1. यांत्रिकीकरण

शेतकऱ्यांसाठी महत्वाची माहिती! भारतातील टॉप 10 रोटावेटर व त्यांच्या विशेषता जाणुन घ्या

मित्रांनो नुकतेच मान्सूनचे केरळमध्ये आगमन झाले असून 4 तारखेला मान्सून महाराष्ट्रातील तळकोकण गाठणार आहे. यामुळे राज्यातील शेतकरी बांधव खरीप हंगामाची तयारी जोमात करू लागला आहे. शेतकऱ्यांनी आता शेती मशागतीला गती दिली आहे.

अजय वसंत शिंदे
अजय वसंत शिंदे
Mahindra Rotavator

Mahindra Rotavator

मित्रांनो नुकतेच मान्सूनचे केरळमध्ये आगमन झाले असून 4 तारखेला मान्सून महाराष्ट्रातील तळकोकण गाठणार आहे. यामुळे राज्यातील शेतकरी बांधव खरीप हंगामाची तयारी जोमात करू लागला आहे. शेतकऱ्यांनी आता शेती मशागतीला गती दिली आहे.

मित्रांनो मान्सून दाखल झाला असल्याने शेतकऱ्यांना खरीप पिकाच्या पेरणीपूर्वी शेत तयार करावे लागणार आहे. त्यासाठी शेतकरी बांधवांना कृषी यंत्रसामग्री लागणार आहे. मित्रांनो शेतकरी बांधवांना अनेक कृषी यंत्राची आवश्यकता भासत असते. यामध्ये रोटाव्हेटरचा देखील समावेश आहे. कृषी यंत्रामध्ये याचे एक वेगळे स्थान आहे.

शेत तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे हे कृषी यंत्र ट्रॅक्टरला जोडून चालवले जाते. शेतकरी मित्रांनो जर आपणास रोटाव्हेटर खरेदी करायचे असेल तर यावर अनुदानाचा लाभही शासनाकडून दिला जातो. आज आपण भारतात उपलब्ध टॉप 10 रोटाव्हेटरविषयी जाणुन घेणार आहोत.

भारतातील टॉप 10 रोटावेटर

मॅसिओ गॅस्पर्डो रोटावेटर 

मॅसिओ गॅस्पर्डो कंपनीचे सुमारे 48 प्रकारचे रोटाव्हेटर्स प्रचलित आहेत. या कंपनीकडे Virat Pro, Virat J 175, Virat Pro HC 185, Virat Pro 125, Virat Regular 185, Virat Plus 145 इत्यादी मॉडेल्स आहेत.

शक्तिमान रोटावेटर 

शक्तीमान कंपनीचे 18 प्रकारचे रोटाव्हेटर्स प्रचलित आहेत. रेग्युलर लाइट, चॅम्पियन सीरीज, यू-सिरीज, सेमी चॅम्पियन प्लस, रेग्युलर सीझन एसआरटी इत्यादी मॉडेल्स आहेत.

सोनालिका रोटावेटर 

सोनालिका रोटावेटरचे 7 मॉडेल्स प्रचलित आहेत. यामध्ये मिनी स्मार्ट सिरीज चेन ड्राइव्ह, चॅलेंजर सिरीज, मिनी स्मार्ट सिरीज गियर ड्राइव्ह, स्मार्ट सिरीज, हॉर्नगल स्पीड सिरीज इत्यादी मॉडेल्स आहेत.

महिंद्रा रोटावेटर 

महिंद्रा रोटावेटरची 17 मॉडेल्स प्रचलित आहेत. Gyrovator ZLX Plus, Gyrovator RLX, Gyrovator ZLX, Gyrovator SLX 175 इत्यादी मॉडेल्स आहेत.

फिल्डकिंग रोटावेटर 

फील्डकिंगचे एकूण 12 मॉडेल प्रचलित आहेत. गोल्ड रोटरी टिलर, रेग्युलर मल्टी स्पीड, सिंगल मल्टी स्पीड, रुबस्ट सिंगल स्पीड इत्यादी मॉडेल्स आहेत.

सॉईल मास्तरचे रोटावेटर 

सॉइल मास्टरचे 8 मॉडेल प्रचलित आहेत. यामध्ये JSMRT-C6 (6 फूट), JSMRT C7 (7 फूट), JSMRT L7 (7 फूट), JSMRT C5 (5 फूट) मॉडेल्सचा समावेश आहे.

खेडुत रोटावेटर 

हेवी ड्युटी रोटरी टिलर, रोटरी टिलर रेग्युलर गायरोव्हेटर, मिनी रोटरी टिलर, रोटरी टिलर KAE RD मॉडेल्स अशी खेडूतची 4 मॉडेल्स चलनात आहेत.

करतार रोटावेटर 

करतारचे 5 मॉडेल प्रचलित आहेत. यामध्ये जंबो ६३६-४८, जंबो ५३६-४२, रोटाव्हेटर ७३६-५४, केआर ७६३-४८, केआर६३६-४२ मॉडेल्सचा समावेश आहे.

दशमेश रोटावेटर 

दशमेशचे दोन मॉडेल प्रचलित आहेत. यामध्ये ६४२ रोटाव्हेटर/रोटरी टिलर, ६४२ (७ फूट) मॉडेल्सचा समावेश आहे.

लँडफोर्स रोटावेटर 

लँडफोर्सचे 4 मॉडेल प्रचलित आहेत. यामध्ये Robusto, Mini Series, Supremo, Vivo या मॉडेल्सचा समावेश आहे.

English Summary: Important information for farmers! Find out the top 10 rotavators in India and their features Published on: 30 May 2022, 09:24 IST

Like this article?

Hey! I am अजय वसंत शिंदे. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters