1. यांत्रिकीकरण

John Deere 5405 GearPro: 63 HP सह भारतातील सर्वात शक्तिशाली ट्रॅक्टर, किंमत आणि वैशिष्ट्ये जाणून घ्या

ट्रॅक्टर पॉवर स्टीयरिंगसह येतो, जो स्मूथ ड्राइव्ह करतो. कंपनीचा हा ट्रॅक्टर 12 फॉरवर्ड + 4 रिव्हर्स गीअर्ससह गिअरबॉक्ससह येतो. यामध्ये तुम्हाला ड्युअल क्लच पाहायला मिळतो आणि तो कॉलर शिफ्ट ट्रान्समिशनमध्ये येतो. कंपनीने या ट्रॅक्टरचा फॉरवर्ड स्पीड 2.0 - 32.6 kmph आणि रिव्हर्स स्पीड 3.5 - 22.9 kmph ठेवला आहे. हा जॉन डीअर ट्रॅक्टर ऑइल इमर्स्ड डिस्क ब्रेकसह येतो. या जॉन डीअर ट्रॅक्टरमध्ये स्वतंत्र, 6 स्प्लाइन, मल्टी स्पीड पॉवर टेकऑफ आहे, जे 540 @ 2100/1600 ERPM जनरेट करते.

John Deere 5405 GearPro Tractor News

John Deere 5405 GearPro Tractor News

John Deere 5405 GearPro Tractor : John Deere 5405 GearPro ट्रॅक्टर भारतीय शेतकऱ्यांमध्ये लोकप्रिय ट्रॅक्टरपैकी एक आहे. कंपनीचा हा ट्रॅक्टर अधिक वजन उचलण्याची क्षमता असलेला आहे. या जॉन डीअर ट्रॅक्टरमध्ये तुम्हाला एक शक्तिशाली इंजिन पाहायला मिळते, जे सर्व प्रकारच्या शेतीमध्ये जबरदस्त काम करते. जॉन डिअर कंपनीने आपल्या Gear Pro मालिकेतील ट्रॅक्टरमध्ये अनेक आकर्षक फीचर्स दिले आहेत. हा ट्रॅक्टर कमीत कमी देखभाल खर्चासह येतो आणि नियमित तपासणी करून शेतकरी हा ट्रॅक्टर चांगल्या स्थितीत ठेवू शकतात. यामुळे आज आम्ही तुम्हाला John Deere 5405 GearPro ट्रॅक्टरची वैशिष्ट्ये आणि किंमत याबद्दल माहिती देणार आहोत.

जॉन डीअर 5405 गियरप्रो बदल माहिती

John Deere 5405 Gear Pro ट्रॅक्टरमध्ये तुम्हाला Coolant Cooled With Overflow Reservoir इंजिन 2900 cc क्षमतेसह 3 सिलिंडरमध्ये पाहायला मिळेल. जे 63 HP पॉवर जनरेट करते. या जॉन डीअर ट्रॅक्टरची कमाल PTO पॉवर 55 HP आहे आणि त्याचे शक्तिशाली इंजिन 2100 RPM जनरेट करते. कंपनीचा हा ट्रॅक्टर ड्राय टाईप, ड्युअल एलिमेंट एअर फिल्टरसह येतो, जे इंजिनला धुळीपासून वाचवते. John Deere 5405 Gear Pro ट्रॅक्टरची उचलण्याची क्षमता 2000 kg आणि त्याचे एकूण वजन 2280 kg आहे. कंपनीने हा ट्रॅक्टर 2050 MM व्हीलबेसमध्ये 3515 MM लांबी आणि 1870 MM रुंदीसह तयार केला आहे. या जॉन डीअर ट्रॅक्टरचा ग्राउंड क्लिअरन्स 425 एमएम ठेवण्यात आला आहे.

John Deere 5405 GearPro ची वैशिष्ट्ये

ट्रॅक्टर पॉवर स्टीयरिंगसह येतो, जो स्मूथ ड्राइव्ह करतो. कंपनीचा हा ट्रॅक्टर 12 फॉरवर्ड + 4 रिव्हर्स गीअर्ससह गिअरबॉक्ससह येतो. यामध्ये तुम्हाला ड्युअल क्लच पाहायला मिळतो आणि तो कॉलर शिफ्ट ट्रान्समिशनमध्ये येतो. कंपनीने या ट्रॅक्टरचा फॉरवर्ड स्पीड 2.0 - 32.6 kmph आणि रिव्हर्स स्पीड 3.5 - 22.9 kmph ठेवला आहे. हा जॉन डीअर ट्रॅक्टर ऑइल इमर्स्ड डिस्क ब्रेकसह येतो. या जॉन डीअर ट्रॅक्टरमध्ये स्वतंत्र, 6 स्प्लाइन, मल्टी स्पीड पॉवर टेकऑफ आहे, जे 540 @ 2100/1600 ERPM जनरेट करते. हा ट्रॅक्टर 2 व्हील ड्राइव्हमध्ये येतो, यामध्ये तुम्हाला 6.5 x 20 फ्रंट टायर आणि 16.9 x 30 / 16.9 x 28 मागील टायर पाहायला मिळतात.

जॉन डीअर 5405 गियरप्रोची किंमत किती?

या ट्रॅक्टरची भारतात एक्स-शोरूम किंमत 8.70 लाख ते 10.60 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. या जॉन डीरे गियर प्रो ट्रॅक्टरची ऑन-रोड किंमत RTO नोंदणी आणि सर्व राज्यांमध्ये लागू असलेल्या रोड टॅक्समुळे बदलू शकते. कंपनी त्यांच्या John Deere 5405 GearPro ट्रॅक्टरसह 5000 तास किंवा 5 वर्षांची वॉरंटी देते.

English Summary: John Deere 5405 GearPro India Most Powerful Tractor with 63 HP Know Price and Features Published on: 04 March 2024, 12:42 IST

Like this article?

Hey! I am ऋषिकेश चंद्रकांत काळंगे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters