सध्या शेतीमध्येमोठ्या प्रमाणात इंधनाचा वापर होऊ लागला आहे. म्हणजे शेतातील पूर्वमशागत असो,पेरणी असो की कापणीयासाठी यंत्रांचा वापरकरून शेतकरीवेळ आणि पैशाची बचत करीत आहेत.
सध्या शेतीच्या कामांसाठी च्या वेगळ्या प्रकारची यंत्रे उपलब्ध झाली आहेत.परंतु ही यंत्रे विकत घेत असताना बऱ्याचदा आवश्यक असलेल्या गोष्टींकडे लक्ष दिले जात नाही.व नंतर परिणामी पश्चाताप करण्याची वेळ येते.त्यामुळे शेती संबंधातील कुठलीही यंत्रे खरेदी करतानाया यंत्रात संबंधित असलेली आवश्यक बाबीतपासून असते घेणे सोयीस्कर ठरते. या लेखामध्ये आपण ट्रॅक्टर निवड करताना कोणकोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.
ट्रॅक्टर घेतानापुढील गोष्टींची काळजी घ्यावी.
- ट्रॅक्टर मध्ये असलेली गियर संख्या:
ज्या ट्रॅक्टर कमी केअर मध्ये जास्त वेगवान असेल तर तो ट्रॅक्टर शक्यतो निवडावा.
- डिझेल क्षमता:
ट्रॅक्टर निवडताना इंजिनाचा देखील विचार करणे आवश्यक आहे.
- ट्रॅक्टरची अश्वशक्ती:
ट्रॅक्टर खरेदी करण्यापूर्वी प्रत्येक जण ट्रॅक्टरची अश्वशक्ती तपासून घेत असतो. ट्रॅक्टर चे अश्वशक्ती करताना जमीन कोरडवाहू आहे कीबागायती आहे या गोष्टींचा विचार करावा लागतो.अश्वशक्ती प्रमाणे जर ट्रॅक्टर घ्यायचा विचार केला तर एक अश्वशक्ती= दोन हेक्टर, 20 ते 25 अश्वशक्ति ट्रॅक्टर = 100 एकर
दुबार पीक पद्धती( जमीन ओलिताखाली) एक अश्वशक्ती=1.5 ट हेक्टर, 100 एकर = तीस ते पस्तीस अश्वशक्ति
- ट्रॅक्टरची निगडित योग्य अवजारे:
जास्त गिअरची संख्या असेल सलग दोनगियर मधील वेगाचा फरक असल्यासतो ट्रॅक्टर चांगला आहे. ट्रॅक्टरच्या अश्वशक्ती नुसार ट्रॅक्टरचा अवजार यांची निवड केल्यास वेळेमध्ये बचत होते म्हणजे प्रति तास 20 ते 40 टक्के अधिक काम होईल.अश्वशक्ती नुसार योग्य ट्रॅक्टरचे अवजारे निवड केल्यासइंधना मधे10 ते 15 टक्क्यांपर्यंत बचत होते.
ट्रॅक्टर ची निगा कशी ठेवावी?
ट्रॅक्टरचे योग्य देखभाल केल्यास इंधनामध्ये बचत होते.तसेच ट्रॅक्टर देखील दीर्घकाळ चांगल्या स्थितीत राहू शकते. चुकीच्या अवजारांची निवड केल्यास 25 टक्क्यांपर्यंत इंधन वाया जाऊ शकते.इंजिनचे कम्प्रेशन प्रेशर, इंजेक्ट प्रेशर,वाल, क्लिअरन्स इत्यादींची काळजी घेणे आवश्यक आहे.डिझेलची साठवण टाकी स्वच्छ असावी. डिझेल गळती होत नाही याची काळजी घ्यावी, ट्रॅक्टर कंपनीने सांगितल्याप्रमाणे फिल्टर बदलत रहावे. इंजिन ऑइल फिल्टर वापरताना चांगल्या कंपनीच्याऑइलवापरले जाईल याची दक्षता घ्यावी.
Share your comments