पाणी हे जीवन आहे. प्राणिमात्राला जेवढी पाण्याची आवश्यकता असते तेवढीच पाण्याची आवश्यकता ही पिकांना देखील असते हे आपल्याला माहिती आहे. जर आपण कृषी क्षेत्राचा विचार केला तर पाण्याशिवाय शेती नाही. त्यामुळे आपण पाण्याचा वापर करताना तो खूप काळजीपूर्वक करणे गरजेचे आहे. हे देखील पाहणे महत्त्वाचे असते. आपण जो काही पिकांना पाण्याचा पुरवठा करतो त्यापैकी त्याचा कितपत उपयोग पिकांना होतो हेदेखील पाहणे गरजेचे आहे.
बऱ्याचदा पिकांना गरज नसताना आपण पाण्याचा पुरवठा करतो व त्यामुळे पाण्याचा अपव्यय होतो. शेतकऱ्याचा ठिबक आणि तुषार सिंचनाचा उपयोग करू लागले आहेत व त्यामुळे पाण्याची बचत होते हे देखील तेवढेच सत्य आहे.
परंतु विजेच्या लपंडावामुळे या माध्यमातून देखील पाणी योग्य वेळेला देणे शक्य होत नाही व पाण्याचे एकंदरीत व्यवस्थापन बिघडते. त्यामुळे पाण्याचा कार्यक्षम वापर होणे गरजेचे असून त्यासोबतच पिकांना जेवढी गरज आहे त्यानुरूप पाण्याचा पुरवठा होणे महत्त्वाचे आहे. यासाठी महत्वाचे तंत्रज्ञान आहे ते म्हणजे ग्रो स्ट्रीम तंत्रज्ञान होय. या विषयी आपण या लेखात माहिती घेऊ.
शेतकऱ्यांना फायदेशीर आहे 'ग्रो स्ट्रीम' तंत्रज्ञान
पिकांना जेव्हा पाण्याचा ताण पडतो तेव्हा प्रामुख्याने पिकांच्या मुळांच्या परिसरामध्ये मुळा
कडून विशिष्ट प्रकारचे रसायन उत्सर्जित केले जातात व त्याचे महत्त्वाचे काम असते की पाणी आवश्यक अन्नद्रव्यांचे शोषण करणे होय.
नक्की वाचा:इफको नॅनो युरिया (द्रव) खताबद्दल तुम्हाला हे माहिती आहे का? जाणून घ्या सविस्तर
हे पिकांना असलेली पाण्याची गरज आणि उत्सर्जनाचे प्रमाण हे बाहेरील वातावरणानुसार बदलत असते. जेव्हा पीक वाढीच्या अवस्थेत असते तेव्हा त्याच्या विविध प्रकारच्या अवस्थांनुसार त्यामध्ये योग्य बदल होत जातात व या अवस्था नुसारच वातावरणाशी जुळवून घेत योग्य त्याच प्रमाणात पिकाकडून पाण्याचे मागणी केली जाते.
ही सगळी प्रक्रिया होते ती सेंद्रिय रसायनांच्या माध्यमातून कार्यरत असते. त्यामुळे पिकांच्या पाण्याच्या मागणीला योग्य प्रकारे न्याय देणारे व पिकांना आवश्यक तेवढेच पाण्याचा व अन्नद्रव्यांचा पुरवठा करणारे ग्रो स्ट्रीम सिंचन प्रणाली उपयोगी पडते.
या तंत्रज्ञानात लॅटरलमध्ये पोवर फिल्ड पॉलिमर चा वापर केला जातो व त्याद्वारे ज्या पिकांना पाण्याची गरज असते त्यांच्याकडून सोडलेल्या रसायनांचा वेध घेतला जातो.जेव्हा पिकाकडून ही रसायने सोडली जातात त्यावेळी लॅटरलमध्ये असलेल्या सूक्ष्म छिद्राच्या माध्यमातून लॅटरल मधून पाणी सोडले जाते.
जेव्हा वनस्पतीची पाण्याची गरज पूर्ण होते तेव्हा वनस्पती कडून सोडले जाणारे रसायन आपोआप थांबतात व लॅटरल मधून सोडल्या जाणाऱ्या पाण्याचा पुरवठा देखील थांबतो. याचा अर्थ पिकाला जेवढी पाण्याची गरज असते तेवढेच पाणी ड्रीप यंत्रणेद्वारे पिकांना पुरवले जाते. या पद्धतीत पारंपारिक ठिबक पद्धतीपेक्षा 50 टक्के अधिक पाण्याची बचत होत असल्याचा दावा देखील केला जातो.
नक्की वाचा:शेतकऱ्यांनो अशाप्रकारे करा पालक लागवड होईल बक्कळ पैसा
Share your comments