1. यांत्रिकीकरण

मका काढणीसाठी विकसीत झाली भारी मशीन, एका तासात काढला जातो 60 किलो मका

कृषी शास्त्रज्ञ सातत्याने नवीन तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देण्यासाठी कार्यरत असतात. शेतकऱ्यांचे उत्पन्नही दुप्पट व्हावे यासाठी, यंत्र विकसीत केली जातात. यंत्राच्या मदतीने पिकांची काढणी लवकर केली जाते. याशिवाय नवीन कृषी यंत्रे तयार करण्याचे कामही सातत्याने सुरू आहे. याच क्रमाने अलीकडेच चौधरी चरणसिंग हरियाणा कृषी विद्यापीठाच्या (एचएयू) शास्त्रज्ञांनी आणखी एक यश संपादन केले आहे.

भरत भास्कर जाधव
भरत भास्कर जाधव
Heavy machine

Heavy machine

कृषी शास्त्रज्ञ सातत्याने नवीन तंत्रज्ञानाला प्रोत्साहन देण्यासाठी कार्यरत असतात. शेतकऱ्यांचे उत्पन्नही दुप्पट व्हावे यासाठी, यंत्र विकसीत केली जातात. यंत्राच्या मदतीने पिकांची काढणी लवकर केली जाते. याशिवाय नवीन कृषी यंत्रे तयार करण्याचे कामही सातत्याने सुरू आहे. याच क्रमाने अलीकडेच चौधरी चरणसिंग हरियाणा कृषी विद्यापीठाच्या (एचएयू) शास्त्रज्ञांनी आणखी एक यश संपादन केले आहे.

शास्त्रज्ञांनी विकसित केलं यंत्र (The machine developed by scientists)

विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांनी एका यंत्राचा शोध लावला आहे. हे यंत्र मक्याचे धान्य काढण्यासाठी पेडल चालवलेले मका शेलर आहे, ज्याला पेटंट कार्यालय, भारत सरकारकडून डिझाइन पेटंट मिळाले आहे. हे आधुनिक यंत्र मका बिया काढण्यासाठी तयार करण्यात आले आहे. त्याची खासियत म्हणजे ती चालवण्यासाठी एकच व्यक्ती लागते. विशेष म्हणजे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहजपणे नेले जाते. कारण या यंत्राचे वजन फक्त 50 किलो आहे, त्याला चाके देखील आहेत.

हेही वाचा : स्वराज ट्रॅक्टरने शेतकऱ्यांचे काम केलं सोपं, जाणून घ्या मॉडेलची वैशिष्ट्ये

कमी खर्चात जास्त मका काढता येतो (Can extract more seeds at lower cost)

हे यंत्र कमी शेती करणाऱ्या आणि अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी अतिशय फायदेशीर ठरणार आहे. याद्वारे मक्याचे बियाणे तयार करण्यास मदत होईल, कारण त्यातून काढलेले दाणे फक्त एक टक्का फुटतात. या यंत्राच्या कार्यक्षमतेविषयी सांगायचं, तर प्रति तासात 55 ते 60 किलो पर्यंत मका काढला जातो. पूर्वी 4 ते 5 शेतकरी मिळून मॅन्युअल पद्धतीने इतका मक्याची काढणी करत. त्यासाठी वेळ आणि श्रम आवश्यक होते. एक व्यक्ती एका तासात फक्त 15 ते 20 किलोग्रॅम धान्य काढू शकत होता.

 

यंत्राचा वापर शेतकरी सहज करू शकतात (The farmer can easily use the machine)

मका तयार होऊन सोलून काढल्यानंतर बियाणे वेळेवर काढले नाही तर पिकावर बुरशीजन्य व इतर रोगांचा धोका असतो, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होऊ शकते, त्यामुळे या यंत्राद्वारे शेतकरी वेळेवर मका काढावे लागतात.

यामुळे स्टोरेजमध्ये कोणतीही अडचण येत नाही. यासोबतच मक्याचे मूल्यवर्धित उत्पादन ऑफ सीझनमध्येही विकून नफा मिळवता येतो. विशेष म्हणजे हे मशीन विजेशिवाय चालवता येते. तुम्ही ते कोणत्याही विशेष प्रशिक्षणाशिवाय वापरू शकता.

 

या शास्त्रज्ञांनी यंत्र तयार केले (The machine designed by these scientists)

हे मशीन कॉलेजच्या प्रक्रिया आणि अन्न अभियांत्रिकी विभागाचे डॉ. विजय कुमार सिंह आणि सेवानिवृत्त डॉ. मुकेश गर्ग यांच्या नेतृत्वाखाली विकसित केले गेले आहे. यासाठी 2019 मध्ये डिझाइनसाठी अर्ज केला. आता शास्त्रज्ञांच्या मेहनतीचे फळ मिळाले आहे.

English Summary: Heavy machine developed for maize harvesting, 60 kg of maize is extracted in one hour Published on: 30 November 2021, 09:41 IST

Like this article?

Hey! I am भरत भास्कर जाधव. Did you liked this article and have suggestions to improve this article? Mail me your suggestions and feedback.

Share your comments

आमच्या न्यूसलेटरचे सदस्य व्हा. शेती संबंधीत देशभरातील आताच्या बातम्या मेलवर वाचण्यासाठी आमच्या न्यूसलेटरची सदस्यता घ्या.

Subscribe Newsletters