शेतीतील अत्यंत उपयुक्त यंत्रामध्ये ट्रॅक्टरला महत्त्वाचे स्थान आहे.शेतीतील अनेक कामे ट्रॅक्टर च्या मदतीने पूर्ण केले जातात. शेताची नांगरणी असो की पिकांची काढणी किंवा ते मार्केटमध्ये पोचण्या पर्यंत ट्रॅक्टरची मदत शेतकऱ्यांना होत असते.
त्यामुळे बरेच शेतकरी चांगले ट्रॅक्टर च्या शोधात असतात. कमीत कमी वेळेत शेती आणि फळबागांची कामे सहजपणे करता येतील असे अनेक ट्रॅक्टर बाजारात उपलब्ध आहेत. त्यापैकी आपण अशाच एका शेतकऱ्यांना फायदेशीर ट्रॅक्टर बद्दल या लेखात माहिती घेणार आहोत.
फार्मट्रेक ॲटम 26 मिनी ट्रॅक्टर
हे ट्रॅक्टर शेतकऱ्यांमध्ये खूप लोकप्रिय असून शेतकऱ्यांच्या बजेटनुसार येणारा हा एक ट्रॅक्टर आहे. फार्मट्रेक ऍटम 26 मिनी हा अतिशय आकर्षक डिझाईन्स उत्कृष्ट ट्रॅक्टर आहे.
त्याच्या कार्यक्षमतेमुळे ते भारतीय बाजारपेठेत चांगली मागणी टिकवून धरलेले आहे.
या ट्रॅक्टरची वैशिष्ट्ये
1- हे 26 एचपी आणि तीन सिलेंडर सह येते. उत्पादनाची इंजिन क्षमता शेतावर कार्यक्षम मायलेज देते.
2- फार्मट्रेक ॲटम 26 सिंगलसह येतो. त्या ट्रॅक्टरला 9 फॉरवर्ड आणि तीन रिव्हर्स गिअर बॉक्स आहेत.
3- हे मल्टी डिस्क ओईल इमरस्ड ब्रेक्स तयार केले जाते यात पावर स्टेरिंग आहे.
4- चोवीस लिटर क्षमतेच्या मोठा इंधन टाकीसह शेतात दीर्घ कालावधीसाठी काम करते.
फार्मट्रेक ऍटम 26 मिनी ट्रॅक्टरची किंमत
या ट्रॅक्टरची भारतातील किंमत पाच लाख 40 हजार ते पाच लाख 60 हजार रुपये आहे. लहान शेतकऱ्यांसाठी अतिशय योग्य ट्रॅक्टर असून किमतीनुसार त्यांच्या खिशाला देखील परवडण्यासारखा आहे.
Share your comments