धतीने करता यावा याकरिता शेतकरी आणि सुशिक्षित तरुणांना केंद्र सरकारच्या कृषी यंत्रणा प्रशिक्षण व चाचणी संस्था, कृषी विज्ञान केंद्र, आयसीएआर संस्था आणि राज्यातील कृषी विद्यापीठांच्या माध्यमातून ड्रोन उडवण्याचे ट्रेनिंग देखील दिले जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना शेतात ड्रोन वापरायला चालना तर मिळेलच परंतु या माध्यमातून रोजगाराच्या अनेक संधी देखील निर्माण होतील.

 ड्रोन तंत्रज्ञानाचा फायदा शेतीला कसा होईल?

 ड्रोन चा विचार केला तर यामध्ये जीपीएस, अनेक प्रकारचे सेन्सर्स, हाय क्वालिटी कॅमेरे, प्रोग्राम करणे योग्य नियंत्रक आणि नेवीगेशन सिस्टम चा समावेश असतो. या सगळ्या सिस्टमच्या आधारे ड्रोन हा शेतीसाठी चांगल्या प्रकारची अचूक माहिती देते. या सगळ्या यंत्रणाच्या माध्यमातून सॉफ्टवेअरच्या मदतीने सगळ्या माहितीचे संकलन करून ती उपयुक्त माहिती शेतीसाठी वापरता येते.

यामध्ये पीक निरीक्षण तसेच पिकांचे वाढीचे निरीक्षण व मूल्यांकन,  कीड आणि रोगांवर नियंत्रण, पिकांचे पक्षांपासून संरक्षण तसेच पिकांची देखरेख, बियाणे लागवड आणि मातीचे विश्लेषण असे विविध प्रकारचे महत्त्वाच्या बाबी या माध्यमातून करता येतात.

या सगळ्या माहितीच्या आधारे शेतकऱ्यांना खते तसेच बियाणे व कीटकनाशके व पाण्याचा खूप चांगला वापर करता येतो. तसेच पिकांना जर ड्रोन च्या माध्यमातून फवारणी केली तर एका एकर क्षेत्राचे फवारणी पाच ते दहा मिनिटात होते.तसेच ड्रोनला ऑटो सेंसर असल्यामुळे ते विशिष्ट उंचीवर उडते व या माध्यमातून संपूर्ण शेतीचे निरीक्षण तुम्ही एका जागी बसून करू शकतात. ड्रोनच्या माध्यमातून फवारणी केली तर कीडनाशके व खते तसेच होणारा खर्च देखील वाचतो.

English Summary: krushi dron scheme is so benificial for farmerand get subsidy on drone porchasing Published on: 05 August 2023, 10:35 IST

Like this article?

Hey! I am पाटील रत्नाकर अशोक. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters